Poster Set for Parents
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
श्रीराम श्रीराम श्रीराम ! अयोध्येतील नागरिक नदीच्या तीरावर गाढ झोपले असतांना राम-लक्ष्मण सीता रथात बसून निघाले. सकाळ झाल्यावर लोकांच्या लक्षात आलं. आपल्या नशिबाला दोष देत सगळेजण आपापल्या घरी परतले. रथ गंगा नदीच्या तीरावर आला. श्रीराम लक्ष्मण सीता यांनी रथातून उतरून पवित्र गंगा नदीला नमन केले आणि गंगास्नान केले. आदिवासी राजा निषाद राज याला श्रीराम त्यांच्या राज्यात आला आहे हे कळले. राजा निषाद श्रीरामांचा निस्सीम भक्त होता. त्याने श्रीरामांना आपल्या राजवाड्यात राहण्याची विनंती केली. पण श्रीरामांनी नम्रपणे नकार दिला. माझे वडील राजा दशरथ यांनी मला, 14 वर्षे तपस्वी जीवन जगण्याची आज्ञा दिली आहे. आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन मला करायचे आहे. असे सांगितले. श्रीरामांनी मंत्री सुमंत यांनासुद्धा परत जाऊन राजा दशरथ यांच्या मंत्र्याचे काम करावे. अशी विनंती केली. अत्यंत दुःखी अंतकरणाने मंत्री सुमंत परत गेले. राम लक्ष्मण सीता एखाद्या यात्रीकरू सारखे घनदाट जंगलातून प्रयाग गावी पोचले. गंगास्नान केल्यानंतर ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. श्रीरामांना पाहून भारद्वाज ऋषींना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे स्वागत केले. भारद्वाज ऋषी म्हणाले श्रीरामा तुझ्या येण्याने माझी तपश्चर्या ध्यानधारणा उपास आणि तीर्थयात्रा यांचे सार्थक झाले. माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत. भारद्वाज ऋषींच्या सूचनेवरून सुंदर आणि नीरव शांतता असलेल्या चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी राम लक्ष्मण आणि सीता प्रवासाला निघाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले. Read Post »
श्रीराम श्रीराम श्रीराम ! सर्वांचा निरोप घेऊन राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. रथ त्यांची वाटच पाहत होता. जनतेला अनावर, दुःख झाले होते. लोक धाय मोकलून रडत होते. एक प्रचंड जनसागर त्यांच्या रथाच्या मागून चालत निघाला. कुणालाच रामाला एकटं सोडायचे नव्हतं. सगळ्यांनाच रामाबरोबर वनवासात जायचे होते. रामानी हात जोडून सगळ्या लोकांना विनंती केली की त्यांनी परत जावं. कुणीही त्याचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. लहान मोठे स्त्री-पुरुष सगळे मागून चालत होते. रथ तमसा नदीच्या किनारी पोचला. रात्र झाल्याने रामाने प्रवास थांबवला व विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला. बरोबर आलेला, जनसागर सुद्धा तिथेच थांबला. दुःखानी आणि चालून चालून थकल्याने सगळे लोक लगेच आजूबाजूला जमिनीवरच झोपी गेले. मध्यरात्री रामानी मंत्री सुमंत त्यांना उठवले आणि हळू आवाजात त्यांच्या कानात सांगितले. या बरोबर आलेल्या लोकांना आयोध्येत परत जावेच लागेल. तरच माझं कर्तव्य आणि माझं ध्येय पूर्ण होईल. कुणीही उठायच्या आत आपण रथात बसून आवाज न करता निघून जाऊ. सुमंतांनी तसेच केले झोपलेल्या बिचार्या श्रद्धाळू लोकांना सोडून रथ आवाज न करता शांतपणे जंगलाच्या दिशेने निघाला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
