भारतीय इतिहासाच्या गोष्टी. 6
“भक्त पुंडलिक आणि पंढरपूरचा देव विठोबा”
भक्त पुंडलिक आणि पंढरपूरचा देव विठोबा एकच नाही.
पुंडलिक हा एक देवाचा भक्त होता — देव नव्हता! तो आपल्या आई-वडीलांनाच देव मानायचा. आई-वडिलांची सेवा हे आपलं कर्तव्य मानायचा.
कर्तव्य म्हणजे काय? कर्तव्य म्हणजे आपली जबाबदारी मनापासून पार पाडणं! हिंदीत यालाच दायित्व, आणि इंग्रजीत ड्यूटी म्हणतात.
पुंडलिकाच्या भक्तीवर आणि श्रद्धेवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटायला आले! पण तेव्हाही पुंडलिक आईचे पाय दाबत होता. त्याने देवाला थांबायला सांगितलं.
आणि एक विट श्रीकृष्णाच्या पायाखाली ठेवली.
श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले म्हणून त्यांचे नाव विठोबा पडले.
विठोबा म्हणजेच श्रीकृष्णाचे, विष्णूचे रूप. पंढरपूरच्या मंदिरात विटेवर उभे असलेले विठोबा —वाट पाहणारे देव आहेत.
कुणाची वाट?
– भक्ताची!
– वारी करणाऱ्यांची!!
– आपल्या सगळ्यांची!!!
शेजारी उभी असलेली देवी म्हणजे रुक्मिणी. पंढरपूरची वारी, विठोबाची मूर्ती, पुंडलिकाचं कर्तव्य, आणि भक्तीचं बळ — हे सगळं आहे,
आपलं, महाराष्ट्राचं वैभव!
जय महाराष्ट्र!
जय हिंद!
भारत माता की जय!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


