Dr. Anil Mokashi

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 5 – अयोध्येत श्रीराम परतले

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! राजपुत्रांचा रथ अयोध्येच्या जवळ येऊ लागला तसतसा नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. गावाच्या वेशीवर राजपुत्रांना डोळे भरून पाहण्यासाठी तुडुंब गर्दी जमली. ढोल, नगारे, ताशे, बिगुल, शंख, तुतार्यांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला. राजपुत्रांच्या स्वागतासाठी आयोध्येतील नागरिकांनी शहर सुशोभित केले होते. नव्या नवरी सारखे. नटवले होते. राजपुत्रांचे तेज पाहून अयोध्यावासी थक्क झाले होते. लोकांनी राजपुत्रांचा जयघोष केला. गावातल्या स्त्रियांनी त्यांना आशीर्वाद दिले. काहींनी ओवाळले तर पुरुषांनी स्वागताच्या घोषणा दिल्या. राजवाड्यात तर राजा दशरथ, राण्या, सगळे मंत्री आणि शहरातले प्रतिष्ठित नागरिक आतुरतेने राजपुत्रांची वाट पाहत होते. आल्या आल्या श्रीरामाने राजा दशरथाचे पाया पडून आशीर्वाद घेतले. राजाने त्यांना प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. राजा दशरथाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. नंतर चारीही राजपुत्र आयांच्या पाया पडले. सगळेजण, माय लेकरांच्या भावनिक पुनर्भेटीचे साक्षीदार होत होते. राण्यांनी राजपुत्रांचे औक्षण केले. त्यांना ओवाळले. दुसऱ्या दिवशी राजा दशरथांनी मुलांना राज दरबारात बोलवून घेतले. आश्रमातल्या शिक्षणाचे त्यांचे अनुभव सांगायला सांगितले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 5 – अयोध्येत श्रीराम परतले Read Post »

Dr. Anil mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 4 – श्रीरामाचे शिक्षण

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! एके दिवशी, राजा दशरथाला, त्याची चारी मुले, बागेमध्ये, धनुष्यबाण खेळताना दिसली. त्याच्या लक्षात आले, की मुलांना, आता शालेय शिक्षण, द्यायला पाहिजे. मुलांना आता, वेगवेगळ्या कला, व शास्त्रे, शिकायला पाहिजे. त्यांनी लगेच, आपले मंत्री सुमंत, यांना बोलवून, राजपुत्रांना, वशिष्ठ ऋषींच्या, आश्रमात, शिक्षणासाठी पाठवण्याची, व्यवस्था करण्याचे, आदेश दिले. श्रीरामाने, विनम्रपणे, आपले वडील सांगतील, तसे आम्ही ऐकू, असे उत्तर दिले. चारी राजपुत्रांच्या, आयांची, संमती घेतली गेली. मुलांपासून, वेगळे राहण्याच्या, नुसत्या कल्पनेनेच, आयांना, धक्का बसला होता. शरीरातून, हृदय, बाहेर काढून ठेवण्याइतके, वेदनादायक, होते ते. पण मुलांना, शिक्षणासाठी, पाठवण्या वाचून, काही पर्यायच नव्हता. मुलांच्या, उज्वल भवितव्यासाठी, आणि, राजघराण्याची परंपरा, म्हणून ते, आवश्यकच होते. एक कर्तव्य म्हणून, आपल्या मुलांना, वेगळे करण्याचे दुःख, त्यांना सहन करणे, भाग होते. दुसऱ्या दिवशी, चारी राजपुत्रांना, राजा दशरथ, आणि त्याच्या राण्यांनी, जड अंत:करणाने, निरोप दिला. राजपुत्रांनी, त्यांची राजेशाही, तलम वस्त्रे, अलंकार, आभूषणे, काढून ठेवली. आश्रमात, शिक्षणासाठी जाताना, त्यांच्या अंगावर, अत्यंत साधे कपडे होते. आता ते, इतर विद्यार्थ्यांसारखे, फक्त विद्यार्थी होते. राजपुत्र नव्हते. आश्रमात, गुरु वशिष्ठांनी, आश्रमाचे नियम, त्यांना समजून सांगितले. आणि मग त्यांना प्रवेश दिला. काही वर्षातच, पवित्र ग्रंथ, आणि शहाणपणा, देणाऱ्या शिक्षणाचा, त्यांचा अभ्यास, पूर्ण झाला. वागावे कसे, जगावे कसे, हे तत्त्वज्ञान, त्यांना शिकवण्यात आले. ते राजधर्म शिकले. राज्य कसे चालवावे, हे शिकले. गुण, सद्गुण, कसे वाढवावे. आणि अवगुण, दुर्गुण कसे टाळावे, हे शिकले. सुसंस्कार, भारतीय संस्कृती, म्हणजे काय, हे शिकले. राजकारण, समाजकारण , व्यवस्थापन शिकले. चारी राजपुत्रांना, शेवटच्या परीक्षेत, अतिशय चांगले, गुण मिळाले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 4 – श्रीरामाचे शिक्षण Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 3 – श्रीराम जन्म आणि त्याच्या बाललीला.