#24 लहान मुलांमध्ये टी.बी. (क्षयरोग) ओळखणे कठीण असते. बाळ खूप आजारी होईपर्यंत लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे निदान उशिरा होते. जुनाट संसर्ग आणि मुलाच्या वाढीतील अडथळा यावरून टी.बी.चा संशय घ्यावा लागतो. प्रतिकारशक्ती कशी आहे, यावर बऱ्याच लक्षणांचे स्वरूप अवलंबून असते. लहान मुलांमध्ये टी.बी. कशी होते? टी.बी.चे जंतू मोठ्या माणसांमधून लहान मुलांमध्ये संक्रमित होतात. परंतु, सगळीच मुले आजारी पडत नाहीत. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, ती मुलं टी.बी.च्या जंतूंशी लढू शकतात आणि निरोगी राहतात. प्रतिकारशक्ती कमी असल्यास टी.बी. जंतू हळूहळू शरीरात पसरतात, फुफ्फुस आणि लिम्फ नोड्समध्ये संक्रमण वाढते, आणि मग मुलं आजारी पडतात. पालकांना शंका कधी घ्यावी? लहान मुलांमधील टी.बी.चे निदान मुख्यतः संशयावर आधारित असते. संशय घेण्यास मदत करणाऱ्या 10 मार्गांपैकी पहिले चार लक्षणे वारंवार दिसतात, तर उर्वरित सहा क्वचितच दिसतात. वारंवार आढळणारी चार लक्षणे क्वचित आढळणारी सहा लक्षणे टी.बी. ओळखण्यासाठी काय करावे? वरील लक्षणांवरून संशय येत असेल तर त्वरित बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या. टी.बी.चे निदान आणि उपचार लवकर सुरू केल्यास मुलाला गंभीर परिणामांपासून वाचवता येते. निष्कर्ष लहान मुलांमधील टी.बी.चे निदान करण्यासाठी वेळीच संशय घेणे आणि योग्य उपचार सुरू करणे गरजेचे आहे. मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घ्या, कारण योग्य माहितीमुळे बाळाचे आरोग्य चांगले राखता येते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
श्रीराम, श्रीराम, श्रीराम ! रामाच्या वनवासाची बातमी ऐकून लक्ष्मणाला खूप राग आला. त्यानी रामाला सांगितले आपण अन्यायाविरुद्ध लढायला हवे. आपण तुझा राज्याभिषेक करू. कोण आडवे आले तर मी युद्ध करीन. पण रामानी ठामपणे सांगितले. लक्ष्मणा, शांत हो. परिस्थिती नाजूक आहे. हा रघुवंशाच्या सन्मानाचा व अभिमानाचा, प्रश्न आहे. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करणार. राज मुकुटा पेक्षा मला कर्तव्य मोठे वाटते. लक्ष्मण म्हणाला असं असेल तर मी ही तुझ्याबरोबर वनवासात येणार. कुठल्याही परिस्थितीत मी तुझी साथ सोडणार नाही. रामाने ते मान्य केले. सितेनीही वनवासात रामाला सोबत करण्याचा हट्ट धरला. आणि तो रामाला मान्य करावा लागला. सगळे दुःखात होते. राजा दशरथ दुःखाने चक्कर येऊन पडला होता. त्यांनी रामाला विनंती केली की मला सोडून जाऊ नको रे. राणी कैकयीने मला दुष्ट पणे फसवले आहे. रामाने विनम्रपणे सांगितले की आयोध्या राजसत्ता राजेशाही जीवन याचा मला अजिबात मोह नाही. आता यापुढे वनवास आणि आदिवासी जीवन हेच माझ्या मालकीचं आहे दुष्ट कपटी मंथराने कैकेयीच्या मदतीने आधीच त्यागाचं प्रतीक असलेली भगवी वस्त्रे कैकयीच्या मदतीने आणून ठेवली होती. राम लक्ष्मण आणि सीता भगवी वस्त्रे घालून आपल्या कुटुंबाला आणि राजमहालाला सोडून जंगलात वनवासात जाण्यासाठी रथाच्या दिशेने निघाले. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
रामायणाच्या गोष्टी 12 – लक्ष्मणाचे बंधुप्रेम आणि वनवासाची तयारी. Read Post »
