Dr. Anil Mokashi

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला!

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामानी हनुमानाला लंकेची बित्तमबातमी विचारली. स्वारी करायला कोणता मार्ग कमी धोक्याचा आहे. रक्षणासाठी किती सैन्यबळ आहे. लंके भोवती किती कोट आहेत. हल्ला करायला, कोणता मार्ग सोयीचा आहे. राक्षस नागरिकांचे रावणाविषयी काय मत आहे. हनुमानानी हेराच्या नजरेनी लंकेतील अनेक बारकावे टिपले होते. श्रीरामानी सुग्रीवाला विचारले. एवढा मोठा समुद्र ओलांडून आपले वानर सैन्य लंकेपर्यंत कसे पोचेल. सुग्रीव म्हणाला. काळजी करू नका. आपण सागरावर सेतू उभारू, पूल उभारू त्याचं नाव रामसेतू ठेवू. आणि या रामसेतूवरून आपले कोट्यावधी वानर सैन्य लंकेत घुसवू. वानर सेनापतींनीभराभर हुकूम सोडले. विस्कळीत वानर सैन्य दाही दिशातून गोळा झाले. पाहता पाहता ते सैन्य एखाद्या सागराप्रमाणे पसरले. लाटांप्रमाणे उसळणाऱ्या वानर सेनेच्या समोर महाप्रतापी श्रीराम आपल्या तेजस्वी पावलांनी चालत होते. वानर सैन्यात विलक्षण उत्साह संचारला होता. जय श्रीराम जय श्रीराम असे नारे दिले जात होते. दुष्ट राक्षस शक्तींना हरवून रामराज्य उभारण्यासाठी विशाल वानर सेना लंके कडे निघाली होती. जय श्रीराम, या एका ना-याने अनेक राक्षस भयभीत झाले. पण चारी दिशातून जय श्रीराम नाऱ्यानी आकाश दणाणले. वाटेत काही राक्षसांची राज्ये होती. जय श्रीराम या नाऱ्याचा अनेकांना, राग येऊ लागला. जय श्रीराम हा नारा ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. एवढी प्रचंड मोठी वानर सेना अंगावर येतांना पाहून काही चोरांना वाटले की ही कुठल्या तरी भयंकर आजाराची साथ आहे. पण सीतामातेचे कपटाने अपहरण केल्याचा राग संपूर्ण भारतवर्षात होता. जनतेचे श्रीरामांना समर्थन होते. सारे वानरसैन्य, अतिशय शिस्तीत सागर तीरावर आले. समोरचा अथांग सागर ओलांडून सगळ्यांना पलीकडे जायचे होते. रामसेतू कोण व कसा बांधणार हाच यक्ष प्रश्न होता. म्हणजे खूप मोठा प्रश्न होता. वानर सेना स्वारीला, निघाली लंकेला! प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला! Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लंकेत सीतेला भेटून, रावणाला धडा शिकवून, लंका दहन करून हनुमान आकाश मार्गे उडत उडत परत आला. तो जसा वानर सेनेसमोर आला, तसे सगळे वानर आनंदाने उड्या मारू लागले. “जय हनुमान! जय श्रीराम!” असा जयघोष झाला. हनुमान लगेच रामाकडे गेला आणि त्याला सगळी कहाणी सांगितली—सीतेच्या धैर्याची, रावणाच्या क्रूरतेची आणि लंकेच्या विध्वंसाची. रावणाच्या राज्याची. त्याच्या सामर्थ्याची. त्याच्या सैन्याची. सगळ्या गुप्त बातम्या हनुमानाने श्रीरामांना सांगितल्या. सीतेने हनुमानाला दिलेले सोन्याचे कंगण बघून श्रीरामाला धीर आला. सीता सुखरूप असल्याची ती खूण होती. हनुमानाने रामाला एक विनंती केली, “मला सदैव तुमच्या सेवेत राहायचं आहे!” राम प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला प्रेमाने आशीर्वाद दिला. आणि तथास्तु म्हटले. आता वेळ आली होती मोठ्या निर्णयाची! राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमानाने ठरवलं—संपूर्ण वानरसेनेसह लंकेवर चढाई करायची, सीतेला परत आणायचं! ते वानर सेनेची जमवाजमव करायच्या तयारीला लागले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट Read Post »

