भारतीय इतिहासाच्या गोष्टी- 7
वारी निघाली पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर वाटेला
पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल!
ज्ञानोबा माऊली, तुकाराम!
पंढरीनाथ महाराज की जय!
वारी निघाली पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर वाटेला,
पावले पडती ठेक्याला
हाती ताल, टाळ-मृदंगाला.
वारी निघाली पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर वाटेला,
चंद्रकोरी वळण भीमेला,
म्हणती चंद्रभागा नदीला,
वारी येते आषाढीला,
सारा आनंद लागे, चालायला
वारी निघाली पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर वाटेला,
तुका म्हणे वारी, म्हणजे शाळा,
भक्ती, सेवा, समानता पाळा.
नाही कोणी मोठा, नाही लहान,
एक समान सारे, वारकरी महान
वारी निघाली, पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर, वाटेला,
गळ्यात माळ, मुखात नाम,
हाती दिंडी, ओठी ओवी गान.
नाही दर्प, नाही अहंकार,
विठोबा सोबत, ध्यान वाटे वर.
वारी निघाली, पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर, वाटेला,
तीन पिढ्या चालती, एकत्र
आजोबा पिता, आणि पुत्र
वारीत उत्साह, संचारे सर्वत्र
उरे आनंदाची, गोडी पवित्र
वारी निघाली, पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर, वाटेला,
विठोबा चाले रूपात, माणसाच्या,
असेल का हो तो, सोबतच्या.
मी ही नमतो, तो ही नमतो,
हसतो तो विठ्ठलच, तो हसतो!
वारी निघाली पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर वाटेला,
वारी म्हणजे, मनाचे मंदिर,
वारी माणुसकीचे, अंत रंग.
वारीत चालणं म्हणजे, भारत जपणं,
वारीत विठोबा म्हणजे, आपण सर्व ज ण!
वारी निघाली पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर वाटेला,
नामदेव म्हणती, स्वा नुभ व, जन्माला यावं चालत, पंढरपूरला जा वं!
वारी निघाली पंढरपूरला,
भक्तीच्या सुंदर वाटेला,
पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल!
ज्ञानोबा माऊली, तुकाराम!
पंढरीनाथ महाराज की जय!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