श्रीराम, श्रीराम, श्रीराम! इकडे श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. सगळे आनंदात होते. पण तिकडे कैकेयीच्या महालात काही वेगळेच नाटक घडत होते. कैकेयीची दुष्ट दासी मंथरा कैकेयीच्या कानात विष ओतत होती. रामाच्या राज्याभिषेकाचा डाव उधळून टाकण्याची योजना तिच्या मनात पेरत होती. रामाचा राज्याभिषेक झाला की भरताला त्याचा गुलाम व्हावं लागेल. कौशल्या राजमाता होईल. कैकयीला दासी व्हावे व्हावे लागेल. मंथरेने कैकेयीच्या कानात विष ओतले. आणि कैकेयी तिच्या कारस्थानाला, बळी पडली. कैकेयिनी सगळे दागिने फेकून दिले. केस मोकळे सोडले. साधे, काळे, कपडे घातले. आणि ती रुसून बसली. राजा दशरथ कैकेयीच्या महालात आल्यावर समोरचे दृश्य बघून त्याला धक्काच बसला. रामाच्या राज्याभिषेका सारख्या मंगल प्रसंगी तू का नाराज आहेस. अनेक आढेवेढे घेऊन अनेक नाटकं करून कैकेयीने राजा दशरथाला हतबल केले. एका युद्धात, कैकेयीने राजा दशरथाचा जीव वाचवला होता. त्यावेळी दशरथाने तिला दोन वर दिले होते. त्याची आठवण तिनी करून दिली. राजा दशरथ म्हणाला सांग तुला काय देऊ. कैकेयी म्हणाली मग ऐका तर नीट लक्ष देऊन ऐका. पहिल्या वरानी उद्या माझ्या भरताला राज्याभिषेक करावा. आणि दुसऱ्या वराने रामाला वल्कले नेसून 14 वर्षे वनवासात पाठवावे. ते ऐकून दशरथाच्या तोंडून शब्दही फुटेना. राजा दशरथाने गयावया केली. पण कैकेयीने निक्षून सांगितले. माझ्या दोन्ही वरांची पूर्तता ही झालीच पाहिजे. दुष्ट कैकयीचा हट्टीपणा बघून राजा दशरथ राम राम म्हणत जमिनीवर कोसळला. बेशुद्ध झाला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
रामायणाच्या गोष्टी 11 – मंथरेचे विष आणि कैकेयीचा वर Read Post »
श्रीराम, श्रीराम, श्रीराम! अयोध्येमध्ये आनंदी आनंद होता. राम लक्ष्मण राजा दशरथाला राज्यकारभारात मदत करत होते. पण, राजा दशरथाला, एक दिवशी जाणवले. आपण वृद्ध हो चाललो आहोत. म्हातारपण आलेले आहे. केस पांढरे झाले आहेत. आता, रामाच्या हाती, राजमुकुट सोपवून निवृत्त व्हायची वेळ आली आहे. आता तपश्चर्या करण्याची आणि देवपूजा करण्याची वेळ आलेली आहे. राजा दशरथाने गुरु वशिष्ठांचा सल्ला घेतला. गुरु वशिष्ठ म्हणाले राम एक उत्कृष्ट राजा होऊ शकेल. पण त्याला आधी राज दरबार, बोलवावा लागेल. सर्व मंत्र्यांना बोलवावं लागेल. त्यांची जनतेची प्रजाजनांची संमती घ्यावी लागेल. राजा दशरथाने दुसऱ्याच दिवशी दरबार बोलावला. आणि रामाला राज्याभिषेक करण्याचा आपला विचार सगळ्यां समोर मांडला. संपूर्ण राजदरबाराने एक मुखाने घोषणा केली. आम्ही सर्व जण तुमच्याशी सहमत आहोत. राजकुमार राम हा एक आदर्श आहे. दयाळू आहे. शूर आहे. शहाणा आहे. नीतिमान आहे. आम्हाला सर्वांना तो आवडतो. संपूर्ण राजदरबारात एक सुद्धा दरबारी रामाला राजा करण्याच्या विरोधात नव्हता. राजा दशरथाने रामाला बोलवून सांगितले की या दरबाराची इच्छा आहे की तू आता राज्यकारभार हाती घेऊन अयोध्येचा राजा व्हावे. जशी आपली आज्ञा प्रभू रामचंद्र म्हणाले. गुरु वशिष्ठांनी ग्रह नक्षत्रांचे गणित मांडून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून आयोध्या नगरवासी खुश झाले. ते त्यांचे स्वप्न होते. गुरु वशिष्ठांनी राम व सीतेला राजाची आणि राणीची कर्तव्ये समजून सांगितली. ते म्हणाले राजा होणे सोपे नाही. ते एक आव्हान आहे. राजा हा प्रजेचा मालक नसतो. सेवक असतो. जनतेमधून आलेल्या मंत्रिमंडळाचे म्हणणे राजाने नेहमी लक्षात घ्यावे. दरबारातील लोकांकडे दुर्लक्ष करू नये. कारण तेच राजाचे डोळे असतात आणि कान असतात. राजाच्या मनात सर्वांविषयी दयाभाव हवा. न्याय गरिबांपर्यंत पोचायला हवा. युद्धात सैन्याचे नेतृत्व करायला हवे. सीतेलाही गुरु वशिष्ठांनी राणीची कर्तव्ये सांगितली. आणि शेवटी दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