अखेर, बाळांच्या जन्माची, वेळ आली. राजा दशरथासह, संपूर्ण अयोध्या नगरी, आनंदात होती. भारतीय पंचांगानुसार, चैत्र नवमीला, दुपारी बारा वाजता, कौशल्या मातेच्या पोटी, श्रीरामांचा जन्म झाला. कैकेयीला एक, आणि सुमित्रा राणीला, जुळी मुलं झाली. म्हणजे, दोन मुलं झाली. चार चार राजपुत्रांच्या, आगमनाने, सगळे, आनंदाने बेभान झाले. ही, आनंदाची बातमी, घेऊन येणाऱ्या सेविकेला, राजा दशरथानी, गळ्यातला, मौल्यवान मोत्यांचा हार, बक्षीस म्हणून दिला. शहरात हत्तीवरून, साखर वाटली गेली. मिठाई वाटली गेली. प्रजेला, विविध वस्तू, भेट रूपाने, देण्यात आल्या. राजवाड्यात, आणि संपूर्ण गावात, नाच गाणी, रंगांची, अत्तरांची, फुलांची, दिव्यांची, उधळण झाली. उत्सव, साजरा करण्यात आला. तेव्हापासून, आजपर्यंत, संपूर्ण भारत देश, हजारो वर्षे, राम जन्माचा उत्सव, साजरा करत आहे. वशिष्ठ ऋषी, आणि श्रिंगी ऋषी, यांच्या सल्ल्यानुसार, चारही बाळांचे, बारसे करण्यात आले. त्यांची, नावे ठेवण्यात आली राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न. जवळजवळ, एक महिना, हा समारंभ, चालला. राजगुरूंनी यज्ञ केला. जन्मवेळेच्या, ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा, वैज्ञानिक अभ्यास करून, चारही बाळांची, कुंडली मांडली. आणि शास्त्राचा अर्थ लावून मुलांची नावे ठरवली. कौशल्येचा मोठा मुलगा प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहे. म्हणून त्याचे नाव राम असे ठेवले. कैकयीचा दुसरा मुलगा, सर्वांचे भरण पोषण करेल, म्हणून त्याचे नाव भरत असे ठेवले. सुमित्रेच्या मोठ्या मुलामधेउदात्त गुण आणि शौर्य आहे म्हणून त्याचे नाव लक्ष्मण असे ठेवले. लक्ष्मणाचा धाकटा भाऊ शत्रूचा कर्दनकाळ ठरेल म्हणून त्याचे नाव शत्रुघ्न असे ठेवावे. चारही राजपुत्रांचे पालन पोषण राजेशाही थाटात प्रेमाने होऊ लागले. त्यांची प्रगती पाहून सगळ्यांना आनंद होत असे. ही कथा अजून थांबलेली नाही! राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या बालपणातील अद्वितीय गोष्टी ऐकण्यासाठी आणि अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 3 – श्रीराम जन्म आणि त्याच्या बाललीला. Read Post »

