आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत!

Child Doctor

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत!

बहुतेक वेळा बाळ आजारी पडलं तरच आपण डॉक्टरांकडे जातो.
पण खरंतर बाळासाठी, आणि ते आजारी पडू नये म्हणून डॉक्टरांकडे जावं लागतं.

बाळ महत्वाचं आहे.
बाळ निरोगी ठेवायचं असेल, तर “काय करायचं?” आणि “काय टाळायचं?” हे डॉक्टरांकडून शिकावं लागतं.

माहितगाराशी अपूरा संपर्क ही एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे.

आई–डॉक्टर नातं कसं असावं?

“विद्यार्थिनी – शिक्षक” असावं

“ग्राहक – व्यापारी” नको

डॉक्टर केवळ उपचार देत नाही – ते मार्गदर्शन करतात.
डॉक्टरांचा पेशंटवर विश्वास असेल, तर ते जबाबदारीने निर्णय घेतात.
विश्वास नसेल, तर फक्त तपासणी करून चिठ्ठी देतात.

डॉक्टरची निवड करताना लक्षात ठेवा…

  • दरवेळी वजन मोजणारा डॉक्टर निवडा
  • त्यांच्याकडे लहान मुलांचा वजनकाटा असायलाच हवा
  • डॉक्टर माहिती देणारा, प्रश्न ऐकणारा, वेळ देणारा असावा
  • “एक भाजी – चार स्वयंपाकी” नको.
    म्हणजेच, सतत डॉक्टर बदलू नका
  • मेडिकल शॉपिंग टाळा
  • डॉक्टरवर विश्वास ठेवा
  • डॉक्टरच्या सुईपेक्षा डॉक्टरवर विश्वास ठेवा
  • तपासणी फी आपणहून द्या – म्हणजे अनावश्यक इंजेक्शन्स टळतील
  • लोक मागतात म्हणून डॉक्टर इंजेक्शन देतात,
    आणि डॉक्टर देतात म्हणून लोक मागतात – हे दुष्टचक्र आहे
  • रिपोर्टपेक्षा डॉक्टर अधिक जाणकार असतो
  • रिपोर्ट हे डॉक्टरांचे मदतनीस आहेत, मालक नाहीत
  • डॉक्टर पेशंट तपासूनच रिपोर्टची गरज ठरवतो
  • फक्त रिपोर्ट बघून उपचार होत नाहीत
  • ट्रीटमेंट रिपोर्टला नसते – पेशंटला असते
  • गुगल डॉक्टर ≠ खरे डॉक्टर
  • इंटरनेट माहिती देतो
  • डॉक्टर निर्णय घेतो त्या निर्णयामागे अनुभव, अभ्यास आणि बाळाच्या हिताचा विचार असतो
  • शिकलेली, कमावती आईनेसुद्धा….बाल संगोपनासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन स्वीकारावं.

आपल्या शिक्षणपद्धतीत बाल संगोपनाचं वैज्ञानिक शिक्षण नसतं.
बाळाच्या गरजेनुसार आईला वेळीवेळी नव्याने शिकावं लागतं.
हे काम डॉक्टर करू शकतो – आणि करायलाच हवं.

डॉक्टर – आई – बाळ : एक सहजीवन

आपुलकीचे संबंध हवे

डॉक्टरच आदर्श माता घडवू शकतो.

बाळासाठी डॉक्टर हवे – फक्त आजारासाठी नव्हे!

बेस्ट लक!

Scroll to Top