Scabies (खरुज): A Family Skin Infection You Shouldn’t Ignore
Scabies Is caused by insects mites. Mites burrow tunnels into the skin. They lay eggs, leave poop : excreta, inside the tunnels. Allergy to mite, eggs or poop causes small itchy bumps and blisters. What to do. Scabies is a disease of family. Treating one child may not solve the problem. —————————— खरुज करणाऱ्या किड्यांना माइट्स असे म्हणतात. खरुज लहान मोठ्या कोणालाही होऊ शकते. रोज स्वच्छ आंघोळ करणाऱ्यांनाही खरूज होऊ शकते. खरजेचे किडे कातडी मध्ये स्वतःसाठी बोगदे खोदतात. अंडी घालतात, शी करतात. बोगद्यांच्या आतील किडे, अंडी किंवा शी च्या ऍलर्जीमुळे लहान खाज सुटते. कातडीवर पुरळ येते. फोड येतात. १. खाज सुटणे. (ही एक संवेदना sensation आहे) रात्री वाढते.२. पुरळ, कातडीच्या वर उठून दिसणारे.३. लांब, दोरीसारखे, एकमेकांना जोडलेले, किंवा वळणावळणाचे. लालसर.४. जाड, खवले, ओरखडे असलेली कातडी.(खाजवून ओरखडे येणे ही एक कृती action आहे)५. लहान मुले चिडचिड करतात. किरकिर करतात, रडतात.६. शरीराच्या कोणत्याही भागावर खरजेचे पुरळ येऊ शकतात.७. हातांवर (बोटांमधील खोबणी)८. मनगट, कोपर, हाताखाली. काखेत.९. कंबर, जांघेत.१०. मुलांचे डोके, चेहरा, मान, तळहात, तळपाय.११. खरुज हा संपूर्ण कुटुंबाचा आजार आहे. तो संसर्गजन्य आहे. एकमेकांचा एकमेकांना लागतो. स्पर्श, कपडे, अंथरुण पांघरूण , शाळेत, मोठ्या एकत्र कुटुंबात तो पसरतो. आईने काय करावे. १. माइट्स किड्यांवर उपयुक्त क्रीम किंवा लोशन. (सुरक्षिततेसाठी लोशन लहान मुलांचे हात पोचणार नाहीत असे उंचावर ठेवा) फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या. डॉक्टर बेंझिल बेंझोएट किंवा परमेथ्रिन मलम किंवा क्रीम देऊ शकतात. २. औषध लावण्यापूर्वी मुलाच्या अंगावरील सर्व कपडे काढून मुलाला उघडे करणे आवश्यक आहे. संपूर्ण अंगाला लावा (मानेखाली, पायाच्या नखापर्यंत, मागून पुढून). रोज रात्री झोपण्याआधी. (८ ते १० तास त्वचेच्या संपर्कात). सकाळी आंघोळ घाला. स्वच्छ कपडे घाला. इस्त्री केली तर फारच छान. कपडे निर्जंतुक होतात. किडे व त्यांची अंडी देखील मरतात. सलग ३ दिवस औषध लावा. ३. नखे कापून बोटांच्या टोकांवर औषध लावा. ४. खरूज म्हणजे स्केबीज चे निदान बरोबर असेल तर २४ तासांनंतर नवीन पुरळ यायला नको. ५. गरज पडल्यास पंधरा दिवसांनी परत एकदा औषध लावावी लागते. गरज पडल्यास असे तीन वेळा लावता येते. ६. कधीकधी खाज कमी करण्यासाठी औषध द्यावे लागते. ७. खरुज टाळण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांना, जवळच्या मित्रांना लक्षणे नसली तरीही त्वचेचे औषध लावा. कपडे गरम पाण्यात शक्यतो उकळत्या पाण्यात धुवा, उन्हात वाळवा. इस्त्री करा. त्यामुळे खरुज आजार निर्माण करणारे किडे, माइट्स, त्यांची अंडी मरतात. ८. पू, सूज, जिवाणू bacteria संसर्ग असल्यास, डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊ शकतात. खरुज हा कुटुंबाचा आजार आहे.फक्त एखाद्या मुलावर उपचार करून प्रश्न सुटणार नाही. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)
Scabies (खरुज): A Family Skin Infection You Shouldn’t Ignore Read Post »











