बडे बच्चों की बातें

A mother engaging with her teenage son holding a smartphone outdoors.

बडे बच्चों च्या मनातील ३० खास गोष्टी. पालकांसाठी मार्गदर्शन, मुलांचे विचार, शिस्त, विश्वास, मैत्री, खेळ व जीवन मूल्यांवरील सुंदर विचार.

१.
चुकांमधूनच मुलं शिकतात. वेळीच चूक दाखवून द्या.

२.
आई शिस्त लावते, रागावते म्हणूनच गरजेची असते. तिच्याशी समंजसपणे बोलावे.

३.
फादर हे “आपले” फादर असतात. त्यांच्याबद्दल टेरर नको. आदर हवा.

४.
मी चांगलं वागायचे नियम आपण एकत्र ठरवू. सोपं पडतं आणि मजाही येते!

५.
माझ्या सारखा मीच. माझी इतरांशी तुलना नको.

६.
माझ्या छोट्या यशाचं तुम्ही केलेलं कौतुक मला खूप आवडतं.

७.
“मला शब्दात सांगता येत नाही… पण तुम्ही ‘छान केलंस’ म्हटलंत, की एकदम भारी वाटतं!”

८.
तुम्ही “नाही” का म्हणताय, हे सांगितलं तर मला पटतं. मोठ्यांनी सांगितलं ते मुकाट्यानी ऐकायचं कठीण जातं.

९.
घरचं जेवण आवडत नाही, बाहेरचं आवडतं, ती मुलं बिच्चारी दुर्दैवी असतात.

१०.
माझ्यासाठी आखलेल्या मर्यादेच्या लक्ष्मणरेषांमधे मला सुरक्षित वाटतं, अडकल्या सारखं नाही.

११.
कृत्रिम बुद्धिमत्तेला भावना शिकवता येतात.
आपल्या मुलांनाही भावना शिकवता येतात.

१२.
विश्वास ठेवा माझ्यावर, सारखी तीक्ष्ण नजर नको!
मी फुलेन विश्वासातून, परीक्षेतल्या मार्कांचे दडपण नको.

१३.
“अहो, देव बहुतेक माझ्या डोक्यात फिल्टर बसवायचं विसरला…
डोक्यात विचार आले की ते तोंडातून सरळ बाहेर पडतात!”

१४.
आई, बाबा… स्टेअरिंग माझ्या हातात ठेवा ना! तुम्ही नेव्हिगेटर व्हा – गरज असेल तेव्हा सांगाच!

१५.
“रस्ता मोठा आहे. मी लहान आहे. लायसन्स लर्निंग आहे.
चुकीला माफी हवी. राग नको, साथ हवी. ड्रायव्हर शिकत आहे.
समज येत आहे.”

१६.
“मला काय आवडतं” विचारणार
तर माझं मलाच समजणार
मजा येईल, जमेल तेच करणार,
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार!

१७.
तुम्ही आज्ञा दिलीत, तर मी फक्त ऐकतो.
तुम्ही पर्याय दिलात, तर मी विचार करतो.
मला आवडेल तो पर्याय माझा मी निवडतो.

१८.
माझा प्रयत्न माझा असतो. तुमची साथ हवी… पण तुमचा हट्ट नको.

१९.
मी माझ्या स्पीडनी चालतो, मी माझा वेळ घेतो,
तुमची विश्वासाची सोबत, मनातून मी जाणतो.
फुल उमलायचं ठरलेलं, याची खात्री असते,
पोचेन नक्की, मागं राहणं माझ्या स्वभावात नसते!

२०.
खेळ म्हणजे आहे एक धमाल दुकान,
मिळतं इथे शरीर-मनाच्या फिटनेसचं सामान.
जिंकलो तर छान, हरलो तर मांडू नवा डाव छान,
अंपायरच चुकला तर पार्टीचा चान्स महान!


Social Development

२१.
मित्रच शिकवतात चांगल्या वाईट कला,
त्यांच्या एका हाळीने उत्साह येतो मला
घरच्यांनी सांगितलं तर फक्त डोकं हलवतो,
मित्राचं मात्र पटतं, लगेच करून टाकतो!

२२.
मित्र हवा निरपेक्ष साथ देणारा,
आहे तसा मला स्वीकारणारा.
चुकलो तर वेळीच थांबवणारा,
मर्यादा पाळत एन्जॉयही करणारा.

२३.
समोरच्याचा खोडरबर, खाली पडला,
पायाच्या बोटांनी मी, हळूच ओढला.
देऊन टाक त्याचा त्याला, मित्र म्हणाला.
नाही तर चोरायची, सवयच लागेल तुला.

२४.
“वर्गात केला दंगा, सगळ्यांनी ‘हिरो’ बनवलं,
‘आलायस काय शिकायला, मित्रानं विचारलं.
धरून नाही यार हे शाळेच्या शिस्तीला
मोठेपणी ‘व्हिलन’ व्हायचंय का तुला!”

२५.
पाळीव प्राणी माणसाळती,
जंगली श्वापदेही वश होती,
मोबाइल-व्यसनी नाठाळ घोडे,
घरकाम, खेळ, माणसांत जोडे.

२६.
मित्रांचं जग भन्नाट, सैराट,
कधी कधी सुसाट वादळवाट.
घरची खोल मुळे देतात स्थैर्य अपार,
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

२७.
घरच्यांपेक्षा मित्रांचं मला जरा जास्तच पटतं.
कारण त्यांचं डोकं माझ्यासारखंच चालतं
मित्रांबरोबर कसंही काहीही बोललं तरी चालतं
घरचं आणि मित्रांचं जग दोन्ही मला लागतं.

२८.
मोबाईल गेम, व्हिडिओ, नुसता टाइमपास
त्यांच्या विळख्यात, खऱ्या जगाला मुकलास
होऊन बसलेत मालक, त्यांना गुलाम कर
आवडेल ते शिकण्यासाठी, त्यांचा वापर कर.

२९.
भांडण मारामारी करायला अक्कल कुठे लागते
वाद, प्रश्न सोडवायची कला शिकावी लागते
मैदान सोडून पळून जाऊन प्रश्न नाही सुटणार
ते आहेत तसेच रहाणार, जास्तच चिघळणार.

३०.
मित्रांशिवाय लाईफ, आहे जाम बोअरिंग.
जुने दोस्तच असतात, बेस्ट सूदिंग.
करतात कधी लिफ्टिंग, तर कधी ट्रोलिंग.
म्हणून मित्र निवडतांना, करा जरा थिंकिंग.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top