Dr. Anil Mokashi

sinhagad-fort-pune

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची )

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर – गोष्ट भारतीय इतिहासाच्या मालिकेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आधी चार-पाचशे वर्षे महाराष्ट्रात सुलतानांची जुलमी राजवट होती. ते माणसांना माणसांसारखे वागवत नव्हते. जनावरांसारखे वागवत होते. सुलतानांनी नेमलेले वतनदार जनतेला छळत होते. त्याकाळची ही गोष्ट आहे. सिंहगडाची. खूप उंच डोंगर. त्यावर गड. सिंहासारखा. म्हणून त्याचं नाव – सिंहगड! पूर्वी याचं नाव कोंढाणा होतं! कोंढाणा म्हणजे शूरवीरांचा डोंगर. कोंढाणा डोंगर दिवसात झोपलेला असायचा – शांत, निवांत, गडावरच्या पक्ष्यांसारखा. पण शत्रू जवळ आला की, तो जागा व्हायचा – सिंहासारखा गुरगुरणारा, वाऱ्यासारखा झेपावणारा! कोंढाण्याच्या पायथ्याला शूर लोक राहत होते – धाडसी, रक्षण करणारे! कोणी शेतकरी, कोणी लढवय्ये, कोणी गड राखणारे. एका रात्री, गावात बातमी आली “शत्रू येत आहेत! किल्ला घ्यायला!” पण लोक घाबरले नाहीत. एक धाडसी तरुण पुढे आला. त्याचं नाव होतं भिला. भिला म्हणाला: “आपण गडावर राहतो. तो आपला आहे.गड राखणं हे आपलं काम आहे. कोण कोण येणार माझ्याबरोबर. सगळे धावत आले – मुलं, मोठे, बायका, आजी-आजोबा सर्वांनी मिळून कोंढाण्याच्या मुख्य दरवाजाला लोखंडाची जाड मोठ्ठी साखळी बांधली. शत्रू आले, पण त्यांना आत येता आलं नाही. सामान्य लोकांच्या धाडसामुळे गड टिकला. शत्रू हरला. कोंढाणा हसला. म्हणाला: “माझे लोक जागे आहेत. मी झोपणार नाही!” हे डोंगर, हे किल्ले, हे आपलं इतिहासाचं धन आहे! म्हणा सगळ्यांनी: कोंढाणा उंच होता!कोंढाणा शूर होता!कोंढाणा आपला होता!कोंढाणा झुकला नाही!कोंढाणा हरला नाही!आपणही शूर वीर बनूआपल्या देशाचा गड राखू! छत्रपती शिवाजी महाराज की जय.भारतमाता की जय.जय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची ) Read Post »

Joyful family moment in park with kids playing among colorful autumn leaves.

समजून घ्या बालविकासाचे टप्पे

“लहान मूल” ही “मोठ्या माणसा”ची छोटी प्रतिकृती नसते! हे बालपणाच्या विज्ञानाचं मूलभूत तत्व आहे.गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून ते मुलगा “पुरुष” आणि मुलगी “स्त्री” होईपर्यंत, हा विचार लागू राहतो.बालपणाच्या प्रत्येक टप्प्यात हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं.बालरोगतज्ज्ञांना हे चांगलंच माहीत असतं. पण त्यातील काही गोष्टी पालकांना आणि कुटुंबालाही समजायला हव्यात.मुलांची जबाबदारी घेताना, प्रत्येक टप्प्यात त्यांच्या गरजा, शरीर, मन आणि विकास समजून घेणं आवश्यक असतं. १. शरीररचना आणि कार्यातील फरक (Anatomy and Physiology) २. औषधोपचारातील फरक (Pharmacology) ३. विकासाचे टप्पे (Developmental Stages)जसं फुलपाखराला अंड्यापासून फुलपाखरूपर्यंत टप्पे असतात,तसं माणसाच्या जीवनातही विकासाचे टप्पे असतात: गर्भावस्था०-९ महिनेशरीर व मेंदूची प्राथमिक घडण नवजात०–२८ दिवसश्वसन, तापमान नियंत्रण, स्तनपानशैशव१ महिना – २ वर्षेवेगाने शारीरिक वाढ, भाषा विकास शालेयपूर्व२ – ५ वर्षेहालचाली, सवयी, भावबंध शालेय वय६ – १२ वर्षेबौद्धिक, सामाजिक वाढ किशोरावस्था१२ – १८ वर्षेलैंगिक परिपक्वता, स्व-ओळख तारुण्य व वृद्धावस्थापुढे…जबाबदाऱ्या, मानसिक समतोल ४. मानसिक आणि सामाजिक गरजा निष्कर्ष:बालक म्हणजे फक्त छोटा माणूस नव्हे – तो स्वतंत्र टप्प्यावर असलेला, सतत बदलत जाणारा, संवेदनशील जीव आहे.त्याचा विकास समजून घेणं हेच खऱ्या अर्थानं जागरूक पालकत्व ठरतं. जागरूक पालकत्वासाठी टिप: “आजारी पडलं की डॉक्टर” हे जुने धोरण आता पुरेसं नाही.“मुलासाठी डॉक्टर” हेच नव्या काळाचं योग्य धोरण! शुभेच्छा – जागरूक पालकत्व, निरोगी बालपण! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

समजून घ्या बालविकासाचे टप्पे Read Post »

An attentive girl helps her younger brother concentrate on homework in a cozy home setting.

