School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ

School report card

It’s school result season. Annual progress cards are coming home. Both parents and teachers must learn to interpret them correctly. This is not just about marks — it’s about understanding the child. Scientific evaluation helps families take timely, appropriate action.

शाळांचे निकाल लागण्याचे दिवस आहेत. प्रगती पुस्तके घरी येऊ लागली आहेत. पालक आणि शिक्षकांनी या प्रगती पुस्तकांचा योग्य अर्थ समजावून घ्यायला हवा. हे फक्त मिळालेल्या गुणांचेच नाही, तर मुलाच्या सर्वांगीण विकासाचे परीक्षण आहे. असे वैज्ञानिक मूल्यांकन केल्याने योग्य वेळी योग्य उपाययोजना करता येतात.

  1. Consistently High Scores in All Subjects.
    सर्व विषयांत सातत्याने उच्च गुण.

Always above 80% in all subjects. Indicates Cognitive excellence. Indicates strong memory, attention span, and a well-rounded cognitive profile. He will learn anyway. He will learn well. He will learn independently.

सर्वच विषयांमध्ये सातत्याने उच्च गुण मिळणे. नेहमीच सर्व विषयात ८० % वर.
बौद्धिक क्षमता दाखवते. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि समतोल बौद्धिक विकास होतो आहे असे दाखवते. कसाही शिकेल. छान शिकेल. स्वतःहून शिकेल.

  1. High scores in Language subjects, low in Math / Science
    भाषा विषयात चांगले गुण, पण गणित / विज्ञानात कमी गुण.

Indicates Language Skills. Shows verbal intelligence, reading strength, and creativity. Difficulty in abstract reasoning or numerical logic. He needs further understanding efforts and study.

भाषिक क्षमता चांगली आहे. कल्पकता आहे. पण अमूर्त, अस्तित्वात नसलेल्या संकल्पना व गणितामध्ये अडचणी आहेत. या क्षेत्रात अभ्यास, प्रयत्नाची व समज येण्याची गरज आहे. वाचून लिहून शिकेल.

  1. High Marks in Art, Craft, Music, or Handwriting.
    चित्रकला, हस्तकला, संगीत किंवा अक्षरलेखन यामध्ये चांगले गुण

Sensory-Motor (five senses and movements) are good. & Spatial Skills are good. Reflects strengths in coordination, visual intelligence, and fine motor skills. he understands picture language better. Bring books with lot of pictures. Bring audio books. He will learn better by hearing and seeing.

संवेदी-मोटर (पंचेंद्रिये व हालचाली) छान आहेत. जागा, अवकाश याची समज चांगली आहे. सुक्ष्म हालचाली, सौंदर्यदृष्टी व दृश्य समज छान आहेत. याला चित्रांची भाषा जास्त चांगली समजते. सचित्र पुस्तके वापरा.
ओडीओ पुस्तके वापरा. तो ऐकून शिकेल. बघून शिकेल.

  1. Fluctuating Scores over terms.
    वेगवेगळ्या सत्रांमध्ये गुणांमध्ये चढ-उतार.

Indicates emotional status. His behavior and discipline needs attention. May suggest emotional ups and downs, home stress, or variable motivation.
The child may prefer doing nothing, rather than risk being scolded for mistakes.

भावनिक स्थिती जरा अस्थिर असेल. वर्तणूक, शिस्त याकडे लक्ष द्यायला हवे. भावनिक उलथापालथ, घरचा, शाळेचा, बाहेरचा ताणतणाव. काहीही कृती करायची इच्छाच नसणे. काहीतरी करून बोलणी खाण्यापेक्षा काहीच करायचे नाही. म्हणजे कुणी बारीक सारीक चुकांसाठी रागावण्याचा प्रश्नच उरत नाही.

  1. Low marks despite regular attendance.
    हजेरी नियमित असूनही गुण कमी.

The difficulty may lie within the child.
Learning difficulties. Reading, writing difficulties. Indicates learning disability, attention deficit, or a mismatch in teaching style. If I can not learn the way you teach, teach me the way I learn.