Stages of Child growth illustration

बालपणाचे विज्ञान 1

#31 1) बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवा. २). जुलाब, डीहायड्रेशन, पाणी १) अंगावर पाजा २) गोवर लस द्या. ३) संडासचा वापर करा. ४) अन्न व पाणी स्वच्छ ठेवा. ५) हात धुवून अन्नाला स्पर्श करा. ६) माशांचा नायनाट करा. 3) फक्त स्तनपान काही आयांना मदतीचा हात लागतो. अंगावरचे दूध नैसर्गिकपणे सुटते. दुध वाढवण॒यासाठी नैसर्गिक मार्ग वापरा.अंगावरचे दुध वाढवणा-या गोष्टी १) वारंवार चोखणे२) वारंवार रिकामे करणे३) चांगला आहार४) कमी काळजी. १.पान्हा फुटतो.२.वजन वाढते ३.बाळ छान झोपते.४.सात आठ वेळा संडास होते.५.दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा लघवी होते. 4) बाटली पुतनामावशी आहे. 5) वरचे दूध नको. 6) मुलांना अन्न लागते. १)  दोन वर्ष अंगावर पाजा.२) सहाव्या महिन्याला कांजी द्या.३) कांजित प्रथिने घाला.४) कांजित फळे किंवा भाजी घाला.५) दिवसातून चार वेळा कांजी द्या.६) आजारी बाळाला अन्न द्या. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 1 Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रावणाने राक्षसांना, मारुतीच्या शेपटीला, कपडे चिंध्या बांधून, त्यावर तेल ओतून, पेटवून देण्याची, आज्ञा दिली. जसजसे राक्षस, शेपटी भोवती, कपडे गुंडाळत होते, तसतशी शेपटी, मोठी मोठी, होत जात होती. रावण म्हणाला, लंकेतील सगळे, कपडे आणा. एकही कापड दुकान, सोडू नका. हजारो सेवक, पळत सुटले. लंकेतील सगळी, कापड दुकाने लुटली. लंकेच्या एकाही घरात, कापड म्हणून, शिल्लक उरले नाही. सगळे कपडे, हनुमानाच्या शेपटी भोवती, गुंडाळून देखील, थोडेसे शेपूट, शिल्लकच राहिले. सेवकांनी भराभर, त्याच्यावर तेल ओतले. शेपटाला, आग लावून दिली. शेपूट काही पेटेना. रावण स्वतः, पुढे आला, आणि जोरात, फुंकर मारली. त्याबरोबर आग भडकून, रावणाच्या दाढी मिशा, जळून गेल्या. आग भडकल्यानंतर, हनुमान एका, उंच प्रासादावर, उडी मारू बसला. जळत्या शेपटीने, तो प्रासाद, धडाधडा पेटू लागला. भराभर उड्या मारत, या घरावरून, त्या घरावर. या गावातून, त्या गावात. या राज्यातून, त्या राज्यात. संपूर्ण देश, हनुमानाने, काही क्षणात, पेटवून दिला. हनुमानाची, टिंगल टवाळी करत, खदाखदा हसणारे राक्षस, जीवाच्या भीतीने, सैरावैरा पळत सुटले. एकच, हलकल्लोळ, उडाला. आगीच्या ज्वाळा, आकाशाला भिडल्या. जमिनीवर, राखेचे पर्वत, उभे राहिले. राक्षस म्हणाले, रावणाने सीतेला, पळवून आणल्यामुळे, आमच्यावर हा, प्रसंग आला. बिभीषण म्हणाला, करावे तसे, भरावे, पापाचे फळ नेहमीच, कडू असते. संपूर्ण लंका, पेटल्याची, खात्री झाल्यावर, हनुमानाने, समुद्रकिनाऱ्यावर येऊन, समुद्राच्या पाण्यात, आपली शेपटी, विझवली. आणि भराभर, उड्या मारत तो, सीतेजवळ आला. सीता सुखरूप होती. हनुमान सीतेला, भक्ती भावाने, नमस्कार करीत म्हणाला. सीतामाते, तू सुरक्षित असल्याची, खूण म्हणून, तुझ्या हातातील, सोन्याचे कंगण, मला दे. मी ते, श्रीरामांना दाखवीन. तू निश्चिंत रहा. तुझे दुःख, लवकरच, दूर होईल. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 29 – रावणाच्या दरबारात रामाचा हेर-हनुमान!