गृहपाठाचा “फंडा”

गृहपाठात पालकांनी लक्ष घातले तर मुलांना शिक्षणात निश्चितपणे यश मिळते. गृहपाठ किती महत्वाचा आहे हे त्यामुळे मुलांना कळते. गृहपाठात मदत करण्याचे अनेक फायदे असतात. शिवाय पालकांनाही एखादी नविन गोष्ट शिकायला मिळते. मदत कशी करायची. गृहपाठाचा हा ‘फंडा’ लक्षात घेतला तर ‘अतिच गृहपाठ देतात ‘म्हणून शाळेला दोष देण्याची पाळी येणार नाही आणि गृहपाठ म्हणजे एक ‘शिक्षा किंवा कटकट’ न वाटता शिक्षणाचे एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघता येईल. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

गृहपाठाचा “फंडा” Read Post »

Joyful boy celebrating a soccer win outdoors in Portugal.

प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती

#45 प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती आहे मित्रांनो, तुम्ही दैदिप्यमान, यशवंत, कर्तृत्ववान, आहातच. ते तर तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केले आहेच. आता लक्ष घालावे, स्वतः सज्जन होण्यावर.जागरुक, विश्वासार्ह, कामाचा माणूस बनण्यावर. ॥ १ ॥ नवीन काहीही, निर्माण करायचे असेलतर नव निर्मात्याला, कष्ट, त्रास हे होणारचनिर्मितीला अचानक, अडकाठी आली तरमुकाट्याने ती, सहनही करावी लागणारजन्माच्या आधी, फुलपाखरू तयार होणारअंड्याच्या कठीण कवचाच्या, कोंडवड्यातचअशा कठीण परिस्थितीत, परीक्षेच्या काळीजाणीवपूर्वक, विनयाने वागा, अशा वेळी ॥ २ ॥ ज्याच्या जे मनात,तसे प्रत्यक्षात घडणारनैराश्यग्रस्त मनात,आनंद कसा येणारउत्साही माणसाला,जग रंगीत दिसणारउदासीन माणसात,उत्साह कुठून येणार ॥ ३ ॥ आधी स्वतःची, स्वतःवर, जबाबदारी घ्यावीनंतर इतरांची, समाजाची, जगाची घ्यावीआपले यश कष्टाने, आपणच मिळवावेदुस-या कुणी, का, आयते पदरात टाकावेआत्मविश्वासाने भीड, हाती घेतल्या कामाला‘हे तर मी सहज करेन’, ध्येय असायला ॥ ४ ॥ ध्येयाच्या आड येतात, अनेक मोह मायावीवेळीच ‘नाही’ म्हणायची, धमक मात्र हवीज्ञानाच्या प्रकाशात, जो उजळून तळपतोअज्ञानाचा अंधार, तो मनात कुठे उरतोअशा स्वयंप्रकाशी व प्रेरित व्यक्तिमत्त्वालाकोण येणार नाही, आदराने सुस्वागताला ॥ ५ ॥ तरुणाईच्या उर्मी, उर्जेत, जोशाच्या काळात,सर्वांना अपार कष्टच, करावे लागतातनुसती रिकामी, दिवास्वप्नंच जे बघणार,अशांचा कधी, कुणाचा, झाला आहे बेडा पारज्याचा स्वतःवर अटळ असा विश्वास आहे,त्यालाच ठरवेल ते करता येणार आहे ॥ ६ ॥ शिकायचेच आहे, त्याला अडचण नसतेइच्छा व प्रयत्नांना हमखास यश मिळतेकष्टाने, नेमलेला अभ्यास, संपूर्ण करावाएकचित्ताने समर्पित होऊन तो करावाहाती काम आणि डोकी ज्ञान, अभाग्या मिळेनामाणूस का म्हणावे, त्याला जनावर म्हणाना ॥ ७ ॥ जगात संस्कारी, आदर्श माणसे असतातत्यांच्या संपर्कात राहून, जपा आपले हितगुणी लोकांकडे शिका, त्यांना आनंद होईलत्यांचे आचार विचार, सर्वांचे भले करेलतन, मन, धन, सर्वस्व, कामात झोकून द्याआपल्या कर्तृत्वाचा फायदा, सर्वांना होऊ द्या ॥ ८ ॥ लहानपणी, कौशल्य व ज्ञान, कसे असेलवडिलांच्या जबाबदा–या, कशा पेलवतीलशिस्तबद्ध, अभ्यास करा, काम करा, कष्टानेवेळीच, गुरु येई, मार्ग दाखवाया नेटानेमनापासून, निष्ठेने,धरा शिक्षणाची, आसकधी येणार नाही, अपयश ते, आसपास ॥ ९ ॥ आवडते काम, जो मन लावून करणारआयुष्यभर यशस्वी, सुखी व धन्य होणारजितकं सखोल ज्ञान, आणि प्राविण्य, मिळालंस्थळ, काळ, वेळ, भानच सगळं हरपलंतहान भूक हरपून, विसरा राग लोभामन तरंगायला लागेल आनंदाचे डोहा ॥ १० ॥ पंचेंद्रिये, जगाची ओळख, मेंदूला देतातचूक काय, बरोबर काय, माहिती देतातज्ञानाची, जिज्ञासा, निर्माणच, करावी लागतेआजची, गरज बघून, मिळवावी लागतेधैर्याचे पुढचे पाऊल, यशो शिखरी पोचेचणे खावे लोखंडाचे, तेंव्हा ब्रम्हपदी नाचे ॥ ११ ॥ चौकसपणाने, कणाकणाने, ज्ञान वेचावेमौल्यवान आयुष्य, ज्ञानाविना, वाया, न जावेमनाला, हळूहळू, योग्य वळण, लागणारउजळणीने, दडलेला अर्थ, उमजणारसज्जनांच्या, संगतीतच, खरी, समज येतेलोखंडाचेही, परिसाच्या स्पर्शाने, सोने होते ॥ १२ ॥ पुस्तकी ज्ञानाने, जगाची ओळख, होत नाहीकेल्याने, जे होत आहे, ज्ञानाने ते, होत नाहीगाईड वाचून, शिकण्याचा मार्ग, खरा नाही‘दहा दिसात, फाडफाड इंग्लिश,’ खरे नाहीशिकायचे असेल, तर, पाठ्य पुस्तक हवेशिक्षकाचे, बोट धरूनच, चालायला हवे ॥ १३ ॥ पळा, पळा, कोण पुढे पळे, तो धापा टाकेलयश मिळाल्यावर, त्याला, ‘ग’ ची, बाधा होईलस्वतःला कधी, ‘सर्वशक्तिमान’, समजू नयेसामाजिक जाणीवेने, व्यवहार करणारेहिंमत वाढवाया, साथीला, असलेले बरे ॥ १४ ॥ माहितीच्या शस्त्राने, लुबाडणूक बरी नाहीज्ञानाचा दुरूपयोग, शिक्षणाचे ध्येय नाहीखरे शिक्षण, हे, योग्य वागायला, शिकवतेचांगले शिक्षण, हे, स्वनियंत्रण शिकवतेमिळाल्या, शिक्षणाचा, सर्वांना, उपयोग व्हावाअसा उपक्रम, हाती घ्यावा, पूर्णत्वास न्यावा ॥ १५ ॥ आपल्या आवाक्या, बाहेरही, गोष्टी घडणारबना आपण, आपल्या जीवनाचा, शिल्पकारस्वतःची यशोगाथा, स्वतःच हवी, लिहायलादुस-यावर विसंबला, कार्यभाग बुडाला ॥ १६ ॥ धरतीवर, जमिनीखाली, आणि आकाशातज्ञानाची भांडारे, भरली आहेत, काठोकाठत्याची रहस्ये, गुरूशिवाय, कुणा समजेनापण आजकाल, गुरूला, कुणीच, विचारेनाशिक्षक प्रसन्न झाला, तरच ज्ञान मिळेलतो शिकण्याचे, अनेक, छान मार्ग, शिकवेल ॥ १७ ॥ जग चालवणारा, लाखोंचा पोशिंदा, तो कोणसृष्टी, सचेतन करणारा, आहे तरी, कोणमनाच्या आतली, प्रेरणा, ती कुणाला, दिसेनास्फूर्ती देणारी भावना, ओळखायला येईनाप्रेरणा, ही, चांगल्या कामामागची, शक्ती आहेतिची, जोपासना करणेही, गरजेचे आहेजग काय म्हणेल, याची, उगा चिंता, सोडावीमनातले ऐकून, आनंदाची, वाट धरावी ॥ १८ ॥ यशस्वी विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती Read Post »

