Dr. Anil Mokashi

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 38 – इंद्रजीताच्या सर्पास्त्राचा फास आणि गरुडाची महाशक्ती

श्रीराम श्रीराम श्रीराम ! इंद्रजीत रावणाचा बलाढ्य सेनापती. तो अदृश्य होऊ शकत होता. अदृश्य होऊन त्याने वानरांवर बाणांचा वर्षाव केला. कित्येक वानर ठार झाले. इंद्रजीताने राम-लक्ष्मणावर सर्पास्त्र सोडले. असंख्य सापांनी त्यांना घट्ट विळखे घातले. गळ्याभोवती फास आवळले. राम-लक्ष्मण बेशुद्ध झाले. इंद्रजीताने विजयाचा जल्लोष केला. तेवढ्यात गरुडराज आला! सापांचा परम शत्रू! गरुडराज दिसताच सारे साप घाबरले. राम-लक्ष्मणांना सोडून ते सैरावैरा पळाले. राम-लक्ष्मण शुद्धीवर आले. वानरसेना जल्लोषात गर्जली. नवा उत्साह घेऊन राक्षसांवर तुटून पडली. घनघोर युद्ध पेटले. रावणाची सेना मागे हटू लागली. रामाचा विजय जवळ येत होता! “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 38 – इंद्रजीताच्या सर्पास्त्राचा फास आणि गरुडाची महाशक्ती Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 37 – लंकेत राम-रावण युद्धाचा ज्वर चढला

रावणाची राणी मंदोदरी म्हणाली “रामाशी वैर म्हणजे विनाश!” रावण कुजकटपणे म्हणाला. रामाच्या पराक्रमाच्या फक्त अफवा आहेत. त्या लहान सहान मुलांना कच्च्या-बच्चांना सांगायच्या कपोल कल्पित कथा आहेत. हे जंगलात राहणारे फळे कंदमुळे खाणारे माकडांसोबत फिरणारे भगवे कपडे घालणारे भिक मागून जगणारे माझ्यासारख्या सर्व शक्तिमान राजाशी कसे काय लढणार. त्याला विश्वासच नव्हता की रामही कधी जिंकू शकतो. राक्षसी शक्ती अमर आहे, विध्वंसातच विजय आहे! असेच त्याला वाटत होते. मंदोदरीचा सल्ला फेटाळून रावण युद्धाला निघाला. युद्ध सुरू झाले. श्रीरामांनी हुकूम दिला “आक्रमण करा!” वानरांनी शंखनाद केला. रणदुंदुभी वाजल्या. “प्रभू श्रीरामचंद्र की जय!” अशा जयघोषात वानर लंकेत घुसले. राक्षसांकडे संहारक शस्त्रे होती. वानरांनी प्रचंड दगडफेक केली वृक्ष उचलून भिरकावले. लंकेचा अभेद्य तट ढासळला! राक्षसांनी मायावी गरम राखेचा पाऊस वानर सैन्यावर पाडला. सगळीकडे अंधार दाटला पण रामाने अग्निबाण सोडला. तेजस्वी प्रकाशात, वानरांनी पुन्हा जोरदार हल्ला केला. राम-लक्ष्मणाच्या बाणांचा वर्षाव सुरू झाला. अस्वल सैन्यही मदतीला धावले. राक्षस गडगडत पडले किंकाळ्या फोडू लागले. वानर सेना वरचढ ठरली. लंकेत रामाच्या विजयाचा बिगुल वाजू लागला. प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 37 – लंकेत राम-रावण युद्धाचा ज्वर चढला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 36 – अंगदाची शिष्टाई