श्रीराम श्रीराम श्रीराम ! अशोकवनात हनुमानाची सीतेशी भेट झाली. अनेक दिवस त्यानी काही खाल्लंच नव्हतं. त्याच्या पोटात कावळे कोकलत होते. समोर हजारो झाडे आणि त्यांना लगडलेली लाखो फळे! मग काय—हनुमान संपूर्ण अशोकवनावरच तुटून पडला! रसाळ फळे तोंडात बकाबका कोंबली. झाडे उखडली फांद्या मोडल्या जमिनीवर फळांचा चिखलच झाला! पहाऱ्याच्या राक्षसिणी, घाबरून मागे सरकल्या. “कोण हा माकड?” त्यांना कळेना. रावणापर्यंत ही बातमी पोचलीच! “एका माकडाने संपूर्ण अशोकवन उद्ध्वस्त केले आहे!” रावणाचा राग अनावर झाला. “त्याला ठेचून टाका!” रावणानी राक्षस सैन्य पाठवले. पण शक्तीमान, बुद्धिमान, हनुमानापुढे, काही ते टिकले नाही. एका क्षणात सगळे गडाबडा लोळत पडले! शेवटी रावणाने स्वतःच्या बलाढ्य मुलाला पाठवले—अंगदला! हनुमानाच्या मनात एक योजना होती. हनुमानाला तर रावणाच्या दरबारात जायचे होते. सगळ्या गुप्त बातम्या रामापर्यंत, पोचवायच्या होत्या. मग काय? त्याने हुशारीने नाटकच रचले! लढता लढता तो अचानक जोरात ओरडला आणि बेशुद्ध पडला. मूर्च्छित झाला. राक्षसांनी त्याला दोरखंडानी घट्ट बांधले. आणि उचलून रावणाच्या दरबारात आणले. रावण ऐटीत उंच सिंहासनावर बसला होता. पण हनुमानाने आपली शेपटी लांबवली गुंडाळली आणि मोठ्ठं उंच आसन पूच्छासनच तयार केलं आणि रावणापेक्षा फूटभर उंच बसला! “तुच्छ माकडा “अशोकवन उध्वस्त केल्याची शिक्षा तुला मिळेल—मृत्युदंड!” इतक्यात विभीषण उठला. “राजन् हा राजदूत आहे! तोही रामाचा. राजदूताला मारायचे नसते. त्याला दुसरी काहीही शिक्षा द्या” रावण विचारात पडला. त्याच्या डोक्यात कल्पना चमकली. “शेपूट पेटवा याची. शेपटीला चिंध्या बांधा. त्यावर तेल टाका! पेटलेल्या शेपटासह याला गावभर फिरवा. धिंड काढा त्याची! मग समजेल याला राक्षसशक्ती काय असते ते!” दरबारी राक्षस पेटलेल्या शेपटाकडे पाहून खदाखदा हसू लागले. हनुमानाची टिंगल टवाळी करू लागले. आणि हनुमान? तो तर पेटलेल्या शेपटाकडे पाहून मनातल्या मनात गालातल्या गालात खुदुखुदू हसत होता! त्याच्या सुपिक डोसक्यात एक भन्नाट आयडियाची कल्पना शिजत होती… प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 29 – रावणाच्या दरबारात रामाचा हेर-हनुमान! Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 28 – हनुमानाला सीता भेटली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! जगात चांगली माणसे जास्त वाईट माणसे कमी असतात. पण राक्षसांच्या राज्यात दुष्ट राक्षस जास्त. आणि एखादाच चांगला बिभीषण असतो. बिभीषणाने सांगितल्यावरून हनुमान सीतेला शोधायला अशोक वनात गेला. अशोक वन अतिशय सुंदर होते. हजारो फळांच्या फुलांच्या झाडांनी बहरलेले होते. शेकडो राक्षसिणी तिथे पहाऱ्यावर होत्या. एका अशोक वृक्षाच्या झाडाखाली पारावर बसलेली सीतामाता हनुमानाला दिसली. हनुमान शांतपणे त्या झाडावरून खालील दृश्य पहात होता. राक्षसिणी सीतेला छळत होत्या. सीता, दुःखी, कष्टी, हताश दिसत होती. कुणीही समोर नाही हे बघून संधी साधून हनुमानाने खाली उडी मारली आणि सीतेसमोर उभा राहिला. सीता घाबरली. तिला वाटले कुणी तरी मायावी राक्षस माकडाचे रूप घेऊन आपल्याला छळायला आलेला आहे. श्रीरामाने दिलेली खुणेची अंगठी सीतेसमोर टाकून हनुमान म्हणाला. मी श्रीरामांचा दूत आहे त्यांनी मला पाठवले आहे. माझी ओळख पटवायला ही अंगठी दिली आहे. अंगठी पाहून सीतेला हायसे वाटले. श्रीराम व लक्ष्मण आपल्याला सोडवायला येत आहेत हे ऐकून तिला आधार वाटला. पण साध्या माकडांचे सैन्य या बलाढ्य राक्षसांना कसे हरवणार. सीतेला चिंता वाटू लागली. हनुमानाने हळूहळू मोठे होत आपल्या प्रचंड स्वरूपाचे दर्शन सीता मातेला घडवले. आणि तिचा हनुमानावर विश्वास बसला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 28 – हनुमानाला सीता भेटली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 27 – राक्षस राज्यात रामभक्त बिभीषण सापडला

