ऑटिझम आणि सेन्सरी ओव्हरलोड
ऑटिझम असलेल्या अनेक मुलांना आपल्या आजूबाजूचे जग इतरांपेक्षा खूप जास्त तीव्रतेने जाणवते.
आपल्याला साधारण वाटणारा आवाज, प्रकाश, गर्दी, स्पर्श किंवा गोंधळ त्यांच्यासाठी असह्य ठरू शकतो.
मोठ्या स्पीकरजवळ, प्रखर दिव्यांमध्ये, गर्दीत, अंगाला टोचणारे कपडे घालून सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करा…
सेन्सरी ओव्हरलोड साधारण असा अनुभव असू शकतो.
अशा वेळी मूल:
- कान झाकते
- रडते
- चिडते
- बोलणे थांबवते
- लपते
- पळून जाते
- वारंवार तीच हालचाल करणे (Stimming) उदा. हात हलवणे, डोलणे, गुणगुणणे किंवा एका ठिकाणी फिरत राहणे.
झोपेच्या वेळी खूप वळवळ करणे. - सहकार्य करत नाही
हा हट्टीपणा नसतो.
मूल जणू सांगत असते—
“माझ्या मेंदूला थोडी विश्रांती हवी आहे.”
अशा वेळी शिक्षा उपयोगाची नसते.
उपाय म्हणजे—
- आवाज कमी करा.
- गर्दी कमी करा.
- ताण कमी करा.
- स्वतः शांत राहा.
- मुलाला सावरण्यास वेळ द्या.
मेंदू पुन्हा शांत झाला की मूल पुन्हा शिकू शकते, बोलू शकते आणि सहकार्यही करू शकते.
सेन्सरी ओव्हरलोड हा शिस्तीचा प्रश्न नाही;
तो मज्जासंस्थेवर आलेल्या ताणाचा प्रश्न आहे.”
AUTISM AND SENSORY OVERLOAD.
Sensory overload is one of the commonest hidden challenges in Autism Spectrum Disorder (ASD). The autistic brain often processes sensory information differently rather than simply more or less intensely. Ordinary environmental stimuli—such as noise, bright lights, crowds, certain textures, smells, touch, or unexpected changes—may exceed the individual’s sensory processing capacity.
When this happens, the child is not being defiant or manipulative. The nervous system has become overwhelmed.
Clinical manifestations may include:
- Covering ears or eyes
- Avoiding touch
- Repetitive self-regulating behaviours (stimming), hand flapping, rocking, humming, too many movements while sleeping.
- Withdrawal or shutdown
- Crying or screaming
- Aggression or self-injury
- Escape behaviour
- Loss of communication
- Difficulty following instructions
The first intervention is not behaviour correction—it is reducing sensory load.
Management includes:
- Identify individual sensory triggers.
- Modify the environment whenever possible.
- Provide predictable routines.
- Allow sensory breaks.
- Respect the child’s need for recovery time.
- Teach self-regulation gradually.
“A sensory overload is not a discipline problem. It is a nervous system problem.”
– Dr. Anil Mokashi (Pediatrician)
MBBS, MD, DCH, FIAP, PhD
(Child Growth and Development)