Dr. Anil mokashi telling stories to children

रामायणाची गोष्ट – भाग २

निराश राजा दशरथाचे दुःख मुलांनो,रामायणाच्या पहिल्या गोष्टीत आपण रामायणाची ओळख केली. आज मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे. श्रीराम, श्रीराम, श्रीराम! गोष्टीचं नाव आहे “निराश राजा दशरथाचे दुःख”. एकेकाळी, आपल्या भारतात, अयोध्या नावाचे एक भव्य शहर होते. आज आपण जे अयोध्या म्हणून ओळखतो, त्याचे नामकरण कधी फैजाबाद होते. परंतु, अयोध्येच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे, आज ती पुन्हा अयोध्या म्हणून ओळखली जाते. येथे राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्यांचा कर्तृत्व व जीवन संघर्ष साकारत होता. राजा दशरथ, जो रघुवंशी वंशातला होता, त्याला शौर्य, विद्वत्ता आणि धार्मिकतेने ओळखले जात होते. त्याच्या राज्यात सुख-समृद्धी होती, परंतु तो अत्यंत दुःखी आणि निराश होता. कारण त्याला, तिन्ही राण्यांसोबत असूनही, पुत्रांचा आशीर्वाद प्राप्त झाला नव्हता. दशरथ राजाच्या दुःखाची कथा, आणि त्याला या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न, हे आपल्याला आज ऐकायचं आहे. पुत्रकामेष्ठी यज्ञ आणि त्याद्वारे त्याला प्राप्त झालेली आशीर्वादांची खीर, हे सर्व कसे घडले, हे जाणून घेण्यासाठी कृपया युट्यूबवर जाऊन हा व्हिडीओ पहा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाची गोष्ट – भाग २ Read Post »

Dr. Anil mokashi telling stories to children

रामायणाची गोष्टी – भाग १

रामायणाची ओळख मुलांनो, आजपासून दररोज मी तुम्हाला रामायणाची एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट फक्त पाच मिनिटांची असेल, आणि तुम्हाला ती माझ्या मागोमाग म्हणायची आहे. हजारो वर्षांपूर्वी श्रीराम भारतामध्ये होऊन गेले. राम हा तुमच्या माझ्यासारखाच माणूस होता. राजा दशरथ यांचा मुलगा होता. पण तो सर्वोत्तम माणूस होता. पुरुषोत्तम होता. म्हणजे उत्तम पुरुष होता. लहानपणी तो तुमच्यासारखाच लहान मुलगा दिसायचा. पण त्याच्या अंगात खूप चांगले गुण होते. तो सुसंस्कारी होता. विश्वामित्र ऋषींसोबत जंगलात जाऊन त्यांनी राक्षसांचा नायनाट केला. विश्वमित्र ऋषीं सोबत नेपाळमधील जनकपुरी या गावी जाताना त्यांनी अहिल्येचा उद्धार केला. एका शापामुळे अहिल्येचा दगड झाला होता. रामानी त्या दगडाला हात लावल्या लावल्या अहिल्या प्रकट झाली . रामानी स्वयंवरामध्ये शिवधनुष्य मोडून सीतेशी लग्न केले. रामाचे लहान भाऊ लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचे सुद्धा सीतेच्या लहान बहिणींशी लग्न झाले. अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला. रामाला 14 वर्षे वनवास सहन करावा लागला. सोनेरी हरणाचा पाठलाग करता करता दुष्ट व राक्षस रावणाने सीतेचे अपहरण केले. सीतेला पळवून नेले. सीतेला सोडवून आणण्यासाठी राम श्रीलंकेत गेला. या मोहिमेमध्ये जटायूचा मृत्यू झाला. त्यांनी सुग्रीवाशी हात मिळवणी केली. आणि वालीला मारले. समुद्र ओलांडला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला मारले. हनुमानाच्या मदतीने श्रीलंकेला आग लावली आणि सीतेची कैदेतून सुटका करून आयोध्येत परत आणले. अशा अनेक गोष्टी आणि घटनांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. तेथे तुम्हाला रामायणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांसोबत इतर महत्त्वाच्या गोष्टी ऐकायला मिळतील. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाची गोष्टी – भाग १ Read Post »

A doctor consulting with parents while holding a smiling baby.