श्रीराम श्रीराम श्रीराम ! डासाच्या, सूक्ष्म रूपात, हनुमान, सीतेला शोधत होता. रावणाच्या महालात, सीता दिसली नाही. पण एका महालासमोर त्याला, तुळशीचं, पवित्र वृंदावन दिसलं. राक्षसांच्या राज्यात, तुळशीवृंदावन! त्याला आश्चर्य वाटलं. आत रावणाचा भाऊ बिभीषण मनोभावे श्रीरामाची पूजा करत होता. तो शांत दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर, भक्तीचं तेज होतं. हनुमानाने स्वतःचे मूळ रूप धारण केलं. मी प्रभू श्रीरामाचा दूत हनुमान आहे. अशी स्वतःची ओळख करून दिली. राक्षस असला तरी बिभीषणानी सत्य, धर्म आणि भक्तीचा मार्ग सोडला नव्हता. जाणीवपूर्वक स्वतःच्या इच्छेने ठरवून त्यानी तो मार्ग स्वीकारला होता. राक्षसांच्या राज्यात अधर्माचे वाळवंट असले तरी बिभीषणाच्या रूपानी एक निवडुंग शिल्लक होता. त्याच्या मनात भक्तीचा ओलावा होता. रामावरती श्रद्धा होती. हनुमानाने सीतेला सन्मानाने अयोध्येला परत नेण्यासाठी बिभीषणाची मदत मागितली. मदत करायला बिभीषण आनंदानी तयार झाला. त्यानी सांगितलं, मी नेहमी, सत्याच्या बाजूनी, उभा राहीन. बिभीषणाने सांगितलं, की रावणानी सीतादेवींना अशोक वनात राक्षसींच्या पहाऱ्यात कडे कोट बंदोबस्तात कैद करून ठेवले आहे. सीतामाता, अशोकवनात आहे. हे आता, हनुमानाला समजले होते. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 27 – राक्षस राज्यात रामभक्त बिभीषण सापडला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाची गोष्ट 26 – राक्षसांच्या राज्यात, रामदूत हनुमान