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता मातेला परत आणायचं होतं. युद्धाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पण युद्ध म्हणजे विनाश ! श्रीरामांना हे टाळायचं होतं. त्यांनी अंगदाला दूत म्हणून पाठवलं. अंगद हुशार, शूर आणि चतुर होता. तो निर्भयपणे रावणाच्या दरबारात गेला. शेपटीचे आसन करून बसला. त्याने रावणाला रामाचा निरोप दिला—”राज्य नको, सोन्याची लंका नको. फक्त सीतेला परत दे. आम्ही शांततेत निघून जाऊ.” अंगदाने समजावलं विनवण्या केल्या. पण रावण अहंकारी होता. तो खदाखदा हसत म्हणाला—”मी सीतेला माझ्या ताकदीवर आणलं. मी तुझ्यासारख्या तुच्छ माकडाचं का ऐकू!” रावणाचा अहंकार अंगदाच्या लक्षात आला. अंगदाने आपला एक पाय पुढे केला. तो म्हणाला—”हा पाय कुणीही हलवून दाखवावा!” संपूर्ण दरबार हसू लागला. सर्वांनी प्रयत्न केला. पण अंगदाचा पाय जागचा हलला नाही. शेवटी रावणाने स्वतः प्रयत्न केला. त्याने अंगदाचा पाय धरला. अंगद हसत म्हणाला. “सर्व शक्तिमान सुवर्णलंकेचा राजा रावण एका माकडाचे पाय धरतोय ? धरायचेच असतील तर श्रीरामांचे पाय धर! ते तुला माफ करतील.” पण रावणाने श्रीरामाचा प्रस्ताव धुडकावला. अंगद निराश झाला. “विनाशकाले विपरीत बुद्धी! मी युद्ध टाळायचा प्रयत्न केला.पण तुला युद्धच हवंय! श्रीराम तुझी इच्छा पूर्ण करतील!” अंगदाची शिष्टाई निष्प्रभ ठरल्याचे ऐकून वानरसेना भडकली. त्यांच्या “पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम” गर्जनांनी लंका हादरू लागली! प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 36 – अंगदाची शिष्टाई Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 35 – रावणाचे कपट कारस्थान

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामाची सेना लंकेला पोचली. सर्व बाजूंनी लंकेला घेरले. वानरांच्या आरोळ्या. जय श्रीराम नारे आकाश दणाणून टाकत होते. रावण काळजीत पडला. त्याने दोन राक्षसांना हेर म्हणून पाठवले. मायावी शक्तीने रूप बदलून अस्वल आणि म्हातारे माकड बनुन आले. सैनिकांची माहिती गोळा करू लागले. कोणालाच शंका आली नाही. पण बिभीषणाने त्यांना ओळखले! वानरांनी त्यांना पकडले. रामासमोर उभे केले. हेर घाबरले माफी मागू लागले. श्रीरामांनी त्यांना क्षमा केली. परत जाऊन इथे काय काय पाहिले ते रावणाला सांगा. हेर रावणाकडे गेले. “रामाची सेना अपराजेय आहे,” असे त्यांनी सांगितले. रावण चडफडत महालात गेला. त्याने एक, नवीन कपट कारस्थान आखले. मायावी जादूने त्याने रामासारखे एक शीर तयार केले. ते सीतेपुढे ठेवले. आणि म्हणाला “रामाचा वध झाला. आता तरी माझी राणी हो!” सीता म्हणाली. “श्रीराम अजिंक्य आहेत. तुझे हे कारस्थान मला फसवू शकत नाही !”रावण खजिल झाला. निराश होऊन निघून गेला. प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 35 – रावणाचे कपट कारस्थान Read Post »

रामायणाच्या गोष्टी 34 – रामसेतू आणि खारीचा वाटा

रामसेतू बांधायला, लाखो वानर, झपाटल्यासारखे, काम करत होते. मोठमोठे दगड उचलून, समुद्रात टाकत होते. नल-नील त्यांना, मार्गदर्शन, करत होते. किनाऱ्यावर एक, लहानशी खार, हे सगळं, बघत होती. एवढ्या मोठ्या कामात, आपणही मदत, करू शकतो का, असा विचार, तिच्या मनात आला. तिला एक, युक्ती सुचली. ती वाळूत, गडाबडा लोळली. तिच्या अंगाला, वाळू चिकटली. मग ती, पुलावर जाऊन, अंग झटकू लागली. दगडांच्या खाचांमध्ये, ती वाळू, जाऊ लागली. छोट्याशा खारीचं, हे छोटेसे काम! पण तिच्या दृष्टीने, ते खूप, मोठं होतं. सेवा, मनापासून, करायची असते. ती कधीच, मोठी-छोटी नसते. श्रीराम, सगळं पाहत होते. त्यांना खारीचं, श्रमदान भावलं. त्यांनी प्रेमाने, तिला उचललं. तिच्या अंगावरून, हात फिरवला. तेव्हापासून, खारीच्या अंगावर, सोनेरी पट्टे आले, असं म्हणतात. श्रीरामांच्या स्पर्शाने, तिचं जीवन, धन्य झालं! सगळ्यांनी मिळून, सहा दिवसांत, रामसेतू , तयार केला. आता फक्त, श्रीरामांच्या आज्ञेची, वाट होती. वानरसेना, लंकेवर स्वारीसाठी, सज्ज होती! प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय

रामायणाच्या गोष्टी 34 – रामसेतू आणि खारीचा वाटा Read Post »

Two young boys energetically competing in a soccer match on a grassy field.

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले

ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा. त्यांनी उन्हात खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये. त्यांनी सावलीत खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी टोपी न घालता बाहेर हुंदडायला जावे. म्हणजे मस्त डोकं तापतं. फणफणून ताप येतो. हॉस्पिटल मधे इंजेक्शन सलाईन मिळतात. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी टोपी घालून बाहेर जावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी चपला न घालता तापलेल्या फरशीवर पाय ठेवावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी चपला घालून घराबाहेर पडावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी अज्जीबात पाणी पिऊ नये. आणि खुशाल रणरणीत उन्हात भर दुपारी सायकल दामटावी. पाणी कमी पिले तरच उन्हाळा बाधतो. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी भरपूर पाणी प्यावे. चोवीस तासात सहापेक्षा जास्त वेळा सू व्हायला हवी. अगदी आकडा मोजा. भरपूर पाणी पिणाऱ्याला उन्हाळा बाधत नाही. तर बच्चमजी, तुम्हीच ठरवा, उन्हाळ्यात काय करायचे. काय नाही करायचे. शाळेतल्या मोठ्या मुलांना एवढं तरी आपलं आपल्यालाच समजायला हवे. ते सांगायला आई कशाला लागते! एवढे बोलून “उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले” या विषयावरचं माझं भाषण मी समाप्त करतो. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 33 – रामसेतू

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामसेतू : सागरी पूल. सेतू बांधा रे सागरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी! वानर सेना आली रे लंकेसाठी निघाली रे. श्रीरामांनी मुहूर्त पाहिला शिवलिंगाची स्थापना केली. रामेश्वर हे स्थान पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाली! नल-नील दोघे भाऊ पूल बांधती चातुर्याने. शिळा-वृक्ष गोळा करती सागरात टाकती युक्तीने! पण ते दगड बुडाले सर्व जण चिंतेत पडाले. हनुमानाने युक्ती सांगितली श्रीराम नाव कोरू लागले! शिळा सगळ्या तरंगू लागल्या रामाचा सेतू वाढू लागला. लंकेकडे वाट निघाली सारी वानरसेना आनंदली! आजही सेतू दिसतो इतिहास-विज्ञान सांगतो. प्रवाळ-वाळूची निसर्ग निर्मिती सागरात पूल दिसतो ! तामिळनाडूच्या रामेश्वरमला जोडी श्रीलंकेच्या मन्नारला ४८ किलोमीटर अंतराला सिता मातेच्या मुक्तीला. रामसेतू उभारतांना हनुमानाची वानर सेना गर्जे बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी पवनपुत्र हनुमानकी जय सियावर रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 33 – रामसेतू Read Post »

doctor and girl doing health check up

बालपणाचे विज्ञान 2

7) लसीकरण 8) औषधे 9) ताप 10) नवजात बाळ 11) प्रथा आणि अंधश्रद्धा 12) डॉक्टर आनंदी बालपण = यशस्वी मोठेपण – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 2 Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला!

