अयोध्येचे श्री राम मंदिर : श्रद्धा, इतिहास आणि एकतेची गोष्ट
एक शहर होते — प्राचीन.
नाव होते — अयोध्या.
इथे श्री रामाचा जन्म झाला.
रामायणात त्याचे वर्णन आहे.
लोक तिथे दर्शन घेत असत.
काळ बदलत गेला.
राजे बदलत गेले.
अनेक घटना घडल्या.
इतिहास गुंतागुंतीचा झाला.
लोकांच्या मनात श्रद्धा होती.
पण मतभेदही होते.
प्रश्न कोर्टात गेला.
दीर्घकाळ चालला.
शेवटी पाचशे वर्षांनी निर्णय झाला —
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात.
त्या जागी मंदिर बांधायचे.
इतर ठिकाणी मशीद बांधायची.
सर्वांनी निर्णय मान्य केला.
शांतता राखली.
भव्य मंदिर उभे राहिले.
रामलल्ला आता तंबूत नाहीत.
ते भव्य मंदिरात विराजमान झाले.
सगळ्यांनी आनंद साजरा केला.
रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली.
मंदिरात आरती झाली.
देशभर दिवे लागले.
लोक आनंदात होते.
“राम म्हणजे मर्यादा.”
आपल्या मर्यादा, लक्ष्मणरेषा ओलांडू नका.
कंट्रोल मॅन कंट्रोल.
“राम म्हणजे सत्य.”
चुकीचं बोलायचं नाही.
चुकीचं वागायचं नाही.
“राम म्हणजे कर्तव्य.”
आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य नीट पाळायचं.
“आपण असे वागलो,
तर रामराज्य येईल.”
आपला भारत देश मजबूत होईल.
प्रभू श्री रामचंद्र की जय
भारत माता की जय
वंदे मातरम
जय हिंद
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