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सर्व संकटांवर मात करत हनुमान लंकेत पोचला. सगळीकडे राक्षसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कडक पहारा होता. काळे कुळकुळीत राक्षस हातात तळपत्या तलवारी घेऊन रस्त्यांवरून फिरत होते. दिवसाढवळ्या रावणाच्या राज्यात जाणे धोक्याचे होते. हनुमानानी रात्र होण्याची वाट पाहीली. आपले अजस्त्र शरीर सूक्ष्म करून अतिशय लहान करून एका डासाचे रूप घेतले. पण ही घटना नेमकी पहाऱ्यावर असलेल्या लंका नावाच्या राक्षसीणिनी पाहिली. तिला शंका आली. तिनी अडवलं. हनुमानानी आपलं खरं रूप प्रकट केलं. आणि आपली एक कठोर वज्रमूठ तिच्या हनुवटीवर जोरात मारली. ती गप्प खालीच बसली. ज्या दिवशी, एका माकडा कडून तुझा पराभव होईल त्या दिवशी लंका नगरीचे वाईट दिवस सुरू होतील. हे भविष्य तिला माहित होते. तो दिवस आज आला आहे हे तिला समजले. रावणानी सीतेला पळवून आणलेय पण कुठे ठेवलेय हे माहित नाही असं तिनी सांगितलं. डासाच्या रूपातला हनुमान, रावणाच्या महालात पोचला. पण त्याला सीता कुठेच दिसली नाही. तो सगळीकडे शोधतच राहिला. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाची गोष्ट 26 – राक्षसांच्या राज्यात, रामदूत हनुमान Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 25 – हनुमान उडी

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीतेचा शोध घेण्यासाठी रामभक्त हनुमान लंके कडे जायला तयार झाला. त्याच्या पराक्रमाला हुशारीला आणि चातुर्याला ते एक आव्हानच होते. त्यानी आपले शरीर हलवून एक प्रचंड गर्जना केली. आपले शेपूट फाडकन जमिनीवर आपटले. हळूहळू त्याचे शरीर पर्वताएवढे मोठे झाले. रागानी त्याचे डोळे लाल लाल झाले. आपले प्रचंड हात पसरून त्यानी श्रीरामांचे नाव घेतले “जय श्रीराम” आणि निळ्या आकाशात रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावरून उड्डाण केले. रामेश्वरम पासून लंका 100 योजने दूर होती. एक योजन म्हणजे 20 किलोमीटर. आणि 100 योजने म्हणजे 2000 किलोमीटर. एका उडीत, दोन हजार किलोमीटर, अंतर कापायचे होते.हनुमानाच्या अंगात ती क्षमता होती. पण ते त्याला माहीत नव्हते. श्रीरामांनी त्याला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली. आणि मग त्याचा आत्मविश्वास वाढला. हनुमान खोबरे खायचा. अंगाला खोबरेल तेलाचे मालिश करायचा. आणि खूप व्यायाम करायचा. खेळायचा. म्हणून तो ताकदवान झाला. आणि प्रचंड ताकदीनं त्यानी उड्डाण केले. वाटेत अनेक विघ्ने आली. समुद्रातून मायावी पर्वत वर आला. आकाशातून राक्षस राक्षसिणि त्याच्यावर चालून आल्या. पण सगळ्यांना हरवून तो विजयी हनुमान श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करत. समुद्राच्या दुसऱ्या तीरावरील लंकेत जाऊन पोचला. आता लंकेत सीतामाता कुठे आहे हे शोधायचे होते. आज तुम्ही सगळे, घरी जाऊन हनुमानाचा “गुळ खोबरं” हा प्रसाद आईला मागा. गुळ खोबरे खाऊन हनुमानासारखे शक्तिमान आणि बुद्धिमान व्हा. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 25 – हनुमान उडी Read Post »