समस्या मुलात असण्याची शक्यता जास्त. शिकण्यात अडचणी. वाचन दोष. लेखन दोष. शिक्षण शैलीतील विसंगती, विचलित होणे. तुम्ही शिकवता, ते मला समजत नसेल, तर मला समजेल, असं तुम्ही शिकवा ना.

  1. Strong Performance in Projects & Oral Work, but Weak in Written Exams.
    प्रकल्प व तोंडी उत्तरात चांगले, पण लेखी परीक्षेत कमी गुण.

He may have Practical Intelligence. Shows real-world understanding and communication skills. May struggle with rote memory or time pressure. A tortoise is not expected to run with a hare. He will learn better by doing things. Vocational education suits him.

त्याला प्रात्यक्षिक बुध्दी चांगली असेल. व्यवहारज्ञान व संवादकौशल्य चांगले, पण पाठांतर व वेळेचे गणित जुळवण्यात अडचण असू शकते. कासवाने सशाच्या गतीने कसे पळावे? तो “करून शिकणारा”” मुलगा असेल. त्याला “व्यवसाय शिक्षण” जास्त उपयुक्त ठरेल.

  1. Consistent Remarks Like “Talkative”, “Helpful”, “Good in Groups”
    शिक्षकांचे निरीक्षण : “बोलका आहे”, “मदतीस धावतो”, “गटामध्ये उठून दिसतो”

He may have good Social & Emotional Intelligence. Indicates leadership, empathy, and peer acceptance. Watch for future team-based strengths. Team games suit him. He may have many friends. His company needs to be observed.

त्याची सामाजिक कौशल्ये व भावनिक बुद्धिमत्ता चांगली असू शकते. नेतृत्व, सहवेदना (empathy) आणि मित्रांशी, सहकार्यांशी जुळवून घेणार. सांघिक खेळ जास्त उपयुक्त ठरतील. भरपूर मित्र असणार. संगत चांगली असण्याकडे लक्ष ठेवायला हवे.

  1. Remarks Like “Easily Distracted”, “Does Not Complete Work”
    शिक्षकांचे निरीक्षण : “लक्ष विचलित होते”, “काम पूर्ण करत नाही”

Problem may be with “Executive Functioning”. That means “Thoughtful action skills”.
Indicates difficulty in task planning, sequencing, or self-monitoring. May need structured support.

“विचारपूर्वक वागण्याची क्षमता” (कार्यकारी कौशल्ये) कमी असू शकते. कामाचे नियोजन, कामाचे टप्पे, पायर्या, क्रम ठरवता न येणे. कामाचे स्वतःचे मूल्यमापन यामध्ये अडचण असू शकते.

  1. Sudden Improvement Over the Year.
    वर्षभरात अचानक प्रगती होणे

That means he has “Growth Potential”. Shows brain adaptability, new motivation, or successful teaching match, good teacher, good friend. Something good is happening in his life. That is helping him learn better. Find it out. It is important.

त्याच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे. मेंदूची लवचिकता, नवीन प्रेरणा किंवा योग्य अध्यापन शैली, चांगला शिक्षक, चांगला मित्र. त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडते आहे. त्यामुळे तो चांगला शिकत आहे. शोधून काढा. महत्वाचे आहे ते.

  1. Always Average (50–70%) Across Subjects with No Change.
    सर्व विषयांमध्ये कायमच मध्यम (५०–७०%) गुण.

He has a problem of Under stimulation. So he has Missed Potential. Boring, educational environment. Problem may be in school, family or society. Could indicate lack of challenge, low expectations, or hidden giftedness.

चेतनारहित, निर्जीव, कंटाळवाणे शैक्षणिक वातावरण. शाळेत, घरात, समाजात काहीतरी गडबड आहे. त्याच्या क्षमतेला संधीच मिळाली नाही. आव्हानाची कमतरता, स्व-अपेक्षा कमी किंवा दडलेली हुशारी सुचवते.

A child’s progress card is not just a report — it’s a window into his learning journey. Let’s read it with care, compassion, and curiosity. Best luck.

Scroll to Top