21 व्या शतकातील पालकांना बालपणाचे विज्ञान माहित असायलाच हवे

#22 आता जुन्या काळचे पालकत्व कसे चालेल? काळ बदलला, जग बदलले. शामच्या आईचे जग आता कुणालाही निर्माण करता येणार नाही. कौटुंबिक आणि सामाजिक रचना बदलल्याने, एकट्या पडलेल्या तरुण आई-वडिलांना आता आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही. बालपणाच्या प्रत्येक वयात आणि टप्प्यावर योग्य माहितीच्या आधारे त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. आता यापुढे मुलांना वाढवण्यासाठी फक्त “प्रेम, काळजी आणि पालकांचे सामान्य ज्ञान” पुरेसे ठरणार नाही. मुलांचे संगोपन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. परंतु सुशिक्षित पालकांमध्येही अजून वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्याचे दिसून येते. त्यांना माहित नाही हेच त्यांना माहित नसते. मुलांच्या संगोपनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्त्वाचा? मुलांचे आरोग्य, आजार, आहार, वाढ, विकास, वागणूक, शिक्षण, मानसशास्त्र आणि अशा बालपणातील सर्व बाबींची खरी वैज्ञानिक माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. समस्या निर्माण होऊच नयेत म्हणून काय करायचे, आणि काही समस्या निर्माण झाल्यास त्यांचा सामना कसा करायचा, हे पालकांना माहित असले पाहिजे. आजच्या पालकांची सर्वात मोठी समस्या माहितगार व्यक्तीशी संपर्काचा संपूर्ण अभाव हीच आजच्या पालकांची सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या जवळचा बालरोगतज्ज्ञ हीच सर्वोत्तम माहितगार व्यक्ती आहे. लोकांना असे वाटते की डॉक्टर फक्त आजारासाठी किंवा लसीसाठीच आहेत. “बाळ आजारीच पडत नाही,” किंवा “लस सरकारी आहे, ती मोफत मिळते,” मग डॉक्टरची गरजच काय? परंतु बाळासाठी डॉक्टर केवळ आजारासाठी नाहीत; बालपणातील सर्व समस्यांवर योग्य माहितीसाठीही डॉक्टरच हवेत. शेजारीण किंवा आजीपेक्षा डॉक्टरला जास्त समजते. बाळ नॉर्मल आहे का? नॉर्मल रेंजमध्ये आहे का? काहीतरी चुकतंय का? किंवा बाळ बिघडलेले आहे का? काळजी करण्यासारखे आहे का? हे पालकांनाच ओळखता आले पाहिजे, आणि त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. मुलांच्या विकासाच्या टप्प्यांची ओळख लहान मूल ही मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नसते. जसे फुलपाखराच्या अंडे, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा विकासाच्या अवस्था असतात, तशाच मानवी विकासाच्या गर्भावस्था, नवजात, शैशव, शालेय, किशोरावस्था, पौगंडावस्था, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा टप्प्याही असतात. प्रत्येक टप्प्यात: वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे संस्कृती आणि कौटुंबिक परंपरांकडे दुर्लक्ष करणे नव्हे. योग्य माहिती मिळवून त्याआधारे निर्णय घेणे, याचा अर्थ होतो. निष्कर्ष म्हणूनच 21 व्या शतकातील पालकांना बालपणाचे विज्ञान समजणे आणि योग्य माहिती घेणे अनिवार्य आहे. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, विकासासाठी आणि भविष्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनासह पुढे जाणे ही काळाची गरज आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

21 व्या शतकातील पालकांना बालपणाचे विज्ञान माहित असायलाच हवे Read Post »

Dr. Anil Mokashi

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

#21 “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे.”बापरे, बापरे! केवढा प्रचंड अर्थ ठासून भरलाय श्री समर्थ रामदास स्वामींच्या या एका वाक्यात! “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे. अभ्यासे प्रकट व्हावे. नाही तरी झाकोनी असावे. नेमकचि बोलावे. तत्काळची प्रतिवचन द्यावे.” जसजसा या वाक्याचा अर्थ समजायला लागतो, तसतसे मेंदूतल्या ज्ञानाचे एकेक दालन उघडायला लागते. हे फक्त शाळेतल्या भिंतीवर लिहायचं ‘सुभाषित’ नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे, त्रिकालाबाधित सत्य आहे. लेखन आणि वाचनाचे आयुष्यातील अनुभव माझा मुलगा (३५) एक दिवस मला (७५) म्हणाला, “बाबा, अक्षर सुंदर दिसावं म्हणून तू एवढं महागडं, शंभर रुपयाचं, जाड टोकाचं रिफील का वापरतोस? परवडत नाही आता आपल्याला. आपली आर्थिक परिस्थिती बदललेली आहे. हॉस्पिटल बंद केलंय आपण. आणि तरीही तू रोज इतकी पानंच्या पानं लिहीत असतोस. ते वाचतंय तरी कोण?”उत्तरादाखल माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणि जिभेला ब्रेक लावला. दोस्त खात्यात हसण्यावारी नेलं. अस्थायी होतं राव ते! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं! असंच एकदा तीस वर्षांपूर्वी, माझ्या बायको बाबतही झालं. मी चाळीशीतला सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, आणि ती पस्तिशीतली सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होती. त्याकाळची घटना. रात्री जेवल्यानंतर झोपताना, “अपंग क्षेत्रातील समस्या व उपाय” या माझ्या क्रांतिकारक, नव्या लेखाचा पहिला परिच्छेद पूर्ण वाचून दाखवण्याआधीच बायकोने, “बघू हो ते नंतर, झोपा आता गुपचूप. मला सकाळी सहाला सिझर आहे. आणि तुम्हालाही बाळासाठी यायचं आहे,” असं म्हणून मला पृथ्वीवर आणलं. माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणी जिभेला ब्रेक लावला. अस्थायी होतं राव ते वाक्य! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं! त्या दिवशी मात्र मला “नॉर्मल” होण्याची गरज आहे, याचा साक्षात्कार झाला. सोशल मीडियाच्या युगात लेखनाची क्रांती बाकी देशाचं मला माहित नाही, पण “दिसामाजी काहीतरी” लिहिणाऱ्या जमातीला, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आल्यापासून “अच्छे दिन आये है”. सुगीचे दिवस आले आहेत. आपले आपण अखंडीत लिहीत राहावे. सगळ्या ग्रुपवर सगळ्या लोकांना पोस्ट करत राहावे. कोणी वाचो न वाचो, आपल्याला काय त्याचे देणे घेणे? किती लोकांनी सोशल मीडियावर मला ब्लॉक केले असेल, मी कधी बघायच्या भानगडीतच पडलो नाही. आपल्याला काय त्याचे. लेखन-वाचन: आयुष्याची गुरुकिल्ली लेखन आणि वाचन या जीवनावश्यक कला आहेत. मी तिसरीत असतानाच आमच्या गुरुजींनी “बघा हा मुलगा, कसा घडाघडा ‘संपूर्ण सकाळ’ वाचून दाखवतो ते. शिका काही याच्याकडून,” असं म्हणून, मला नगरपालिकेच्या सर्व शाळांमधून फिरवून आणलं. तेंव्हापासून लागलेला ‘वाचनाच्या किड्याचा झूनॉटिक डिसीज’, क्रॉनिक होऊन आजवर टिकून आहे. तसंच लेखनाच्या बाबतीतही झालं. म.ए.सो. शाळेच्या बाईंनी, माझा “तुकोबाची पालखी” हा निबंध, संपूर्ण शाळेला वाचून काय दाखवला, त्यानंतर मी “दिसामाजी जन्मभर” लिहीतच राहिलो. व्यक्तिमत्त्व विकास हो, अती व्यक्तिमत्त्व विकास! मेडिकलला गेल्यावर तर इतर सगळ्याच ९९% बुद्धिमान मुलांवर मात करून, साधं पास व्हायचं असेल तरी, तेच तेच प्रकरण, अनेकदा वाचण्याशिवाय पर्यायच नव्हता. सगळे सहपाठी जेमतेम कसेबसे एकदा, मेटाकुटीला येऊन ‘नेल्सन टेक्स्टबुक ऑफ पेडिअॅट्रीक्स’ वाचायचे. मी तीन वर्षांत १३ वेळा ‘ए टू झेड’ वाचलं. प्रयत्नांती परमेश्वर! शास्त्रशुद्ध लेखन-वाचन कौशल्य वाचन-लेखन कौशल्ये पद्धतशीरपणे शिकवता येतात. ती निष्ठेने जोपासावी लागतात. वाचनाने आयुष्याची क्षितिजं रुंदावतात, तर लेखन मनाची सुस्पष्टता वाढवतं. एकूण काय तर वाचन लेखन मनन चिंतन अभ्यासात,सत्कारणी लावतो जो वेळ या दिनक्रमात. भाषणे चर्चा वादविवाद परिसंवादात,जो नाही पोकळ चमकोगिरी करीत. विषय आपला समजून घेतो आणि देतो,आनंदाने कष्टाने जो ज्ञानाच्या खोलात जातो. असा समर्पित ज्ञानाची लालसा असणारा,विद्यार्थी दाही दिशांत नावाजला जाणारा. लेखन वाचनाचा खजिना आहे हिताचा,वर्तमान काळाचा व ताकदवान मनाचा. प्रयत्न करावा अर्थ समजून घेण्याचा,जिव्हाळ्याचा चांगला विश्वासू माणूस होण्याचा. वागावे कसे जगावे कसे आपल्या या समाजात,आणावे वारंवार वाचनात व ऐकण्यात. ग्रंथ हेच गुरु आणि शिक्षक सदा साथीला,कळेल कशासाठी आलो आपण जन्माला. लेखन आणि वाचनाचा आनंद घ्या, कारण या सवयींमुळे आपण अधिक प्रगल्भ, अधिक सजग, आणि अधिक सृजनशील होतो. “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे,” हे वाक्य फक्त वाचायचं नाही, तर आयुष्यात जगायचं आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे Read Post »

Vaccination

आजार परवडला की लस? खरं तर लस परवडते!

