भारतीय इतिहासाच्या गोष्टी – महाराणा प्रताप: स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा.
महाराणा प्रतापसिंह सिसोदिया! मेवाडचा पराक्रमी राजा! शिवाजी महाराजांच्या शंभर वर्षे आधी महाराणा प्रताप होऊन गेले. महाराणा प्रताप यांनी अकबराशी संघर्ष केला. शिवाजी महाराजांनी अकबराचा नातू औरंगजेब याच्याशी संघर्ष केला.
राणा प्रतापाने स्वाभिमानाची ज्योत पेटवली, आणि शिवाजी महाराजांनी त्या ज्योतीला स्वराज्याचं रूप दिलं. महाराणा प्रताप याच राज्य अरावलीच्या डोंगररांगांमध्ये हिरवाईनी, किल्ल्यांनी, आणि शूर लोकांनी भरलेलं होतं. दिल्लीचा बादशहा अकबर सगळं भारतभर आपलं साम्राज्य पसरवत होता.
अकबर म्हणाला, “राणा, माझा मांडलिक हो, माझ्या दरबारात येऊन कुर्नीसात कर.” पण स्वाभिमानी राणा प्रतापने ठाम उत्तर दिलं –“मी माझ्या मातृभूमीचा राजा आहे. मी कोणाचा गुलाम होऊ शकत नाही!”
अकबर मोठी फौज घेऊन आला. हल्दीघाटीचं युद्ध झालं! राणा प्रतापाच्या घोड्याचं नाव होतं चेतक. पांढरा शुभ्र, उमदा. राणा प्रतापाच्या तलवारी सारखा लखलखीत. शत्रूही घाबरायचे!
पण लढाई असमान होती. राणाला जंगलात माघार घ्यावी लागली. तो हारला नाही! जंगलात, पर्वतावर, झोपडीत राहून त्याने पुन्हा सेना तयार केली. आपल्या प्रजेला वाचवलं. आपल्या मातीचा अभिमान जपला.
तो सोन्याच्या थाळीत जेवला नाही. त्यानी बांबूच्या वाटीतून मुलांसोबत भाकरी खाल्ली. तो स्वाभिमानाचा राजा होता! जिंकणं म्हणजे नेहमी सिंहासन मिळवणं नाही. जिंकणं म्हणजे मनातला स्वाभिमान न गमावणं! राणा प्रताप यांनी भारताला “स्वराज्य” आणि “संघर्ष” शिकवला.
“राणा का प्रताप अमर है, स्वाभिमान की ज्योति प्रखर है।” महाराणा ना होते, महाराणा ना होते, ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते. ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते.
महाराणा प्रताप की जय.
जय महाराष्ट्र.
जय हिंद.
भारत माता की जय.
– Dr. Anil Mokashi (Pediatrician)
MBBS, MD, DCH, FIAP, PhD
(Child Growth and Development)


