Ask only those who truly know.
Vaccines prevent serious infectious diseases. Vaccination is the best, scientific way to build immunity. Some people worry about side effects. Some resist or refuse vaccines. Many trust government vaccines but doubt optional ones.
Remember: Optional does not mean unimportant or unnecessary.
Decide based on: What protects your child best, and What you can afford.
Parents need up-to-date, accurate information. Trust your pediatrician and scientific bodies like the Indian Academy of Pediatrics. Do not rely on rumors, neighborhood advice, or half-knowledge. Vaccines undergo strict testing for safety and effectiveness. Vaccines are life-saving gifts of science. They create a strong shield against dangerous microbes. Protect your child.
Trust science. Choose vaccination.
हा प्रश्न फक्त माहीतगारालाच विचारा.
सध्या अनेक आया शाळेमध्ये जेई लस देऊन घेऊ का असा प्रश्न विचारतात. जरूर देऊन घ्या असे स्पष्ट सांगितले तरी काही लोकांच्या मनात शंका राहतातच. त्याची उत्तर असे आहे. आजार परवडला कि लस ? खर तर लस परवडते. टाळता येण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा. लसी गंभीर संसर्गजन्य रोग टाळतात. लसीकरण हा प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम, वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध झालेला मार्ग आहे. काही लोकांना लसींच्या दुष्परिणामांची काळजी वाटते. काहीजण घाबरून, किंवा विनाकारणही, हट्टीपणाने विरोध करतात. लस घ्यायला स्पष्ट नकार देतात. बरेच जण सरकारी लसींवर विश्वास ठेवतात. पण सरकार न देणाऱ्या ऐच्छिक लसींवर शंका घेतात. ऐच्छिक लसी अनावश्यक नाहीत. आपल्या बाळाच्या हिताचा निर्णय घ्यावा. आपल्याला परवडते की नाही हे बघावे. परवडत असूनही पटले नाही म्हणून टाळू नये. तो मुलावर अन्याय आहे. सरकार पूर्ण देशाला फुकट द्यायला परवडेल एवढ्याच लसी देते. सगळ्या लसी देत नाही. सरकारचे निर्णय देशहिताच्या दृष्टीने घेतलेले असतात. एकेका बाळाच्या हिताच्या दृष्टीने नाही. सरकार देत नसेल त्या लसी खाजगीतून घ्या. मूल तुमचे खाजगी आहे. सरकारी नाही. माहितगाराच्या सल्ल्याने लसिकरणाचा निर्णय घ्या.
सरकारी आरोग्य कर्मचारी माहितगार नसतात. सर्व नर्सेस, सर्व डॉक्टर माहितगार नसतात. सर्व आज्या, शेजारिणी माहितगार नसतात. पालकांना अद्ययावत, अचूक माहिती असणे गरजेचे आहे.
तुमच्या बालरोगतज्ञांवर आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स सारख्या वैज्ञानिक संस्थांवर विश्वास ठेवा. अफवा, ऐकीव बातम्यावर विश्वास ठेवू नका. शेजारीण, वडीलधारे प्रेमाचे असतील पण माहितगार नसतात. लसी सुरक्षित आहेत की नाही, परिणामकारक आहेत की नाही हे तपासण्यासाठी लसींच्या कठोर चाचण्या घेतल्या जातात. लस ही विज्ञानाची जीवरक्षक देणगी आहे. आधुनिक लसी ही विज्ञानाची फळे आहेत. लसी म्हणजे धोकादायक सूक्ष्म जंतूंविरुद्ध लढाईसाठी एक मजबूत संरक्षक ढाल आहे.
विश्वास विज्ञानावर ठेवा. लसीकरण निवडा.
– Dr. Anil Mokashi (Pediatrician)
MBBS, MD, DCH, FIAP, PhD
(Child Growth and Development)