टाळता येण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा. लसीकरण हे आजच्या काळातील सर्वात प्रभावी आणि विज्ञानाधारित उपाय आहे. मात्र, आधुनिक लसींविषयी अनेक गैरसमज आणि अफवा पसरवल्या जातात. या गैरसमजांना बाजूला सारून, लसीकरणाचे महत्त्व समजावून घेणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. आधुनिक लसी म्हणजे काय? आधुनिक लसी म्हणजे केवळ एक फॅड किंवा डॉक्टर व कंपन्यांचा धंदा नाहीत. त्या विज्ञानाच्या दीर्घकालीन संशोधनातून तयार झालेल्या फळांपैकी एक आहेत. जशा आपण मोटरसायकल, मोबाईल, टीव्ही, आणि कॉम्प्यूटरसारख्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे, तसेच आधुनिक लसींचाही स्वीकार केला पाहिजे. लसीकरणाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे सरकारी लसी आणि खाजगी लसी सरकारकडून फक्त अत्यावश्यक आणि परवडणाऱ्या काहीच लसी दिल्या जातात. मात्र, आपल्या बाळासाठी योग्य त्या सर्व लसी मिळवणे ही आपली जबाबदारी आहे. सरकारी सुविधांबरोबरच खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरणाचे नियोजन करा. माहिती आणि सल्ल्याची गरज सर्व नर्स, सरकारी कर्मचारी किंवा अगदी प्रत्येक डॉक्टर देखील लसींबाबत तितके जाणकार नसू शकतात. म्हणूनच जाणकार बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य लसीकरण सुनिश्चित करा. बाळाचे भविष्य आपल्या हाती “मूल तुमचं खाजगी आहे, सरकारी नाही.” म्हणून सरकारी योजना पुरेशा नसतील तर खाजगीरित्या लसीकरण पूर्ण करा. आज लसीकरणाच्या माध्यमातून आपण अनेक गंभीर आजारांपासून आपल्या बाळाचे संरक्षण करू शकतो. टीप: या ब्लॉगचा उद्देश लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. तुमच्या बाळाच्या लसीकरणासाठी नेहमी विश्वासार्ह तज्ज्ञांचा सल्ला घ्या. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आजार परवडला की लस? खरं तर लस परवडते! Read Post »