Child Doctor

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत!

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत! बहुतेक वेळा बाळ आजारी पडलं तरच आपण डॉक्टरांकडे जातो.पण खरंतर बाळासाठी, आणि ते आजारी पडू नये म्हणून डॉक्टरांकडे जावं लागतं. बाळ महत्वाचं आहे.बाळ निरोगी ठेवायचं असेल, तर “काय करायचं?” आणि “काय टाळायचं?” हे डॉक्टरांकडून शिकावं लागतं. माहितगाराशी अपूरा संपर्क ही एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे. आई–डॉक्टर नातं कसं असावं? “विद्यार्थिनी – शिक्षक” असावं “ग्राहक – व्यापारी” नको डॉक्टर केवळ उपचार देत नाही – ते मार्गदर्शन करतात.डॉक्टरांचा पेशंटवर विश्वास असेल, तर ते जबाबदारीने निर्णय घेतात.विश्वास नसेल, तर फक्त तपासणी करून चिठ्ठी देतात. डॉक्टरची निवड करताना लक्षात ठेवा… आपल्या शिक्षणपद्धतीत बाल संगोपनाचं वैज्ञानिक शिक्षण नसतं.बाळाच्या गरजेनुसार आईला वेळीवेळी नव्याने शिकावं लागतं.हे काम डॉक्टर करू शकतो – आणि करायलाच हवं. डॉक्टर – आई – बाळ : एक सहजीवन आपुलकीचे संबंध हवे डॉक्टरच आदर्श माता घडवू शकतो. बाळासाठी डॉक्टर हवे – फक्त आजारासाठी नव्हे! बेस्ट लक! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत! Read Post »

baby Playing

पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा! – बालविकासाचा मंत्र

“पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा!”हा बालविकासाचा नवा मंत्र आहे. बाळांनी झोपावं पाठीवर, खेळावं पोटावर. याला “पालथा खेळ वेळ”, Tummy Time म्हणतात. पालथा वेळ – कधी सुरू करावा? बाळ जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासूनच पालथा वेळ सुरू करता येतो.आईच्या पोटावर, छातीवर – स्तनांच्या मध्ये बाळाला सुरक्षित व मायेने पालथं ठेवून सुरुवात करता येते.हे बाळाला आवडतं, कारण त्याला आईचा उबदार स्पर्श, नजरेचा संपर्क आणि आवाज मिळतो.ही जवळीक बाळात विश्वास, प्रेमाची जाणीव, आणि संवेदनशील परस्परसंवाद निर्माण करते. पालथा वेळ का महत्वाचा आहे? १. मेंदूला चालना मिळते २. स्नायू बळकट होतात ३. डोक्याचा सपाटपणा टाळतो ४. श्वसन सुधारते. ५. दृष्टी आणि समन्वय सुधारते. ६. शरीराबाबतची जाणीव वाढते ७. भावनिक विकासास हातभार ८. विकासातील अडथळ्यांपासून संरक्षण बाळ उशिरा उलटतं, बसतं, उभं राहतं डोकं चपटं होऊ शकतं हात-खांद्यांचा समन्वय कमी होतो ९. भविष्याच्या विकासाची पायाभरणी पालथा वेळ – किती आणि कसा द्यावा? दिवसातून काही मिनिटांचा हा पालथा खेळ वेळ,बाळाच्या आयुष्यात मोठा फरक घडवतो!हे खेळाच्या रूपात करा.बाळाच्या जवळ रहा, संवाद साधा, हसा, गा, प्रेम द्या!तुमचं बाळ हसतं, खेळतं, बळकट होतंय हे अनुभवणं हीच सर्वात मोठी भरभराट आहे! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा! – बालविकासाचा मंत्र Read Post »

Group of kids bullying another child at school, signaling peer pressure and harassment.

