अ जीवनसत्व: मुलांच्या निरोगी भविष्यासाठी
तोंडाने अ जीवनसत्वाचा डोस मुलांना आजारांपासून संरक्षण देतो आणि निरोगी ठेवतो.भारतात सरकारी आरोग्य सेवा सहा महिन्यांनंतर पाच वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना दर सहा महिन्यांनी अ जीवनसत्वाचा डोस मोफत देते.ही अत्यंत महत्त्वाची आणि दूरदृष्टीची सार्वजनिक आरोग्य सेवा आहे.पण अनेक मुले खासगी डॉक्टरांकडून लसी घेतात. अशा मुलांना अ जीवनसत्वाचा डोस मिळत नाही.खरं तर:• खासगी बालरोग तज्ञांनी सरकारी यंत्रणेकडून अ जीवनसत्वाचा डोस मिळवून मुलांना द्यायला हरकत नाही.• किंवा बाजारात मिळणाऱ्या अ जीवनसत्वाचा डोस:o BLUE Capsule — 100000 IUo RED Capsule — 200000 IUवापरता येऊ शकतात.मुलांचे कुटुंब, आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांनी अ जीवनसत्वाचा डोसचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.ही फक्त “व्हिटॅमिन देणे” इतकी साधी गोष्ट नाही.ही एक preventive health practice आहे.ती समाजात सवय आणि संस्कार बनायला हवी. अ जीवनसत्व म्हणजे “साधं व्हिटॅमिन” नाही. आहे मायक्रोन्यूट्रिअंट, पण बालपणात त्याचे काम फार मोठे आहे.मूल बाहेरून निरोगी दिसू शकते, पण शरीरात शांतपणे अ जीवनसत्वाची कमतरता वाढत असू शकते. अ जीवनसत्व कशासाठी आवश्यक आहे?• दृष्टीसाठी• रातांधळेपणा टाळण्यासाठी• रोगप्रतिकारशक्तीसाठी• वाढीसाठी• त्वचा व शरीराच्या आतील आवरणांच्या आरोग्यासाठी• संसर्गातून बरे होण्यासाठीविशेषतः महत्त्वाचे:• लहान बाळांसाठी• वेगाने वाढणाऱ्या मुलांसाठी• कुपोषित मुलांसाठी• वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांसाठी अ जीवनसत्व कुठून मिळते.प्राणिजन्य पदार्थ:• यकृत (liver)• दूध• चीज• इतर प्राणिजन्य अन्नवनस्पतीजन्य पदार्थ:• गाजर• भोपळा• रताळे• शेवग्याची पाने• कढीपत्ता• हिरव्या पालेभाज्या• पिवळी-केशरी फळे एक महत्त्वाची गोष्ट:अ जीवनसत्व शोषण्यासाठी अन्नात थोडे fat आवश्यक असते.म्हणून:• फक्त गाजर खाऊन उपयोग नाही• भाजीत थोडे तेल/तूप असणे उपयोगी ठरतेआपला पारंपरिक भारतीय आहार यासाठी उत्तम आहे:• डाळ• भाजी• थोडे तेल/तूप• दूध• पोळी/भातसाधा. व्यावहारिक. वैज्ञानिक. काही मुलांना Vitamin A deficiency चा धोका जास्त असतो:• अकाली जन्मलेली बाळे• कमी वजनाची बाळे• कुपोषित मुले Protein malnutrition आणि अ जीवनसत्व यांचा एक लपलेला संबंध आहे.अ जीवनसत्व रक्तात एकटे फिरत नाही.तिला “Retinol Binding Protein (RBP)” नावाच्या protein ची मदत लागते.शरीरात protein कमी असेल तर:• RBP कमी बनते• अ जीवनसत्व नीट वाहून नेता येत नाही• कमतरता निर्माण होतेम्हणजे:मूल अ जीवनसत्व खात असते,पण शरीराला ते योग्य प्रकारे वापरता येत नाही.Nutrition हे एक टीमवर्क आहे — एकट्या nutrient चे काम नाही. संसर्गाच्या, इन्फेक्शनच्या वेळी अ जीवनसत्व तात्पुरते कमी दिसू शकते.जसे:• गोवर• कांजिण्या• गालगुंड• डांग्या खोकला• Hand Foot Mouth Diseaseअशा वेळी शरीरात inflammation वाढते आणि अ जीवनसत्व पातळी खाली जाते. WHO च्या शिफारसी:६ ते ११ महिने:• 100000 IU — BLUE Capsule — एकदा१ वर्ष ते ५ वर्ष:• 200000 IU — RED Capsule — दर ६ महिन्यांनीVitamin A यकृतात साठवले जाते आणि शरीर ते हळूहळू वापरते. Vitamin A supplementation मुळे:• गंभीर आजार कमी होऊ शकतात• रोगप्रतिकारशक्ती सुधारते• बालमृत्यू कमी होण्यास मदत होतेएक छोटीशी capsule,मुलाच्या भविष्यासाठी शांतपणे संरक्षण देत असते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)