Injecting

अनावश्यक इंजेक्शन्स: एक गंभीर समस्या

#19 इंजेक्शन आवश्यक असतात का? बहुतेक लोकांना वाटतं की इंजेक्शन दिल्याशिवाय औषधांचा प्रभाव जाणवत नाही. ही लोकांची मानसिकता आहे. मात्र, डॉक्टर म्हणून आम्हाला हे स्पष्टपणे माहीत आहे की तोंडाद्वारे दिलेली औषधे देखील तितकीच प्रभावी असतात, आणि अनेक वेळा इंजेक्शन आवश्यक नसतात. आम्ही, डॉक्टर, स्वतःच्या मुलांसाठी किंवा स्वतः आजारी असलो तरी उगाचच इंजेक्शन घेत नाही. मात्र, समाजात अशी समजूत आहे की “इंजेक्शन दिलं की आजार पटकन बरा होतो.” या समजुतीमुळे लोक डॉक्टरांकडे जाऊनही “सुई हवी” असं आग्रहाने सांगतात. अनावश्यक इंजेक्शनांचे दुष्परिणाम इंजेक्शन दिल्यावर त्याचे काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. गळू होणे, पोलिओसारखे आजार होणे, नसांना किंवा स्नायूंना कायमची इजा होणे, त्वचेवर रिऍक्शन होणे असे परिणाम डॉक्टरांना माहित आहेत. मात्र, हे दुष्परिणाम लोकांना माहित नसतात. लोकांच्या समाधानासाठी किंवा “डॉक्टरकडे गेलो तर इंजेक्शन दिलं जातंच” या अपेक्षेनेच डॉक्टर इंजेक्शन देतात. पण यामुळे डॉक्टरांच्या ज्ञानाला आणि वैद्यकीय शास्त्राला बाजूला ठेवावं लागतं. आणि कधी कधी पेशंटच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. समाजाची भूमिका या समस्येवर डॉक्टर आणि समाज दोघांनाही विचार करायला हवा. डॉक्टरांनी अनावश्यक इंजेक्शन्सचे दुष्परिणाम समजावून सांगणारे पोस्टर्स, चार्ट्स क्लिनिकमध्ये लावले पाहिजेत. पेशंट्सना “आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. औषधं पुरेशी असतील तर इंजेक्शन नको” असं स्पष्टपणे सांगायला हवं. त्याचप्रमाणे, समाजानेही डॉक्टरांवर विश्वास ठेवायला हवा. तपासणीसाठी फी देताना “आमचं समाधान करण्यासाठी इंजेक्शन देऊ नका; गरज असेल तेव्हाच द्या,” असं सांगायला हवं. योग्य उपचार कसे निवडावे? इंजेक्शन किंवा औषधांचा निर्णय हा फक्त डॉक्टरांनी पेशंटच्या आजाराची परिस्थिती पाहून घ्यायला हवा. डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून योग्य उपचार करण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. डॉक्टर आणि पेशंट यांच्यात विश्वासाचं नातं असेल तर अनावश्यक उपचार कमी होतील, आणि आरोग्य व्यवस्थेला एक नवा दृष्टिकोन मिळेल. आरोग्य हे फक्त डॉक्टरांवर नाही, तर समाजाच्या सकारात्मक दृष्टिकोनावरही अवलंबून असतं. योग्य विचारांनी आपण सर्वांचं आरोग्य सुधारू शकतो. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

अनावश्यक इंजेक्शन्स: एक गंभीर समस्या Read Post »

Dr. Anil Mokashi

मुलांसाठी सुंदर शिकवण: एकीचे बळ

#18 मुलांनो, आपण कधी विचार केला आहे का की एकत्र राहण्याचे किती फायदे असतात? याच विषयावर मी तुम्हाला एका शेतकऱ्याची मजेशीर आणि विचारप्रवर्तक गोष्ट सांगतो. या गोष्टीतून आपण खूप काही शिकू शकतो. शेतकऱ्याने आपल्या पाच मुलांना एकत्र येण्याची शिकवण दिली. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण वापरले – लाकडांच्या मोळीचे. तुम्हाला माहिती आहे का? ज्या काठ्या एकत्र बांधलेल्या होत्या, त्या कोणालाही मोडता आल्या नाहीत. पण, जशा त्या सुट्ट्या केल्या, प्रत्येक काठी मोडली गेली. हे दाखवतं की, जेव्हा आपण सगळे एकत्र राहतो, तेव्हा आपली ताकद वाढते. पण, एकटे राहिल्यास, आपण दुबळे होतो. तुम्हीही तुमच्या वर्गातील मित्रांसोबत, घरात, किंवा कुठेही असाल, नेहमी एकीने वागा. यामुळे केवळ तुमचे मैत्रीत चांगले नाते राहणार नाही, तर तुम्ही एकमेकांना संकटांतूनही बाहेर काढाल. Youtube Channel – Dr. Anil Mokashi व्हिडिओ बघा आणि मुलांसोबत चर्चा करा ही सुंदर शिकवण मी तुम्हाला एका गोष्टीतून समजावून दिली आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे बघा. यात मी स्वतः ही कथा सांगतोय. तुम्हालाही नक्की आवडेल, आणि ही शिकवण तुम्हाला रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल! बालवयातील शिक्षणासाठी आणि एकत्रीत सहकार्याच्या विचारांसाठी हा व्हिडिओ नक्की बघा! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मुलांसाठी सुंदर शिकवण: एकीचे बळ Read Post »