रामायणाच्या गोष्टी 10 – रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला Read Post »
श्रीराम, श्रीराम, श्रीराम! दुसऱ्या दिवशी, सकाळी सकाळी, विश्वामित्र, श्रीराम आणि लक्ष्मण, यांना घेऊन, स्वयंवर मंडपाकडे, निघाले.स्वयंवर मंडप माणसांनी फुलून गेला होता. पृथ्वीवरचे सर्व राजे तिथे हजर होते. काही राक्षसही राजाचे मायावी रूप घेऊन आले होते. त्यात लंकेचा राजा रावणही होता. श्रीरामाचे मोहक रूप पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्याचे चालणे, बोलणे, असणे सारेच आकर्षक आणि मनाला भुरळ पाडणारे होते. राम आणि लक्ष्मण यांच्यासाठी उच्चासने राखून ठेवली होती. पण, उच्चासनावर न बसता आपले गुरु विश्वामित्र ऋषी यांच्या पायाजवळ ते नम्रतेने बसले होते. राजा जनकाने स्वयंवरमाला घेऊन उभ्या असलेल्या सीतेजवळ येऊन जाहीर केले यज्ञाच्या वेदीवर एक शिवधनुष्य ठेवलेले आहे. हे धनुष्य भगवान शंकराकडून आले आहे. या प्रचंड शिव धनुष्याला वाकवून जो कोणी वीर प्रत्यंचा चढवील म्हणजे दोरी अडकवेल त्याला माझी जानकी स्वयंवर माला अर्पण करेल. एवढे मोठे धनुष्य बघून साऱ्या सभेत शांतता पसरली. बहुतेक राजांनी निराश होऊन मान खाली घातली. शेवटी एक राजपुत्र हिम्मत करून शिव धनुष्याजवळ गेला. पण ते प्रचंड धनुष्य त्याला जागचे हलवताही येईना. मान खाली घालून आपल्या जागेवर तो परत येऊन बसला. आणखी काही राजांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण कुणालाच ते जमले नाही. सगळ्यांची फजिती पाहून लगेच राजा रावण असुरी हास्य करत उठला आणि म्हणाला…………………. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. स्वयंवर झाले सीतेचे.स्वयंवर झाले सीतेचे. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
पालक म्हणून आपण मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी करणे स्वाभाविक आहे. बाळ “छान” आहे की “आजारी” आहे हे ओळखणे प्रत्येक पालकाला जमलेच पाहिजे. पण हे कसे ओळखावे? बाळाचा आरोग्य टप्पा समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण लहान मुलांमधील आजार वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातात. योग्य माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेणे हाच पालकत्वाचा गाभा आहे. बाळ “छान” आहे की “आजारी” आहे? जर बाळ छान असेल तर उगाचच काळजी करायची गरज नाही. परंतु, बाळ आजारी दिसत असेल तर ते ‘वेळेत’ डॉक्टरांपर्यंत पोहोचले पाहिजे. गंभीर आजारी बाळाला क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये थांबवणे चुकीचे आहे. म्हणूनच, बाळ कोणत्या टप्प्यावर आहे हे समजणे महत्त्वाचे ठरते. बाळाच्या आरोग्याचे टप्पे बाळाच्या आरोग्य स्थितीचे मुख्यतः सहा टप्पे असतात: पालकांना काय करावे? बाळाचे आरोग्य ओळखण्यासाठी मेंदूच्या क्रियाकलापांकडे लक्ष द्या. बाळाचे वागणे, खाणे, खेळणे आणि रडण्याच्या पद्धतीत बदल दिसला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बाळ थोडे गळून गेलेले दिसले तरी डॉक्टरांकडे जाणे चांगले. कारण, लहान मुलांची तब्येत झपाट्याने बिघडू शकते. निष्कर्ष बाळ छान आहे की आजारी आहे हे ओळखण्यासाठी थोडी माहिती आणि सराव लागतो. आपल्या जवळच्या बालरोगतज्ञाचा सल्ला वेळोवेळी घ्या. लहान मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टर फक्त औषधांसाठी नसून योग्य मार्गदर्शनासाठीही महत्त्वाचे आहेत. पालकांनी ही माहिती लक्षात घेतली तर बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे शक्य होईल. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
बाळ छान आहे, आजारी आहे, की सिरियस आहे? ओळखायला शिका Read Post »
श्रीराम, श्रीराम, श्रीराम! मिथिलेचा राजा जनक, याची मुलगी सीता, हिचे त्याने, स्वयंवर, करायचे ठरवले होते. स्वयंवराच्या अटी, पूर्ण करणाऱ्या, व सीतेला आवडणाऱ्या राजपुत्राशी, तिचे लग्न होणार होते. विश्वामित्र ऋषींना, त्यांचे निमंत्रण आले. विश्वामित्र ऋषींनी, राजा दशरथाची, परवानगी घेतली. आणि राम लक्ष्मण, यांना घेऊन, स्वयंवरासाठी निघाले. जंगलातून जात असताना, एका निर्मनुष्य ठिकाणी, राम लक्ष्मण यांना, एक झोपडी दिसली. त्या झोपडीमधे, एक दगडाची, मानवी मूर्ती होती. दोघांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी विश्वमित्र ऋषींना विचारले कुणाची आहे ही झोपडी, आणि ती दगडाची मूर्ती, कुणाची आहे. त्यांनी सांगितले, ही झोपडी गौतम ऋषी, यांची आहे. आणि ती दगडाची मूर्ती, गौतम ऋषींची पत्नी, अहिल्या, हिची आहे. गौतम ऋषींच्या, एका शापामुळे, तिची, दगडाची मूर्ती, झाली आहे. गौतम ऋषींची बायको, अहिल्या, ब्रह्मदेवाची मुलगी होती. ती अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्यावर भाळून, मायावी शक्तीनी, ऋषी गौतम यांचे, रूप घेऊन. झोपडीत प्रवेश केला. स्वतःच्याच रूपातील, दुसरी व्यक्ती बघून, गौतम ऋषींचा राग, अनावर झाला. त्यांनी अहिल्येला, शाप दिला. आणि त्या, शापाचा परिणाम म्हणून, अहिल्येचे, दगडी मूर्तीत, रूपांतर झाले. पण त्यात, आपल्या पत्नीची, काहीच चूक नव्हती, हे त्यांच्या, लक्षात आले. त्यांनी, उ:शापही, दिला. जेव्हा केव्हा, श्रीरामांच्या, पवित्र पायाचा स्पर्श, या दगडाला होईल, त्यावेळेला तू, परत, मानवी रूपात येशील. विश्वामित्र ऋषींनी, आज्ञा दिली, की रामाने, आपला पवित्र पाय लावून, शिळा, म्हणजे दगड झालेल्या, अहिल्येचा उद्धार करावा. तिला शापातून मुक्ती द्यावी. रामाच्या, पवित्र पायाचा, स्पर्श होताच, त्या दगडातून, दिव्य स्वरूपात अहिल्या प्रकट झाली. तिनी अतिशय भक्ती भावाने, रामचंद्रांचे, पाय धरले. श्रीरामांच्या पायांवर, तिच्या अश्रूंचा, अभिषेक होत होता. ती आज, स्वतःला, धन्य समजत होती. भाग्यवान समजत होती. तिला प्रत्यक्ष श्रीरामांचे दर्शन झाले होते. तिनी त्यांचे, आशीर्वाद मागितले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
रामायणाच्या गोष्टी 8 – अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. Read Post »