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” ही एक गंभीर समस्या आहे. लक्ष ठेवा बरं का! मुलांच्या भोवतीचं सामाजिक वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक आहे की हानीकारक आहे हे कुणी तरी जबाबदारीनी बघावं लागतं. मुलांसंबंधी एखाद्या गोष्टीसाठी बरेच लोक जबाबदार असल्यावर, कुणीच जबाबदारीने वागत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवतात. नुकसान मुलांचे होते. कधी कधी कायमस्वरूपी होते. गंभीर होते. दुर्दैवी देखील होऊ शकते. मोठी समंजस मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन, पालक, संबंधित डॉक्टर यांना समस्येबद्दल परिपूर्ण माहिती व जागरूकता असायला हवी. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण टोचते. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण खोलवर टोचते. मुलांचं मन दुखावते. आत्मविश्वास खचवते. त्यांचं हसणं, खेळणं, शिकणं सगळंच बिघडते. छळवादी दांडगाई’ चे शिकार आणि शिकारी दोन्ही मुलेच असतात. दोघांच्याही कडे लक्ष देण्याची गरज आहे. छळ म्हणजे साधं भांडण नाही, साधी चिडवाचिडवीही नाही.तो मुद्दाम, सहेतुक, वारंवार, आणि एखाद्यालाच लक्ष्य करून केला जातो — त्याला त्रास द्यायचाच हेतू असतो. `छळवादी दांडगाई’ चे प्रकार. १) शारीरिक छळ. मारहाण, ढकलणे, वस्तू फेकणे, शारीरिक इजा. २) शाब्दिक छळ. नावं ठेवणे, उपहास, चिडवणे, टोमणे, धमक्या, शिव्या, छेडखानी, अश्लील बोलणे. ३) मानसिक सामाजिक छळ. चिडवणे, दुर्लक्ष करणे, एकटा पाडणे, सामूहिक बहिष्कार, अफवा पसरवणे, इतरांना भडकवणे. ४) सायबर छळ (सायबरबुलिंग) मोबाईल, सोशल मीडिया, मेसेजेस, ई-मेल अपमान, धमकावणे, फोटो, व्हिडिओ दुरुपयोग. ५) गंभीर गुन्हे. रॅगिंग, लैंगिक, गटाने, शस्त्राने हल्ला, ॲसिड हल्ला. हुंडा यांच्यात मुलांचा सहभाग. मुलं अशी का वागतात कारण त्यांना चांगले वागावे चुकीचे वागू नये हे कुणी कधी शिकवलेच नसते. ना घरी ना शाळेत. त्यांनी अशी वागणूक पाहिलेली असते. अनुभवलेली असते. “हे चुकीचं आहे” असं त्यांना कुणी सांगितलेलंच नसतं. ‘छळवादी दांडगाई’ बाबत शंकेखोरच असायला हवे” दर तीन मुलांपैकी एकाला छळवादी दांडगाईचा अनुभव आलेला असतो. मुलींना सुद्धा. इतकी या समस्येची व्याप्ती मोठी आहे. एक सडका आंबा अख्खी अढी नासवतो. दोनचार गुंड पुंड एकत्र येऊन लांडगे झाले, की ते दहा बारा कोकरांपैकी कुणाला तरी एकटे पाडून लक्ष्य करू शकतात. बाकीचे प्रेक्षक होतात. किंवा सहभागी होतात. मूल`छळवादी दांडगाई’ चा शिकार असल्याचा संशय यायला हवा. मुलांचं जेवण, वजन, झोप, बोलणं, वागणं अचानक बदलतं. डोकं दुखतं, पोट दुखतं, उलट येते अशी वारंवार तक्रार येते. पण तपासण्यात काहीच आजार सापडला नाही तर समजावं, कारण मानसिक आहे. दडपण आहे. ताण तणाव आहे. छळवादी दांडगाईची डॉक्टरांना शंका यायला हवी. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. वर्गात गटबाजी, टोमणे, सामाजिक सुसंवाद यावर शिक्षकांचे लक्ष द्यायला हवे. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. मूल जर वारंवार शाळेत जायचं नाही, तो मला त्रास देतो. असं म्हणत असेल. गप्प गप्प, एकटा रहात असेल. घाबरलेला, भेदरलेला वाटत असेल तर पालकांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. मुलांशी बोला. बोलतं करा. मित्र, खेळ, वर्गातील, दिवसभरातील घटनांबाबत गप्पा मारा. काहीतरी सूचक सापडतेच. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. छळवादी दांडगाई थांबवली पाहिजे. दुष्परिणाम टाळायला पाहिजे. छळ सहन करणारी मुलं स्वतःला कमी लेखतात. स्वतःमध्ये गुरफटून जातात. त्याला शाळा, माणसं नकोशी वाटतात. बालपण हरवतं. ते एकटे पडतात. कधी कधी आत्महत्येपर्यंतही विचार जातात. आणि छळ करणाऱ्या मुलांना वाटतं की तेच स्ट्राँग, गटनायक हिरो आहेत. त्यांना गुंडगिरी करण्याचा निसर्गदत्त हक्क आहे. दुर्लक्ष झाले तर पुढे जाऊन ते गुन्हेगारीकडेही वळू शकतात. ग्रुपचा गट. गटाची गँग. गँगची कंपनी होऊ शकते. उशीर झाल्यावर चुकीची संगत लागली म्हणून चालत नाही. जागरूकता, सतर्कता, हा एकमेव मार्ग आहे. जागरूकता आणि संशयाचं तीक्ष्ण भान — हाच एकमेव उपाय! छळवादी दांडगाई थांबवा. बालपण वाचवा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या Read Post »

