भारतीय इतिहासाच्या गोष्टी. 9
संत नामदेव महाराज यांची गोष्ट.
भारतीय इतिहासात महाराष्ट्राची संतपरंपरा खूप महत्त्वाची आहे. संत नामदेव महाराज यांची गोष्ट त्यातले एक तेजस्वी पान आहे.
संत नामदेव यांनी विठ्ठल भक्तीचा मार्ग निवडला.
पंढरपूरच्या वारीने हे महत्त्व आजही टिकून आहे.
- “नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस”
– संत नामदेवानी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. भक्ती लोकांपर्यंत नेली. विठ्ठल भक्तीचे घर बांधले. तर तुकाराम महाराजांनी त्या भक्तीच्या परंपरेचा कळस चढवला. अभंगांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला तेज दिलं.
2.“सत्य सोडून देऊ नये.”
नामदेव म्हणतात, खोटं बोलणं म्हणजे देवापासून दूर जाणं. शाळेत, घरी, मित्रांत – सत्याला धरून राहा. नेहमी खरे बोला.
3.“सर्वत्र विठोबा आहे.”
प्रत्येक माणसात देव आहे. सर्वांशी नीट वागावे.
- “भक्ती ही करायची वस्तू नाही, ती जगायची गोष्ट आहे.”
फक्त देवळात जाऊन प्रार्थना नाही, तर रोजच्या वागण्यात दयाळूपणा, मदत, चांगुलपणा — हाच खरा देव.
- “पोटापुरता विचार करा, लोभ धरू नका.”
नामदेव सांगतात, गरजेपुरतं घेतलं की समाधान मिळतं. जास्तीचा लोभ शेवटी त्रास देतो. “दोन पेढे छान, पण दोन किलो खाल्ले तर?” दोन जिलब्या छान पण दोन किलो खाल्ल्या तर. गरजे पुरतं घेतलं की समाधान मिळतं.
“श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.
श्री संत नामदेव महाराज की जय.
श्री संत एकनाथ महाराज की जय.”
जय महाराष्ट्र.
जय हिंद.
भारत माता की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