श्रीराम, श्रीराम, श्रीराम! जंगलातल्या आश्रमाकडे जातांना, विश्वामित्र ऋषी, राम लक्ष्मणांना, राक्षस कसा त्रास देत आहेत हे वर्णन करून सांगत होते. अचानक ढगातून, गडगडाट व्हावा, असा आवाज आला. साऱ्या सृष्टीला, हादरवून सोडणारे, विकट हास्य करीत, एक अक्राळ विक्राळ, अजस्त्र राक्षसिण, त्यांचा रस्ता अडवून, उभी होती. ती विश्वामित्रांना म्हणाली. तुम्ही तुमच्या रक्षणासाठी, या कच्च्या-बच्चांना, आणलेत. मी तर यांना, केळ्यासारखं, खाऊन टाकीन. झडप घालून, अजस्त्र हाताने, ती रामाला, एक झापड मारणार, तोच विश्वामित्र म्हणाले. रामा, काळजी घे, हीच आहे ती, त्राटिका. तिचा हात, रामापर्यंत पोचायच्या आधीच, रामाच्या बाणानी, त्राटिकेचा, वेध घेतला. आणि ती क्षणार्धात खाली पडली. रामाने शौर्याने व कौशल्याने त्राटिकेला मारले. विश्वामित्र खुश झाले आणि म्हणाले. तुम्हा दोघांची निवड करण्यात माझी अजिबात चूक झाली नाही. माझी निवड अगदी योग्य होती. आश्रमात पोचल्यावर रामाने सांगितले गुरुवर्य आता आपण आपला यज्ञ निर्वेधपणे चालू ठेवू शकता. आम्ही दोघे भाऊ यज्ञाचे रक्षण करू. त्राटिकेच्या मृत्यूची बातमी ऐकून, तिचे दोघे राक्षस भाऊ, सुबाहू, आणि मारीच, रागाने वेडेपिसे झाले. इतर राक्षसांना घेऊन, ते तडक यज्ञाच्या जागी पोचले. यज्ञ सुरू झाला होता. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
श्रीराम, श्रीराम, श्रीराम! अयोध्येत सुख, समाधान, शांतता होती. बुद्धिवान, चारित्र्यवान, आणि कौशल्यवान राजपुत्र असताना, कुणाला कशाची भीती. पण हा, सुखाचा काळ, असाच राहणार नव्हता. लवकरच राज्यावर एक संकट येणार होते. एक दिवस, विश्वामित्र ऋषी राजा दशरथाच्या दरबारात अचानकपणे हजर झाले. राजानी त्यांचे यथायोग्य स्वागत केले. दशरथ राजाने विश्वामित्र ऋषींना विचारले की “महाराज, आपल्या पवित्र पायाची धूळ आमच्या राजदरबारात कशासाठी आली बरे”. विश्वामित्र ऋषी म्हणाले हे राजाधिराज राक्षसांनी आमचे आयुष्य असे करून टाकले आहे. आमचा ज्ञानयज्ञ, निर्णायक टप्प्यावर आला की ही दुष्ट माणसे मोडतोड करतात, आरडा ओरडा करतात, गोंधळ घालतात, राडा करतात. राक्षस आमचा यज्ञ अपवित्र करतात. ही भुतावळ यज्ञाचा पवित्र अग्नी अशुद्ध करते. एक राजा म्हणून आम्हाला व आमच्या ज्ञानयज्ञाला संरक्षण देणे हे तुझे कर्तव्य आहे”. राजाने सांगितले, गुरुवर्य, आपण काळजी करू नका. मी सैनिक पाठवतो. आमचे सैनिक दुष्ट शक्तींचा बंदोबस्त करतील. त्यांना नष्ट करतील. विश्वामित्र म्हणाले “राक्षस खूप शक्तिशाली आणि धूर्त आहेत. सैनिकांचाच हकनाक बळी जाईल”. राजा म्हणाला, “मग आता करायचे काय. मी स्वतः येऊ का, आपल्या रक्षणासाठी?” विश्वामित्र म्हणाले, “नाही राजा, आपण स्वतः येण्याची काही गरज नाही. आपले शूर वीर पुत्र राम लक्ष्मण या दोघांना फक्त, माझ्याबरोबर पाठवा. राजा म्हणाला माझी मुलं अजून कोवळ्या वयाची आहेत. अननुभवी आहेत. राक्षसां सारख्या दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्या साठी, तयारीचे नाहीत”. राजाचे, हे शब्द ऐकून, विश्वामित्र ऋषी, रागाने ताडकन उठले, आणि म्हणाले, राजा, नाही म्हणायचे असेल, तर स्पष्ट नाही म्हण. लंगड्या सबबी सांगू नकोस. ते ताडताड, बाहेरच्या दाराकडे निघाले. आणि म्हणाले राजा रघुवंशातील राजाच्या दरबारातून ऋषींना नाराज होऊन मोकळ्या हातांनी जावे लागते हे आता आम्हाला समजले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
रामायणाच्या गोष्टी 6 – राक्षसांपासून रक्षणासाठी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात राम-लक्ष्मण Read Post »