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामानी हनुमानाला लंकेची बित्तमबातमी विचारली. स्वारी करायला कोणता मार्ग कमी धोक्याचा आहे. रक्षणासाठी किती सैन्यबळ आहे. लंके भोवती किती कोट आहेत. हल्ला करायला, कोणता मार्ग सोयीचा आहे. राक्षस नागरिकांचे रावणाविषयी काय मत आहे. हनुमानानी हेराच्या नजरेनी लंकेतील अनेक बारकावे टिपले होते. श्रीरामानी सुग्रीवाला विचारले. एवढा मोठा समुद्र ओलांडून आपले वानर सैन्य लंकेपर्यंत कसे पोचेल. सुग्रीव म्हणाला. काळजी करू नका. आपण सागरावर सेतू उभारू, पूल उभारू त्याचं नाव रामसेतू ठेवू. आणि या रामसेतूवरून आपले कोट्यावधी वानर सैन्य लंकेत घुसवू. वानर सेनापतींनीभराभर हुकूम सोडले. विस्कळीत वानर सैन्य दाही दिशातून गोळा झाले. पाहता पाहता ते सैन्य एखाद्या सागराप्रमाणे पसरले. लाटांप्रमाणे उसळणाऱ्या वानर सेनेच्या समोर महाप्रतापी श्रीराम आपल्या तेजस्वी पावलांनी चालत होते. वानर सैन्यात विलक्षण उत्साह संचारला होता. जय श्रीराम जय श्रीराम असे नारे दिले जात होते. दुष्ट राक्षस शक्तींना हरवून रामराज्य उभारण्यासाठी विशाल वानर सेना लंके कडे निघाली होती. जय श्रीराम, या एका ना-याने अनेक राक्षस भयभीत झाले. पण चारी दिशातून जय श्रीराम नाऱ्यानी आकाश दणाणले. वाटेत काही राक्षसांची राज्ये होती. जय श्रीराम या नाऱ्याचा अनेकांना, राग येऊ लागला. जय श्रीराम हा नारा ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. एवढी प्रचंड मोठी वानर सेना अंगावर येतांना पाहून काही चोरांना वाटले की ही कुठल्या तरी भयंकर आजाराची साथ आहे. पण सीतामातेचे कपटाने अपहरण केल्याचा राग संपूर्ण भारतवर्षात होता. जनतेचे श्रीरामांना समर्थन होते. सारे वानरसैन्य, अतिशय शिस्तीत सागर तीरावर आले. समोरचा अथांग सागर ओलांडून सगळ्यांना पलीकडे जायचे होते. रामसेतू कोण व कसा बांधणार हाच यक्ष प्रश्न होता. म्हणजे खूप मोठा प्रश्न होता. वानर सेना स्वारीला, निघाली लंकेला! प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला! Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लंकेत सीतेला भेटून, रावणाला धडा शिकवून, लंका दहन करून हनुमान आकाश मार्गे उडत उडत परत आला. तो जसा वानर सेनेसमोर आला, तसे सगळे वानर आनंदाने उड्या मारू लागले. “जय हनुमान! जय श्रीराम!” असा जयघोष झाला. हनुमान लगेच रामाकडे गेला आणि त्याला सगळी कहाणी सांगितली—सीतेच्या धैर्याची, रावणाच्या क्रूरतेची आणि लंकेच्या विध्वंसाची. रावणाच्या राज्याची. त्याच्या सामर्थ्याची. त्याच्या सैन्याची. सगळ्या गुप्त बातम्या हनुमानाने श्रीरामांना सांगितल्या. सीतेने हनुमानाला दिलेले सोन्याचे कंगण बघून श्रीरामाला धीर आला. सीता सुखरूप असल्याची ती खूण होती. हनुमानाने रामाला एक विनंती केली, “मला सदैव तुमच्या सेवेत राहायचं आहे!” राम प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला प्रेमाने आशीर्वाद दिला. आणि तथास्तु म्हटले. आता वेळ आली होती मोठ्या निर्णयाची! राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमानाने ठरवलं—संपूर्ण वानरसेनेसह लंकेवर चढाई करायची, सीतेला परत आणायचं! ते वानर सेनेची जमवाजमव करायच्या तयारीला लागले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट Read Post »