child-adoption

मूल नाही म्हणून कुढत का बसता, दत्तक घ्या ना

होईल हो. आत्ता तर जेमतेम दोन अडीच वर्ष होताहेत लग्नाला. इथून होते सुरुवात एका दुष्टचकाची. मागून लग्न झालेल्या भावंडांना पहिले मूल झाले की पहिल्यांदा मनात पाल चुकचुकते. आपल्याला कधीच मूल होणार नाही काय ? डॉक्टरी उपाय सुरु होतात. येणारीप्रत्येक मासिक पाळी नैराश्याचे झटके देअून जाते. उध्वस्त जीवनाचा अर्थ समजता. चिडचिडहोते. भांडणे वाढतात. निष्कारण एकमेकांना दुखावले जाते. समंजस कुटुंबातल्या समंजस जोडप्यांना ‘दोष कुणाचा’ यात रस नसला तरी “गिल्टी फीलिंग” काढून टाकावे लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु होते. मिळेल तो सल्ला ऐकण्याची प्रवृत्ती वाढते. न जाणो या मार्गानेयश आले तर ! आशा मरत नाही. मन हार मानायला तयार होत नाही. पण हळूहळू मूल कधीच होणार नाही हे मनाला समजायला लागतं. अनेक वर्ष ज्या डॉक्टरांवर देवासारखी श्रध्दा ठेवली असते, जो डॉक्टर सुप्रसिध्द, यशस्वी, तज्ञ, बुध्दिमान वाटला असतो तोच डॉक्टर अचानक वेळ खाअू, पैसेखाअू, कच्चा वाटू लागतो. कशाला फुकट चकरा मारायच्या असे वाटू लागते. आपण उगीच या डॉक्टरच्या नादी लागलो असे वाटले म्हणजे समजावे प्रयत्नांचा अंत आला आहे. पाच, दहा, पंधरा वर्षांनी मूल झालेली माणसे दिसायला लागली म्हणजे समजावे, आता पुरे ! वाईट दोघांनाही वाटत असतं. कुचंबणा तर होतेच. पण वाईट वाटतं हे स्पष्टपणे बोलायला मन नकार देतं. मूल नाही म्हणून आमचं काही बिघडत नाही. आम्ही आनंदी आहोत. असं चारचौघात आवर्जून सांगण्यात माणूस धन्यता मानतो. समाजात न मिसळण्याची प्रवृत्ती वाढते. मनातून कुढत असतांनाच चेहरा मात्र आनंदी, सुखी माणसाचा चढवला जातो. आमच्या आयुष्यात काही त्रुटी नाही, भावंडांची मुले आपलीच आहेत की, असं आवर्जून इतरांना सांगितले जाते. पण या वाक्यांतला फोलपणा लवकरच लक्षात येवू लागतो. चेह-यावर वय दिसू लागते. अकाली प्रौढत्वाच्या खुणा ओळखायला येतात. या परिस्थितीत काही नशिबवान जोडप्यांना दत्तकाची माहिती मिळते. समोरासमोर कुणी सांगितलं तर पटकंन पटत नाही. पण ही दत्तकाची सुचना योग्यवेळी जोडप्यांच्या मनात रुजायला लागते. पहिली प्रतिक्रिया विचार बाजूला सारायची असते. नाही. आपल्या ‘टॅडिशनल फॅमिली” मधे इतका मॉडर्न विचार चालायचा नाही असे वाटते. पण ते खोटे असते. कारण आजकाल कोणच्याच ‘फॅमिली’ तितक्या ‘टॅडिशनल’ नसतात. आणि दत्तक हा सुध्दा इतका काही ‘मॉडर्न’ विचार राहिलेला नाही. कुणाचे तरी प्रोत्साहन, वाचन, किंवा उदाहरण पाहून दत्तकाची कल्पना जोडप्यापैंकी कुणाच्यातरी एकाच्या मनात रुजायला लागते. दोघांनीही चर्चा केली तर ती लवकर रुजते. दोघांच्याही मनात प्रश्न असतो. दुस-याला काय वाटेल. माझे विचार तुझ्यावर लादले तर जाणार नाही ना, असे निष्कारणच म्हटले जाते. दोघांनी एकदा हा विचार मान्य केला की एकदम आयुष्य बदलते. अचानक डोक्यात लख्ख उजेड पडतो. जीवनातला आनंदाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. मग प्रश्न येतो ‘जग काय म्हणेल याचा नातेवाईक, कुटुंबिय समाज यांच मत विचारत बसणे हा मूर्खपणा असतो. कुटुंबियांना विश्वासात घ्यावेच लागते. पण निर्णय स्वतःचा स्वतःच घ्यायचा असतो. मूल दत्तक घेण्याचा निर्णय कुटुंबियांना सांगितला तर सगळयांनाच तो आवडतो. मत विचारलं तर मात्र फाटे फुटू शकतात. कोणी म्हणतं नात्यातलं घेवू, नात्यातलं मूल हे नातेवाइकाचंच राहतं. “जन्मभरं मूल कसं हवं”? संपूर्णपणे आपलं. त्याला आपल्याशिवाय दुसरे आईवडिल नको. तरच ते कुटुंब बनतं. नाहीतर ‘यांच मूल त्यांनी संभाळलं हे बीरुद जन्मभर राहतं. आणि अशी मुलं असतात. त्या मुलाला आई वडिल नसतात आणि अशा मुलांना आई वडिल मिळवून देण्याचं कार्य करणा-या समाजसेवी संस्था असतात. संस्थेकडे जाणे ही सुध्दा एक महत्वाची पायरी असते. संस्थांकडे कुमारीमातांची, आईला सामाजिक कारणांनी सांभाळ करणं अशक्य असलेली मुले येतात ही मुले कायदेशीररित्या त्यांच्या जन्मदात्या आयांनी संस्थेकडे सुपूर्द केलेली असतात. संस्था त्या मुलांचे