Happy Family

मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी

मी एक ‘चांगला माणूस’ बनेन.माझा मीच ठरवून चांगला बनेन.हाताला काम असेल, डोक्यात ज्ञान असेल — तोच खरा माणूस. नसेल, तर तो फक्त सजीव. चांगलं व्हायला शिकावं लागतं. चांगलं वागायलाही शिकावं लागतं. रोज थोडं थोडं ठरवून चांगलं वागत गेलो, तर आयुष्य सुंदर होतं. हे अजिबात कठीण नाही — अगदी सोपं आहे! कुटुंब हीच आपली खरी ताकद असते.कुटुंब म्हणजे आपल्या माणसांचं बंध, आपुलकी आणि आधार. फक्त रक्ताचं नातं म्हणजे कुटुंब नाही. जसे आहेत तसे एकमेकांना आपलं मानणं,जुळवून घेणं, हेच खरं कुटुंब.कुटुंबासाठी जगावं. कौटुंबिक जीवन समाधान आणि शांती देतं. कुटुंबाशिवाय जीवन म्हणजे मुळापासून अलग झालेलं झाड — उखडलेलं रोप. रोजच्या साध्या साध्या गोष्टींनी आपण चांगले होतो.घरात सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत जेवणं. जेवण तयार करणाऱ्याला “वा, मस्त!” अशी दिलेली दाद. घरातल्या स्त्रियांशी सन्मानाने वागणं,सर्वांशी आपुलकीने बोलणं.तिरकस, कुजकट बोलणं टाळणं. भांडणं न करता — समजूतदारपणानं वागणं.घरातली कामं आनंदानं करणं.या साध्याच साध्या गोष्टी चांगला माणूस बनवतात. त्यासाठी ना मोठं तत्वज्ञान लागतं, ना अध्यात्म. संवाद, सन्मान आणि संयम समृद्ध कौटुंबिक जीवनाची त्रिसूत्री.कुटुंब म्हणजे संवाद. घरातल्या माणसांशी नम्रतेने बोलावं.खेकसून बोलल्याने शब्द संपतात, पण मन ओरखडून जातं. योग्य वेळ, योग्य शब्द, योग्य प्रमाण — हाच संवादाचा मंत्र. मनातला राग, स्वार्थ, मत्सर, अहंकार — हे संसार उध्वस्त करतात. त्यामुळे कुणाला ओरबाडून काही मिळवण्याचा हव्यास नको. मी, कुटुंब आणि मग दुनियादारीप्रथम मी स्वतःची जबाबदारी ओळखावी. मग कुटुंबाची. आणि मग समाजाची. दुनियादारी म्हणजे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रसंगी त्याग करणं. स्वतःच्या वागणुकीवर लक्ष देणं. सज्जन माणसांच्या सहवासात राहणं. घरात प्रेम, संयम आणि समंजसपणा असेल, तर बाहेरच्या जगात वागणं सोपं आणि सहजसाध्य होतं. “मी, माझं, मला” करत राहिलो, तर दुसऱ्याला आपलं कसं म्हणणार?कुटुंबसंस्था हे आपल्या भारतीय संस्कृतीचं सर्वात मोठं बलस्थान आहे. ती पूर्वापार लाभलेली अमूल्य देणगी आहे.ती समजा, आणि जीवापाड जपा. हेच खरं — मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी Read Post »

Pediatrist

Pediatric one liners

Pediatricians, doctors and paramedical health providers need simple short messages. This is an attempt to reach child care service providers. Transfer of child care technology to masses is our aim and objective. That is our mission. You type any topic in search and you will get up to date carry home messages on that topic. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Pediatric one liners Read Post »

Silhouette of a mother lifting her child at a sunset beach, capturing warmth and love.

मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी

“मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”.आईनी मोठं व्हावं ? आईनी कसं मोठं व्हावं ? आज मातृदिना निमित्त सांगताहेत. डॉ. अनिल मोकाशी. “एकटी एकटी घाबरलीस ना” गाण्यात चिंटू म्हणतो, ‘मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही’. ते गाण्यात गोड वाटतं. पण प्रत्यक्षात मुलांबरोबर आईलाही मोठं व्हावंच लागतं. “मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. लहान बाळाची, शाळेतल्या मुलाची, वयात येणा-या मुलांची, तरुण मुलांची, मोठा माणूस झाल्यानंतर, आईला वयाप्रमाणे वेगळे वागावेच लागते. ही बदलाची प्रक्रिया सुरळीत ठेवणे, यात तर खरं आईचं कौशल्य आहे. बाळाच्या पहिल्या श्वासापासून आईच्या  शेवटच्या श्वासापर्यंत हे ‘आईपण’ अव्याहत अबाधित रहातं. आईचं दूध, बाल संगोपन, याही पलीकडे, त्याला घडवणं हे आईच्या जन्मभराच्या साथीनेच होतं. जिजाउंनी छत्रपती शिवाजी घडवले, हीराबेन यांनी साधेपणात, शिस्तीत नरेंद्र मोदी घडवले. काळ कुठलाही असो, ‘संस्कार’ देणे, जीवनाला उद्दिष्ट देणे, क्षमता देणे, हे आईचेच कर्तव्य असते. आई होणं नैसर्गिक असलं तरी ‘बालपणाचे विज्ञान’  आणी ‘आईपणाची कला’ शिकायलाच हवी. मूल वाढतं, परिस्थितीही सतत बदलते. आजच्या आईला ‘श्यामची आई’ होऊन कसे चालेल? १. नवजात बाळ १०० % पूर्ण आईवर अवलंबून असतं. आई किंवा आईसारखी दुसरी कुणीतरी, २४ तास, ड्युटीवर हवीच. तिच्या नुसत्या असण्याने, दिसण्याने, नजरेने, स्पर्शाने, आवाजाने, वासाने, हाताळण्याने बाळाला जग सापडतं. आईची सोबत बाळाला भावना शिकवते. आईच्या हातात आपण सुरक्षित आहोत हे त्याला समजते. हे काम तिला शिकूनच घ्यावे लागते. २. दुडू दुडू चालण्याच्या वयात बाळाचं कुतूहल जागं होतं. घरातले शिक्षण चालू होते. मुलं चालतात, बोलतात, ऐकतात, पहातात, अनुकरण करतात. प्रश्न विचारतात. आई मुलाचा आरसा बनते. त्याला चालू द्यावे, पळू द्यावे, चढू द्यावे, बोलू द्यावे. स्वतःच्या हाताने खाऊ द्यावे. भरवू नये. लहान बाळ मोठं करण्याची हौस भागली नाही म्हणून त्याला मोठं होऊच द्यायचं नाही. असं करून कसं चालेल. त्याचं त्याला समजू दे, ‘आता आपण मोठं झालो आहे’. आणि आता आपल्याला मोठ्या मुलांसारखं वागायला हवे. लहान बाळासारखं वागून चालणार नाही. दुस-या वाढदिवसाला बाळ आईपासून सुटं व्हायला हवं. लळालोंबा नको. हे काम तिला शिकून घ्यावेच लागते. ३. शालेय वयात घराबाहेरील जगात प्रवेश होतो. घराबाहेरचे शिक्षण चालू होते. शाळा, मित्र, शिक्षक, पुस्तकं, बाहेरचं, त्याचं स्वतःचं, जग निर्माण होतं. आणि तो त्याच्या स्वतःच्या जगात शिकू लागतो. शिवाजी रायगडावर, द-याखो-यात घडतो. पु. लं. देशपांडे बटाटयाच्या चाळीत घडतो. आर.के. नारायणन मालगुडीतच घडतो. पण या सगळ्या घडण्याला आईची साथ आवश्यक असते. साथ. आधार. मार्गदर्शन. हे चांगल्या सवयी लावण्याचं वय आहे. सवयी काय, लावाल तशा लागतात. चांगल्या लावल्या, चांगल्या लागतात. वाईट लावल्या वाईट लागतात. वेळेचं भान शिकवावं लागतं. वेळापत्रक फक्त शाळेचंच नसतं. घरचंही वेळापत्रक असतं. आणि आईने ते पाळायची सवय लावावी लागते. ‘मेरी मर्जी’ नही चलेगी. हे कधीतरी स्पष्टपणे सांगावं लागतं. मुलांची वाढ, मानसिक, भावनिक, बौद्धिक, शैक्षणिक विकास, आहार, लसीकरण, आजारात काळजी या गोष्टी तिला शिकून घ्याव्याच लागतात. ४. किशोरवयात मुलाची स्वतःची ओळख निर्माण व्हायला लागते. आयुष्याचा हा टप्पा सगळ्यात खडतर, सगळ्यात महत्त्वाचा असतो. शरीर, भावना, विचार, मैत्री — सारं काही ढवळून निघतं. या काळात आईनी हुकूमशहा बनून कसे चालेल? तिला संवाद साधण्याची कला आत्मसात करावी लागेल. मुलाच्या कलाकलाने घेऊन, त्याला बोलते करणे महत्वाचे असते. तुम्ही त्याला बोलायला शिकवलत, आता त्याचं ऐकायला शिका. सूर तक्रारीचा, हटकायचा नको, समजावण्याचा हवा. मोठं होणं म्हणजे जबाबदार होणं. स्वतःची स्वतः, कुटुंबाची, शेजार पाजारची, समाजाची, टप्प्या टप्प्याने वाढती जबाबदारी शिकवायला हवी. त्याच्यावर जबाबदारी टाकायला हवी. त्याच्यावर विश्वास आहे हे दाखवायला हवे. थोडं मोकळंही सोडायला हवं. पतंगाच्या मांजाला किती ढील द्यायची आणी किती ओढ द्यायची याचं तारतम्य शिकायला हवं. कला आहे ती. ५. तरुणपणाचे पंख फुटल्यावर. तो आपली वाट चालणारच ना? लक्ष ठेवावे. गरज असेल तेंव्हा साथ द्यावी. आधार द्यावा. धीर द्यावा. व्यसने, वाईट संगत अशा धोक्यांची जाणीव करून द्यावी. दिवस पाळीचे मित्र मैत्रिणी त्याचे त्यानी निवडावे. मात्र रात्रपाळीचे मित्र मैत्रिणी चालणार नाहीत. या कौटुंबिक मर्यादा, लक्ष॒मणरेषा आखून द्यायला हव्या. त्या निक्षून पाळायला लावाव्या. आपले मत मांडावे. पण हस्तक्षेप टाळावा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी आहे तुझ्या पाठीशी. असा पवित्रा असावा. हे सगळे या वयाच्या आईला शिकून घ्यावे लागेल. ६. मध्यमवय आणि वृद्धावस्थेतील  मुलाच्या आईला जरा लवचिक भूमिका घ्यावी लागणार. मुलाला मुलं असतील. तरी त्याच्या आईचाही रोल असतोच ना?  मूक निरीक्षक व्हावे. संयम बाळगावा. अनुभव अवश्य सांगावा. पण अंमलाचा आग्रह नसावा. हेही शिकून घ्यायला हवे. असा असतो आईचा रोल, काळाच्या ओघात बदलणारा. फुलपाखराच्या जशा अंडी, अळी, कोष आणी फुलपाखरू अशा अवस्था असतात, तशा मानवी जीवनाच्या देखील वयानुसार अवस्था असतात. कोणत्याही अवस्थेत प्रेम असतं तसंच राहतं, पण त्याची अभिव्यक्ती मात्र बदलायला हवी. आई कोणतीच परिपूर्ण नसते. पण नेहमीच साथीला असते. प्रत्येक युगात, प्रत्येक घरात, आणि प्रत्येक मुलाच्या मनात, आईसारखं दुसरं कोणीच नसतं. म्हणून तर मी म्हणतो, मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी. बेस्ट लक. मदर्स डे च्या शुभेच्छा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी Read Post »