Helping Children Cope with Stress – Practical Support Strategies

#17 Childhood may seem like a simple time, but even young children face pressures that can lead to stress. The good news is that with understanding and the right strategies, caregivers can help children manage these feelings. From quality time to open communication, there are numerous ways to support children in developing resilience and coping skills. Here are some practical approaches that can make a big difference. Quality Time: Your Presence Matters More Than You Know Children find comfort in the presence of trusted adults. Taking time to connect with them individually not only strengthens the bond but also provides a safe space for them to share their feelings. It can be as simple as playing a game together, reading a book, or going for a walk. This time reassures them that they are loved and supported. Listening without judgment and being responsive to their concerns helps children feel heard. If they seem reluctant to talk, gentle encouragement often helps. Sometimes, children communicate their stress through behavior rather than words, so it’s crucial to be attentive to any changes in their habits or mood. Encouraging Open Conversations About Emotions Children need to know that it’s okay to talk about their worries. Encourage open conversations by letting them know it’s natural to feel scared, sad, or frustrated. This openness creates an environment where they feel safe expressing themselves without fear of being judged or misunderstood. Talking about feelings can make emotions more manageable. It also teaches children a lifelong skill: the ability to name, understand, and cope with their emotions. Simple reassurance can go a long way in helping them navigate these feelings. Providing Routine and Stability Children feel more secure with a consistent daily routine. Knowing what to expect each day gives them a sense of control, which can reduce feelings of anxiety. When changes are necessary, explaining them in a way they can understand can ease their adjustment. Alongside routine, limiting exposure to distressing media is essential. News stories about disasters, accidents, or violence can be very troubling for children. Monitor what they watch and explain things in a way that helps them feel safe. Answer their questions calmly and avoid exposing them to more detail than necessary. Seeking Professional Support When Needed If your child’s stress seems to persist, or if they are struggling in school or at home, it’s helpful to consult a counselor, teacher, or mental health professional. Persistent stress can impact a child’s well-being and development, so don’t hesitate to seek help if needed. The well-being of children should be a priority. Taking these small steps to address their stress and show them that their concerns matter creates a positive impact on their mental and emotional health. Every child deserves the reassurance that they are not alone and that help is available whenever they need it. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Helping Children Cope with Stress – Practical Support Strategies Read Post »

Childhood Stress

Recognizing Stress in Children – From Newborns to School Age

#16 When we think of childhood, we imagine a carefree time full of happiness and play. As adults, it’s easy to overlook that children experience their own kinds of stress—even babies have their own challenges. Just like adults, children’s stress responses are unique to their age and environment. Recognizing these signs and understanding the root of their worries helps us support them as they navigate these emotions. Stress in Newborns and Babies: An Early Start to Anxiety Yes, it’s true—even babies experience stress. Though they can’t express it in words, they feel anxiety due to various factors, like separation from their mother, overstimulation, hunger, or discomfort. Newborns are deeply sensitive to their surroundings and can even sense tension or stress from their caregivers. Since they cannot communicate through language, crying becomes their way of expressing these feelings. Creating a predictable and soothing environment with consistent routines, gentle touch, and calm surroundings can work wonders for a baby’s sense of safety. It may surprise you, but babies have a keen awareness of the world around them. They respond to the security and calm provided by those closest to them. Everyday Stressors for Toddlers and Preschoolers As children grow, their concerns shift along with their age. Toddlers and preschoolers often feel stress around separation from their parents or primary caregivers, particularly in new settings or at the beginning of school. Additionally, exposure to loud sounds, chaotic environments, or constant change can leave them feeling overstimulated or uneasy. It’s important for caregivers to recognize that what may seem insignificant to an adult can be overwhelming for a young child. Acknowledge their feelings, provide calm reassurance, and help them ease into new situations at their own pace. Small steps like talking them through the day’s plan or letting them know you’ll be there soon can help make a difference. Older Children: Stress in the School Years For older children, especially school-aged kids, stress takes on a new form. Academic pressures, the desire to fit in with peers, or a busy schedule of extracurricular activities can contribute to their stress. If a child’s schedule becomes too packed, they may start to show signs of burnout. Some children might complain of feeling “too busy” or may begin resisting certain activities. At home, they may show more signs of frustration, defiance, or become more withdrawn. It’s also worth noting that kids pick up on adult stress. They notice conversations about work, financial struggles, or family conflicts. Even news stories they see on TV about accidents or disasters can make them worry about safety. Providing a calm, stable atmosphere and a reliable routine at home can offer significant support. Recognizing and acknowledging a child’s stress is the first step toward helping them cope. A little attention and reassurance go a long way in helping children manage these complex feelings. In my next post, we’ll talk about ways to help children cope with stress in a healthy and effective way. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Recognizing Stress in Children – From Newborns to School Age Read Post »

Scroll to Top