पालनपोषण करत असते. संस्थेकडे जावून मूल कायदेशीरित्या दत्तक घेणं श्रेयस्कर असतं. संस्थेचे नियम, कागदपत्रांची पूर्तता व लागणारा वेळ परवडला, पण खाजगीरित्या डॉक्टरांकडून आणून संभाळलेलं मूल परवडत नाही. त्यात धोका असतो. जन्मदात्याचा नाव पत्ता व मूल नेलेल्याचा नाव पत्ता कुणालाही मिळू शकतो. पुढेमागे कायदेशीर कटकटी निर्माण होवू शकतात. तेकुठल्याही परिस्थितीत टाळायलाच हवे. संस्थांकडून दत्तक मिळण्याची पध्दत पूर्ण देशात एकच अशी कायद्याने मान्यता दिलेली पध्दत असते. ती मुलांच्या व आईवडिलांच्या दोघांच्याही दृष्टीने फायद्याची असते. संस्थेमधे पहिली भेट होते ती समाजसेविकेची किंवा सोशलवर्करची. या उच्चशिक्षित, प्रशिक्षित, अनुभवी व सह्दयी असतात. त्यांना संपूर्ण सहकार्य देणा-या जोडप्यांची दत्तकमूल घेण्याची प्रक्रिया सुरळीत व आनंददायी ठरते. त्या इंटरव्हयू घेतात, घरी भेट देतात, तुमचं घर त्यातली माणसं दिलेल्या मुलाला योग्य राहतील कि नाही हे बघतात. काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मग तुमचा अर्ज दाखल होतो. यात 2-4 महिने जाउ शकतात. मूल निवडण्याआधी किंवा दाखवण्याआधी सोशलवर्कर तुमच्याशी चर्चा करतात तुमची तयारी करुन घेतात. मुलगा की मुलगी हा प्रश्न प्रत्येकाला सोडवावा लागतो. तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या रंग रुपाशी मिळते जुळते शोधून 1 किंवा 2 मुले दाखवली जातात. बहुतेक “होणा-या आयांना” दाखवलेले पहिलेच मूल आवडते. “प्रथमदर्शनी प्रेम” म्हणतात तसलीच ही भवनात्मक भानगड असते. मूल घरी यायला साधारणपणे 3 ते 9 महिने एखाद्या वेळेस वर्षसुध्दा लागू शकते. तशी गर्भारपणातसुध्दा बाळ यायला नउ महिने वाट पहावीच लागते की. फार उताविळपणा करुन चालत नाही! मूल आल्यावरची परिस्थिती म्या पामराने काय वर्णावी! अहो आनंदसोहळाच तो! सर्व मळभ निघून जाते. सुखाचा पेला काठोकाठ भरल्याची जाणीव होते. हा निर्णय घ्यायला इतकी वर्ष वाया घालवली याची प्रकर्षाने जाणीव होते. ‘बेटर लेट वॅन नेव्हर’ म्हणून स्वतःची समजूत घालणंच आपल्या हातात असतं. शेवट गोड ते सगळं गोड म्हणतात तसं. पण इथं तर एका नव्या आयुष्याची, एका नव्या कुटुंबाची सुरुवात असते. नवा संसार म्हणजे नव्या अडचणी विवंचना आल्याच की. त्याशिवाय त्याला संसार कसं म्हणणार. मधून मधून याचे जन्मदाते कोण असतील. कोणत्या जातीचे असतील असले उत्तर नसलेले प्रश्न मनात उद्भवतात. एखादी बाई ‘दत्त’ म्हणून समोर येवून उभी राहिली आणि “हे माझं मूल आहे” अस म्हणू लागल्याची दिवास्वन्प्नसुध्दा पडू शकतात. पण ते सगळे मनाचे खेळ असतात. ‘कूठून आलं आणि कुठे गेलं’ हे गुपित असतं. ते कुणालाही माहित नसतं. म्हणूनच संस्थेमार्फत कायदेशीर दत्तक यशस्वी ठरतं. आपण आपल्या मुलावर व भविष्यावर नजर ठेवावी. भूतकाळाच्या जोखडीतून मुक्त व्हावं हेच बरं. मूल आल्यावर सगळयांना बिनधास्तपणे आम्ही मूल दत्तक घेतलयं म्हणून सांगावं. अजिबात लाजू नये. ते एक आयुष्यातल यश आहे. ते तसंच समाजाला सांगितलं तर समाजाला आपलं कौतुक करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तुम्ही जर खोटं बोलला किंवा लपवाछपवी केली तर उघडे पडतं. लोक निश्तिच टिंगल करतात. दत्तकाचं तसं संपूर्ण प्रकरणच “आहे ते आनंदाने मान्य करणे व कौटुंबिक जीवन सुखी करणे.” यावर अवलंबून असतं. हे तत्व ज्याला समजलं त्याचा दत्तक यशस्वी झाला. मुलाची वाढ व प्रगति ही जास्त करुन त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर आणिवातावरणावर अवलंबून असते. अनुवांशिकता व त्याच्या जन्मदात्या मातापित्यांच्या आर्थिक – सामाजिक परिस्थितीचा त्यावर काहीच परिणाम नसतो हे समजून घ्यायला हवे. कोणत्याही मुलाला विकासासाठी प्रेम, शिस्त व सुरक्षितता या तीन गोष्टींचा योग्य समन्वय साधावा लागतो. तसाच व तितकाच तो दत्तक मुलासाठीही साधावा लागतो. मुलाच्या वागणुकीचा बुध्दिमत्तेचा व यशाचा संबंध त्याच्या जन्मदात्यांशी न लावता पालनकर्त्या आई-वडिलांशी लावला तर यश निश्चित मिळते. तू दत्तक आहे असं एका दिवशी

