दानाची खरी किंमत
LMG–010
कल्याणसुंदरम लायब्ररीयन होते.
लायब्ररीतल्या पुस्तकांची व्यवस्था पाहणारे.
ते तरुण असताना १९६२ साली चीन-भारत युद्ध झाले.
कल्याणसुंदरम यांनी गळ्यातली सोन्याची चेन देशासाठी दान केली.
पण ती चेन त्यांना वडिलांनी दिली होती.
तेव्हा त्यांनी ठरवले,
दान करायचे तर स्वतःच्या कमाईतून!
कल्याणसुंदरम यांनी लायब्ररीयन म्हणून मिळणारा संपूर्ण पगार दान करायला सुरुवात केली.
एक-दोन महिने नाही.
एक-दोन वर्षे नाही.
तब्बल ३५ वर्षे!
स्वतःच्या चरितार्थासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केले.
गरजूंना मदत करण्यासाठी ‘अन्बु पालम’ नावाची संस्था चालवली.
लोकांकडून देणग्या गोळा केल्या.
गरजू माणसांना मदत केली.
मुलांनो,
तुम्ही मोठेपणी श्रीमंत झालात,
तरी भारी भारी गाड्या घेण्यापेक्षा
गरजूंना मदत करा.
घेणाऱ्यापेक्षा देणारा जास्त सुखी होतो!
असे होते,
आयुष्यभर पगार दान करणारे लायब्ररीयन कल्याणसुंदरम!
भारत सरकारने २०२३ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