School report card

School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ

It’s school result season. Annual progress cards are coming home. Both parents and teachers must learn to interpret them correctly. This is not just about marks — it’s about understanding the child. Scientific evaluation helps families take timely, appropriate action. शाळांचे निकाल लागण्याचे दिवस आहेत. प्रगती पुस्तके घरी येऊ लागली आहेत. पालक आणि शिक्षकांनी या प्रगती पुस्तकांचा योग्य अर्थ समजावून घ्यायला हवा. हे फक्त मिळालेल्या गुणांचेच नाही, तर मुलाच्या सर्वांगीण विकासाचे परीक्षण आहे. असे वैज्ञानिक मूल्यांकन केल्याने योग्य वेळी योग्य उपाययोजना करता येतात. Always above 80% in all subjects. Indicates Cognitive excellence. Indicates strong memory, attention span, and a well-rounded cognitive profile. He will learn anyway. He will learn well. He will learn independently. सर्वच विषयांमध्ये सातत्याने उच्च गुण मिळणे. नेहमीच सर्व विषयात ८० % वर.बौद्धिक क्षमता दाखवते. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि समतोल बौद्धिक विकास होतो आहे असे दाखवते. कसाही शिकेल. छान शिकेल. स्वतःहून शिकेल. Indicates Language Skills. Shows verbal intelligence, reading strength, and creativity. Difficulty in abstract reasoning or numerical logic. He needs further understanding efforts and study. भाषिक क्षमता चांगली आहे. कल्पकता आहे. पण अमूर्त, अस्तित्वात नसलेल्या संकल्पना व गणितामध्ये अडचणी आहेत. या क्षेत्रात अभ्यास, प्रयत्नाची व समज येण्याची गरज आहे. वाचून लिहून शिकेल. Sensory-Motor (five senses and movements) are good. & Spatial Skills are good. Reflects strengths in coordination, visual intelligence, and fine motor skills. he understands picture language better. Bring books with lot of pictures. Bring audio books. He will learn better by hearing and seeing. संवेदी-मोटर (पंचेंद्रिये व हालचाली) छान आहेत. जागा, अवकाश याची समज चांगली आहे. सुक्ष्म हालचाली, सौंदर्यदृष्टी व दृश्य समज छान आहेत. याला चित्रांची भाषा जास्त चांगली समजते. सचित्र पुस्तके वापरा.ओडीओ पुस्तके वापरा. तो ऐकून शिकेल. बघून शिकेल. Indicates emotional status. His behavior and discipline needs attention. May suggest emotional ups and downs, home stress, or variable motivation.The child may prefer doing nothing, rather than risk being scolded for mistakes. भावनिक स्थिती जरा अस्थिर असेल. वर्तणूक, शिस्त याकडे लक्ष द्यायला हवे. भावनिक उलथापालथ, घरचा, शाळेचा, बाहेरचा ताणतणाव. काहीही कृती करायची इच्छाच नसणे. काहीतरी करून बोलणी खाण्यापेक्षा काहीच करायचे नाही. म्हणजे कुणी बारीक सारीक चुकांसाठी रागावण्याचा प्रश्नच उरत नाही. The difficulty may lie within the child.Learning difficulties. Reading, writing difficulties. Indicates learning disability, attention deficit, or a mismatch in teaching style. If I can not learn the way you teach, teach me the way I learn. समस्या मुलात असण्याची शक्यता जास्त. शिकण्यात अडचणी. वाचन दोष. लेखन दोष. शिक्षण शैलीतील विसंगती, विचलित होणे. तुम्ही शिकवता, ते मला समजत नसेल, तर मला समजेल, असं तुम्ही शिकवा ना. He may have Practical Intelligence. Shows real-world understanding and communication skills. May struggle with rote memory or time pressure. A tortoise is not expected to run with a hare. He will learn better by doing things. Vocational education suits him. त्याला प्रात्यक्षिक बुध्दी चांगली असेल. व्यवहारज्ञान व संवादकौशल्य चांगले, पण पाठांतर व वेळेचे गणित जुळवण्यात अडचण असू शकते. कासवाने सशाच्या गतीने कसे पळावे? तो “करून शिकणारा”” मुलगा असेल. त्याला “व्यवसाय शिक्षण” जास्त उपयुक्त ठरेल. He may have good Social & Emotional Intelligence. Indicates leadership, empathy, and peer acceptance. Watch for future team-based strengths. Team games suit him. He may have many friends. His company needs to be observed. त्याची सामाजिक कौशल्ये व भावनिक बुद्धिमत्ता चांगली असू शकते. नेतृत्व, सहवेदना (empathy) आणि मित्रांशी, सहकार्यांशी जुळवून घेणार. सांघिक खेळ जास्त उपयुक्त ठरतील. भरपूर मित्र असणार. संगत चांगली असण्याकडे लक्ष ठेवायला हवे. Problem may be with “Executive Functioning”. That means “Thoughtful action skills”.Indicates difficulty in task planning, sequencing, or self-monitoring. May need structured support. “विचारपूर्वक वागण्याची क्षमता” (कार्यकारी कौशल्ये) कमी असू शकते. कामाचे नियोजन, कामाचे टप्पे, पायर्या, क्रम ठरवता न येणे. कामाचे स्वतःचे मूल्यमापन यामध्ये अडचण असू शकते. That means he has “Growth Potential”. Shows brain adaptability, new motivation, or successful teaching match, good teacher, good friend. Something good is happening in his life. That is helping him learn better. Find it out. It is important. त्याच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे. मेंदूची लवचिकता, नवीन प्रेरणा किंवा योग्य अध्यापन शैली, चांगला शिक्षक, चांगला मित्र. त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडते आहे. त्यामुळे तो चांगला शिकत आहे. शोधून काढा. महत्वाचे आहे ते. He has a problem of Under stimulation. So he has Missed Potential. Boring, educational environment. Problem may be in school, family or society. Could indicate lack of challenge, low expectations, or hidden giftedness. चेतनारहित, निर्जीव, कंटाळवाणे शैक्षणिक वातावरण. शाळेत, घरात, समाजात काहीतरी गडबड आहे. त्याच्या क्षमतेला संधीच मिळाली नाही. आव्हानाची कमतरता, स्व-अपेक्षा कमी किंवा दडलेली हुशारी सुचवते. A child’s progress card is not just a report — it’s a window into his learning journey. Let’s read it with care, compassion, and curiosity. Best luck. प्रगती पुस्तक म्हणजे फक्त गुणांचे तक्ते नाहीत — ते मुलाच्या शैक्षणिक प्रवासाची झलक आहेत. त्यामुळे त्याचा अर्थ समजून, प्रेमाने व विचारपूर्वक मार्ग काढू या. शुभेच्छा. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ Read Post »

