कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर – गोष्ट भारतीय इतिहासाच्या मालिकेतली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आधी चार-पाचशे वर्षे महाराष्ट्रात सुलतानांची जुलमी राजवट होती. ते माणसांना माणसांसारखे वागवत नव्हते. जनावरांसारखे वागवत होते. सुलतानांनी नेमलेले वतनदार जनतेला छळत होते. त्याकाळची ही गोष्ट आहे. सिंहगडाची.
खूप उंच डोंगर. त्यावर गड. सिंहासारखा. म्हणून त्याचं नाव – सिंहगड! पूर्वी याचं नाव कोंढाणा होतं! कोंढाणा म्हणजे शूरवीरांचा डोंगर. कोंढाणा डोंगर दिवसात झोपलेला असायचा – शांत, निवांत, गडावरच्या पक्ष्यांसारखा. पण शत्रू जवळ आला की, तो जागा व्हायचा – सिंहासारखा गुरगुरणारा, वाऱ्यासारखा झेपावणारा!
कोंढाण्याच्या पायथ्याला शूर लोक राहत होते – धाडसी, रक्षण करणारे! कोणी शेतकरी, कोणी लढवय्ये, कोणी गड राखणारे.
एका रात्री, गावात बातमी आली “शत्रू येत आहेत! किल्ला घ्यायला!” पण लोक घाबरले नाहीत. एक धाडसी तरुण पुढे आला. त्याचं नाव होतं भिला. भिला म्हणाला: “आपण गडावर राहतो. तो आपला आहे.
गड राखणं हे आपलं काम आहे. कोण कोण येणार माझ्याबरोबर. सगळे धावत आले – मुलं, मोठे, बायका, आजी-आजोबा सर्वांनी मिळून कोंढाण्याच्या मुख्य दरवाजाला लोखंडाची जाड मोठ्ठी साखळी बांधली. शत्रू आले, पण त्यांना आत येता आलं नाही. सामान्य लोकांच्या धाडसामुळे गड टिकला. शत्रू हरला.
कोंढाणा हसला. म्हणाला: “माझे लोक जागे आहेत. मी झोपणार नाही!”
हे डोंगर, हे किल्ले, हे आपलं इतिहासाचं धन आहे!
म्हणा सगळ्यांनी:
कोंढाणा उंच होता!
कोंढाणा शूर होता!
कोंढाणा आपला होता!
कोंढाणा झुकला नाही!
कोंढाणा हरला नाही!
आपणही शूर वीर बनू
आपल्या देशाचा गड राखू!
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
भारतमाता की जय.
जय हिंद.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


