काश्मीर चे कलम ३७०

Article 370

काश्मीर चे कलम ३७०.

भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचं राज्य गेलं. भारतातले लोक आनंदात होते. पाकिस्तानने काश्मीर राज्य पाकिस्तानात सामील करून घेण्याचा घाट घातला.

निम्मा काश्मीर घेऊन पाकिस्तानी फौजा काश्मीरची राजधानी श्रीनगर पर्यंत आल्या.
भारताचे सैनिक सज्ज झाले. त्यांनी धैर्याने लढा दिला. काश्मीरचा काही भाग वाचला. काही भाग पाकिस्तानकडे राहिला. त्या भागाला आज
“पाकव्याप्त काश्मीर” म्हणतात.


उरलेला काश्मीर भारतात राहिला. पण एक विशेष नियम होता. त्याला म्हणत कलम ३७०.
या नियमामुळे काश्मीरला विशेष दर्जा होता.
इतर राज्यांपेक्षा वेगळे नियम होते.

काही भारतीय कायदे तिथे लागू होत नव्हते.
वर्षानुवर्षे तसेच चालले. लोकांच्या मनात प्रश्न होते. “सगळ्यांसाठी एकच नियम का नाही ?”
काश्मीरला वेगळा कायदा का.

२०१९ साल आले. मोठा निर्णय झाला. भारत सरकारने संसदेत बहुमताने कलम ३७० काढून टाकले. आता काश्मीर पूर्ण भारताचा भाग झाला. सगळे कायदे लागू झाले.

श्रीनगरमधील लाल चौक. इथे एके काळी तिरंगा फडकवणे कठीण होते. त्याच लाल चौकात आता अभिमानाने तिरंगा फडकतो.

हळूहळू बदल दिसू लागले. शाळा, रस्ते, विकास वाढला. पर्यटक येऊ लागले. लोक आनंदाने फिरू लागले.

“एक देश, एक नियम.” “सर्वांना समान अधिकार.” काश्मीर चे कलम ३७० काढून टाकल्याने भारतभर एकता आणि समानतेची भावना वाढली.

ठाम आणि निर्णायक निर्णय घेणारा, कायद्याने चालणारा, लोकशाही देश म्हणून भारताने जगात आपली ओळख मजबूत केली.

भारत माता की जय
वंदे मातरम
जय हिंद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top