Vaccination

Is the Vaccine Safe? लस सुरक्षित आहे का?

Ask only those who truly know. Vaccines prevent serious infectious diseases. Vaccination is the best, scientific way to build immunity. Some people worry about side effects. Some resist or refuse vaccines. Many trust government vaccines but doubt optional ones.Remember: Optional does not mean unimportant or unnecessary. Decide based on: What protects your child best, and What you can afford. Parents need up-to-date, accurate information. Trust your pediatrician and scientific bodies like the Indian Academy of Pediatrics. Do not rely on rumors, neighborhood advice, or half-knowledge. Vaccines undergo strict testing for safety and effectiveness. Vaccines are life-saving gifts of science. They create a strong shield against dangerous microbes. Protect your child.Trust science. Choose vaccination. हा प्रश्न फक्त माहीतगारालाच विचारा. सध्या अनेक आया शाळेमध्ये जेई लस देऊन घेऊ का असा प्रश्न विचारतात. जरूर देऊन घ्या असे स्पष्ट सांगितले तरी काही लोकांच्या मनात शंका राहतातच. त्याची उत्तर असे आहे. आजार परवडला कि लस ? खर तर लस परवडते. टाळता येण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा. लसी गंभीर संसर्गजन्य रोग टाळतात. लसीकरण हा प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम, वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध झालेला मार्ग आहे. काही लोकांना लसींच्या दुष्परिणामांची काळजी वाटते. काहीजण घाबरून, किंवा विनाकारणही, हट्टीपणाने विरोध करतात. लस घ्यायला स्पष्ट नकार देतात. बरेच जण सरकारी लसींवर विश्वास ठेवतात. पण सरकार न देणाऱ्या ऐच्छिक लसींवर शंका घेतात. ऐच्छिक लसी अनावश्यक नाहीत. आपल्या बाळाच्या हिताचा निर्णय घ्यावा. आपल्याला परवडते की नाही हे बघावे. परवडत असूनही पटले नाही म्हणून टाळू नये. तो मुलावर अन्याय आहे. सरकार पूर्ण देशाला फुकट द्यायला परवडेल एवढ्याच लसी देते. सगळ्या लसी देत नाही. सरकारचे निर्णय देशहिताच्या दृष्टीने घेतलेले असतात. एकेका बाळाच्या हिताच्या दृष्टीने नाही. सरकार देत नसेल त्या लसी खाजगीतून घ्या. मूल तुमचे खाजगी आहे. सरकारी नाही. माहितगाराच्या सल्ल्याने लसिकरणाचा निर्णय घ्या. सरकारी आरोग्य कर्मचारी माहितगार नसतात. सर्व नर्सेस, सर्व डॉक्टर माहितगार नसतात. सर्व आज्या, शेजारिणी माहितगार नसतात. पालकांना अद्ययावत, अचूक माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या बालरोगतज्ञांवर आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स सारख्या वैज्ञानिक संस्थांवर विश्वास ठेवा. अफवा, ऐकीव बातम्यावर विश्वास ठेवू नका. शेजारीण, वडीलधारे प्रेमाचे असतील पण माहितगार नसतात. लसी सुरक्षित आहेत की नाही, परिणामकारक आहेत की नाही हे तपासण्यासाठी लसींच्या कठोर चाचण्या घेतल्या जातात. लस ही विज्ञानाची जीवरक्षक देणगी आहे. आधुनिक लसी ही विज्ञानाची फळे आहेत. लसी म्हणजे धोकादायक सूक्ष्म जंतूंविरुद्ध लढाईसाठी एक मजबूत संरक्षक ढाल आहे. विश्वास विज्ञानावर ठेवा. लसीकरण निवडा. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Is the Vaccine Safe? लस सुरक्षित आहे का? Read Post »

Scroll to Top