मूल नाही म्हणून कुढत का बसता, दत्तक घ्या ना Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 24 – एका उडीत समुद्र हनुमानच ओलांडणार

श्रीराम श्रीराम श्रीराम ! एका उडीत समुद्र, हनुमानच ओलांडणार. वानर राज सुग्रिवाचे सेनापती, अंगद, जांबुवंत, नल, नील व हनुमान चिंतेत होते. एवढा अथांग समुद्र एका उडीत कोण पार करू शकेल. एवढे सामर्थ्य कुणाचेच नव्हते. जांबुवंत म्हणाला हनुमाना तुझ्या इतकी शक्ती वेग सहनशीलता आणि शहाणपणा दुसऱ्या कुणात नाही. एवढे कठीण काम करायल, तू एकटाच लायक आहेस.एका उडीत समुद्र, पवनपुत्र, हनुमानच ओलांडणार. हनुमान तर गप्प गप्प विचार मग्न दिसत होता. एका शापामुळे तो आपले सामर्थ्य प्रचंड शक्ती विसरून गेला होता. श्रीरामांची भेट झाल्यावर श्रीरामांनी एका दृष्टीक्षेपात त्याचे सुप्त सामर्थ्य जागृत केले. त्याला शक्ती बरोबर युक्ती दिली. मारुती ज्ञानी झाला. आणि आपले सामर्थ्य, ज्ञान, कौशल्य, राम कार्यासाठी कारणी लावायचे वाहून घ्यायचे त्यानी ठरवले. आणि अचानक हनुमानाला स्फुरण चढले. अंगात उत्साह संचारला. त्याचा चेहरा उजळून निघाला. त्यानी “जय श्रीराम” असा नारा दिला. आणि तो हनुमान उडी घ्यायला सज्ज झाला. प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 24 – एका उडीत समुद्र हनुमानच ओलांडणार Read Post »

Scroll to Top