बाळाला पूर्ण आडवे झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत?
लहान बाळ मोठ्या माणसासारखे सुरक्षितपणे पिऊ शकत नाही.
बाळ जेव्हा दूध, पाणी किंवा औषध गिळते,
तेव्हा शरीराला एका क्षणात अनेक गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतात.
- श्वासनलिका (trachea) तात्पुरती बंद करावी लागते
- अन्ननलिका उघडावी लागते
- द्रव योग्य दिशेने पोटाकडे जावा लागतो
- गिळताना काही क्षण श्वास थांबतो
म्हणजेच
शोषणे + गिळणे + श्वास घेणे
यांचा अचूक समन्वय आवश्यक असतो.
बाळ पूर्ण सपाट झोपलेले असेल,
तर हा समन्वय अधिक कठीण होऊ शकतो.
त्यामुळे द्रव:
- श्वासनलिकेत जाऊ शकतो
- खोकला किंवा ठसका लागू शकतो
- नाकातून बाहेर येऊ शकतो
- कधी कधी नकळत फुफ्फुसातही जाऊ शकतो
म्हणून:
लहान बाळाला पूर्ण आडवे झोपवून
पाणी, दूध किंवा औषधे देणे टाळावे.
सुरक्षित पद्धत:
- बाळाला थोडे उभट किंवा अर्धवट बसल्यासारखे धरावे
- डोक्याला आधार द्यावा
- हळूहळू द्यावे
- गिळण्यासाठी वेळ द्यावा
लक्षात ठेवा:
बाळाला पाजणे म्हणजे फक्त द्रव पोटात ओतणे नाही.
ती शरीराची अत्यंत सूक्ष्म आणि संरक्षक जैविक प्रक्रिया आहे.
योग्य स्थिती, योग्य गती आणि योग्य काळजी —
यामुळेच बाळ सुरक्षितपणे पिते.
WHY INFANTS SHOULD NOT BE GIVEN WATER OR MEDICINES IN A FULLY HORIZONTAL POSITION
An infant cannot safely drink like an older child or adult.
While swallowing,
the baby’s body has to do many things together within a fraction of a second.
- The breathing pipe (trachea) has to close temporarily
- The food pipe has to open
- The milk or medicine has to go in the correct direction
- Breathing pauses briefly during swallowing
This requires proper coordination of:
sucking + swallowing + breathing.
If a baby is lying completely flat,
this coordination may become more difficult.
Liquid may:
- enter the airway
- cause coughing or choking
- come out through the nose
- occasionally enter the lungs silently
Therefore:
Avoid giving water, milk, or medicines to infants in a fully horizontal position.
Safer method:
- Keep the baby slightly upright or semi-upright
- Support the head gently
- Give slowly
- Allow time for swallowing
Remember:
Feeding is not “pouring liquid into the stomach.”
It is a highly coordinated protective reflex.
A baby drinks safely only when the body gets time and position to protect the airway.
– Dr. Anil Mokashi (Pediatrician)
MBBS, MD, DCH, FIAP, PhD
(Child Growth and Development)