Stages of Child growth illustration

बालपणाचे विज्ञान 1

#31 1) बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवा. २). जुलाब, डीहायड्रेशन, पाणी १) अंगावर पाजा २) गोवर लस द्या. ३) संडासचा वापर करा. ४) अन्न व पाणी स्वच्छ ठेवा. ५) हात धुवून अन्नाला स्पर्श करा. ६) माशांचा नायनाट करा. 3) फक्त स्तनपान काही आयांना मदतीचा हात लागतो. अंगावरचे दूध नैसर्गिकपणे सुटते. दुध वाढवण॒यासाठी नैसर्गिक मार्ग वापरा.अंगावरचे दुध वाढवणा-या गोष्टी १) वारंवार चोखणे२) वारंवार रिकामे करणे३) चांगला आहार४) कमी काळजी. १.पान्हा फुटतो.२.वजन वाढते ३.बाळ छान झोपते.४.सात आठ वेळा संडास होते.५.दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा लघवी होते. 4) बाटली पुतनामावशी आहे. 5) वरचे दूध नको. 6) मुलांना अन्न लागते. १)  दोन वर्ष अंगावर पाजा.२) सहाव्या महिन्याला कांजी द्या.३) कांजित प्रथिने घाला.४) कांजित फळे किंवा भाजी घाला.५) दिवसातून चार वेळा कांजी द्या.६) आजारी बाळाला अन्न द्या. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 1 Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रावणाने राक्षसांना, मारुतीच्या शेपटीला, कपडे चिंध्या बांधून, त्यावर तेल ओतून, पेटवून देण्याची, आज्ञा दिली. जसजसे राक्षस, शेपटी भोवती, कपडे गुंडाळत होते, तसतशी शेपटी, मोठी मोठी, होत जात होती. रावण म्हणाला, लंकेतील सगळे, कपडे आणा. एकही कापड दुकान, सोडू नका. हजारो सेवक, पळत सुटले. लंकेतील सगळी, कापड दुकाने लुटली. लंकेच्या एकाही घरात, कापड म्हणून, शिल्लक उरले नाही. सगळे कपडे, हनुमानाच्या शेपटी भोवती, गुंडाळून देखील, थोडेसे शेपूट, शिल्लकच राहिले. सेवकांनी भराभर, त्याच्यावर तेल ओतले. शेपटाला, आग लावून दिली. शेपूट काही पेटेना. रावण स्वतः, पुढे आला, आणि जोरात, फुंकर मारली. त्याबरोबर आग भडकून, रावणाच्या दाढी मिशा, जळून गेल्या. आग भडकल्यानंतर, हनुमान एका, उंच प्रासादावर, उडी मारू बसला. जळत्या शेपटीने, तो प्रासाद, धडाधडा पेटू लागला. भराभर उड्या मारत, या घरावरून, त्या घरावर. या गावातून, त्या गावात. या राज्यातून, त्या राज्यात. संपूर्ण देश, हनुमानाने, काही क्षणात, पेटवून दिला. हनुमानाची, टिंगल टवाळी करत, खदाखदा हसणारे राक्षस, जीवाच्या भीतीने, सैरावैरा पळत सुटले. एकच, हलकल्लोळ, उडाला. आगीच्या ज्वाळा, आकाशाला भिडल्या. जमिनीवर, राखेचे पर्वत, उभे राहिले. राक्षस म्हणाले, रावणाने सीतेला, पळवून आणल्यामुळे, आमच्यावर हा, प्रसंग आला. बिभीषण म्हणाला, करावे तसे, भरावे, पापाचे फळ नेहमीच, कडू असते. संपूर्ण लंका, पेटल्याची, खात्री झाल्यावर, हनुमानाने, समुद्रकिनाऱ्यावर येऊन, समुद्राच्या पाण्यात, आपली शेपटी, विझवली. आणि भराभर, उड्या मारत तो, सीतेजवळ आला. सीता सुखरूप होती. हनुमान सीतेला, भक्ती भावाने, नमस्कार करीत म्हणाला. सीतामाते, तू सुरक्षित असल्याची, खूण म्हणून, तुझ्या हातातील, सोन्याचे कंगण, मला दे. मी ते, श्रीरामांना दाखवीन. तू निश्चिंत रहा. तुझे दुःख, लवकरच, दूर होईल. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली. Read Post »

Scroll to Top